संपत्ती निर्मितीची दशकपूर्ती 

कोरोन पश्चात स्मॉल-कॅप गुंतवणुकीने सोन्यासारखा परतावा दिला असल्याने म्युच्युअल फंडातील एकूण एसआयपी गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंवाणूक स्मॉलकॅप फंडात जात आहे. स्मॉलकॅप कंपन्यांचे मुल्यांकन विक्रमी उच्चांकी असले तरी या धोक्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदार स्मॉलकॅप मधील एसआयपी वाढवत असल्याचे आकडेवारी दर्शवित आहे. एसआयपी गुंतवणुकीमार्फत संपत्ती निर्मितीसाठी संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाची शिफारस करीत आहे. अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाची सुरवात नोव्हेंबर २०१३ मध्ये क्लोज-एंडेड फंड म्हणून झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये फंड गुंतवणुकीस कायम खुला (ओपन-एंडेड)  फंड म्हणून रूपांतरित झाला. अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाने  २५ नोव्हेंबर २०१३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत २३.७७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मागील वर्ष  भरात जसे इतर स्मॉल कॅप फंडांनी भरघोस परतावा दिला तसा अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाने सुद्धा वार्षिक ४२ टक्के परतावा दिला आहे.  आमच्या म्युच्युअल फंड संशोधनासाठी वापरल्याजाणाऱ्या संगणक प्रणालीने (अल्गोरिदम) स्मॉलकॅप गटात कूस बदललेला फंड (ट्रेंड रिव्हर्सल) म्हणून अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाची निवड केली. हा लेख लिहायचा ठरला म्हणून या फंडाचे निधी व्यवस्थापक श्रेयस देवलकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान. “गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षाचा परतावा पासून त्याच परताव्याच्या अपेक्षेने नवीन गुंतवणूक करू नये. मागील वर्षभरातील असाधारण परतावा भविष्यात प्रतिबिंबित होण्याची  शक्यता नाही. गुंतवणूकदारांनी आपापल्या जोखीम सहिष्णुतेनुसार आपल्या गुंतवणुकीत स्मॉल कॅपची मात्रा ठरवावी.”  स्मॉल कॅप वर्गातील कंपन्यांनी मागील वर्षभरात भरघोस परतावा दिला आहे ‘निफ्टी स्मॉलकॅप १०० टीआरआय’ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातील सर्वाधिक परतावा दिलेला निर्देशांक ठरला आहे.  या पार्श्वभूमीवर उच्च जोखम घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाची निवड करावी. स्मॉलकॅप फंडांचे अस्थिर स्वरूप लक्षात घेऊन, या फंडात नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) गुंतवणूक करणे हितावह ठरेल.

फंडाची कामगिरी

अॅक्सिस स्मॉलकॅप फंडाच्या ‘एनएफओ’ गुंतविलेल्या १ लाखाचे ३१ जानेवारी रोजी ८.९० लाख झाले असून फंडाने २३.९५ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत, (१ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४) फंडाने वार्षिक २७.८५ टक्के  दराने (सीएजीआर) परतावा दिला आहे . या कालवधीत फंडाने ‘निफ्टी स्मॉलकॅप १०० टीआरआय या मानदंडसापेक्ष २.२७ टक्के अधिक परतावा मिळविला आहे. मालमत्ता क्रमवारीत हा फंड स्मॉलकॅप फंड गटात चवथ्या क्रमांकावर आहे. मागील पाच वर्षांतील २० तिमाही पैकी १७ तिमाहीत हा फंड ‘अपर मिडल’ किंवा ‘मिडल क्वारटाइल’ 

 सरासरी  कमाल कमाल ० पेक्षा कमी  ० ते १० टक्के    १० ते २० टक्के२०  टक्यांपेक्षा अधिक
अॅक्सिस स्मॉल कॅप ३०.३०  ३९.१४ २१.२१ ०   ०.८१    १४.२०  ८४.९९ 
निफ्टी स्मॉलकॅप १०० टीआरआय३०.५६      ४३.१२१९.१५      ०.८६  १२.६७  ८६.४७
(३ वर्षाची चलत सरासरी) (रिटर्न डिसट्रिब्यूशन (% वेळा)

फंडाचा पोर्टफोलिओ

ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाचा पोर्टफ़ोलिओ सक्रीय व्यवस्थापित केला जातो. फंडाच्या गुंतवणुकीत प्रामुख्याने उद्योगक्षेत्राच्या सरासरी पेक्षा वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो. ॲक्सिस स्मॉल कॅप फंडाच्या पोर्टफोलिओत ३१ डिसेंबर २०२३च्या आकडेवारी नुसार २.२१ टक्के लार्जकॅप ५३.५४ टक्के मिडकॅप ३५.२० टक्के स्मॉलकॅप आणि ९.०४ टक्के रोकड सलग्न गुंतवणुका आहेत. मागील महिन्या भरात निधी व्यवस्थापकांनी अपार इंडस्ट्रीज, महिंद्रा लाईफ स्पेसेस, केइआय इंडस्ट्रीज, हॅप्पी फोर्जिंग, आयनॉक्स इंडिया, या कंपन्यांचा नव्याने समावेश केला तर सिम्फनी लिमिटेडला पोर्टफोलिओतून वगळण्यात आले. फंडाच्या गुंतवणुकीत अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, रोकड, सेवा, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, स्थावर मालमात्ता विकासक, ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली तर सिमेंट, उत्पादने, आरोग्य निगा, बँका, ही सर्वात कमी गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. बिर्लासॉफ्ट, नारायणाहृदयालया, ब्रिगेड एंटरप्राईझेस, चोलामंडलम फायनंशिअल होल्डिंग्ज, कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, गॅलेक्सी सरफॅक्टंट या सरावाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. किमान पाच वर्षे मुदतीसाठी या फंडाची शिफारस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top