निधी व्यवस्थापक बदलाचा लाभार्थी : बंधन कोअर इक्विटी फंड

बंधन कोअर इक्विटी फंड हा लार्ज अँण्ड मिडकॅप फंड आहे. हा फंड पूर्वी आयडीएफसी कोअर इक्विटी फंड म्हणून ओळखला जात असे. ‘सेबी’च्या परिपत्रकानुसार, लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांनी त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ३५ टक्के मालमात्त लार्ज कॅप कंपन्यांमध्ये (मार्केट कॅपनुसार पहिल्या १०० कंपन्या) आणि ३५ टक्के मालमत्ता मिडकॅप कंपन्यांत (मार्केट कॅप नुसार १०१ ते १५० कंपन्या) तर उर्वरित ३० टक्के मालमत्ता लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये निधी व्यवस्थापकाच्या मर्जीनुसार गुंतविता येते. लार्जकॅप पोर्टफ़ोलिओला स्थैर्य तर मिडकॅप पोर्टफोलिओला वृद्धी प्रदान करतात. बंधन कोअर इक्विटी फंडाची सुरवात ऑगस्ट २००५ मध्ये झाली. फंडाने आज पर्यंत अजय बोडके, त्रीदीप पाठक, अंकुर अरोरा, अनुप भास्कर आणि ऑगस्ट २०२३ पासून मनीष गुनवानी हे निधी व्यवस्थापक अनुभवले. फंडाची मालमत्ता ३१ डिसेंबर २०२३ रोजी ३४८३ ९१ कोटी होती. फंडाचा टीईआर १.९६ टक्के आहे. निफ्टी लार्ज मिडकॅप २५०TRI हा फंडाचा मानदंड आहे. फंडाने ३ वर्षे ५ वर्षे ७ वर्षे आणि १० वर्षे या कालावधीत मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. मानदंडापेक्षा अधिक परतावा (अल्फा) मिळविण्यासाठी  सर्व निधी व्यवस्थापकांनी स्मॉलकॅप गुंतवणूकीचा विवेकपूर्वक (२०% पर्यंत) वापर केल्याचे दिसत आहे. स्मॉलकॅप सोबत फंडाने थीमॅटिक आणि आर्थिक आवर्तनाशी निगडीत उच्च-वृद्धीदर राखणाऱ्या गुणवत्तापूर्ण  समभागांमध्ये लघु ते मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक केल्याचे सखोल अभ्यासांती दिसून आले. लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांचा मागोवा घेतांना आणि विशेषत: बंधन कोअर इक्विटी फंडाचा मागील १९ वर्षांचा अभ्यास केला असतात बाजार वेगवेगळ्या टप्प्यात असतांची कामगिरी समाधान कारक असून मागील दोन वर्षात बंधन कोअर इक्विटी फंड  संपत्ती निर्मितीत यशस्वी झाल्याचे दिसत आहे. विद्यमान निधी व्यवस्थापक मनीष गुनावानी यांनी निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाल्यापश्चात या फंडाच्या गुंतवणुकीत बदल केले असून या बदलांचे फलित दिसू लागले आहे. मागील एका वर्षाच्या कामगिरीनुसार बंधन कोअर इक्विटी फंड हा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ लार्ज आणि मिडकॅप फंडांपैकी एक आहे.

आलेख क्रमांक -१ फंडाची जोखीम परतावा स्थिती (कालावधी ५ वर्षे)

बंधन कोअर इक्विटी फंड

फंड गट निफ्टी लार्ज मिडकॅप २५०TRI 

कोष्टक क्रमांक १ (लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांचा परतावा)

फंड लाखाच्या एक रक्कमी  गुंतवणुकीचे आजचे बाजार मूल्य
(लाखात)
मालमात्त
(कोटी रुपये)
१ वर्ष३ वर्ष५ वर्ष७ वर्षे१० वर्ष
मिरे असेट लार्ज अँण्ड मिडकॅप३२४९२.१७४५.९५१९.७३२०.४९१९.३२२३.३३
कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज१९९०४.४८२५.०७१७.६३१७.२५१८.८९२२.२६
एचडीएफसी लार्ज अँण्ड मिडकॅप१५०२१.९४४०.२०२७.७२२०.३२१७.७३१४.६७
एसबीआय लार्ज अँण्ड मिडकॅप१८९२६.३३२७.२६२१.८४१७.३५१६.९७१७.३२
टाटा लार्ज अँण्ड मिडकॅप६१८३.७९२४.२३१९.७२१८.३२१९.७३१६.६७
निप्पोन इंडिया व्हिजन४०५७.४१३६.७८२१.७८१७.२९१७.४७१५.३२
बंधन कोअर इक्विटी३४८३.९१४०.२१२५.९३१९.३७१७.८९१६.२२
युटीआय लार्ज अँण्ड मिडकॅप२३८०.०८३५.८२२३.९२१८.२९१८.७५१५.२३
फ्रँकलीन इंडिया इक्विटी अॅडव्हांटेज३१३८.३२२७.२६१७.६३१४.९७१९.३४१४.०९
एलआयसी एमएफ लार्ज अँण्ड मिडकॅप२४७१.८८३१.२८१८.६४१६.१४१८.६५—-
निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय३६.३३२१.८६१८.४६१८.१९१७.५६

सध्याच्या परिस्थितीत नवीन गुंतवणुकीसाठी लार्ज आणि मिडकॅप फंडात गुंतवणूक का करावी?

सध्या भारतीय शेअर बाजार निर्देशांक शिखराच्या जवळ आहेत. जानेवारी –डिसेंबर २०२३ या कालावधीत स्मॉलकॅप निर्देशांकांनी मागील दहा वर्षातील सर्वोत्तम ‘कॅलेंडर रिटर्न्स’ दिले आहेत. वर्षभरात सेन्सेक्सने १८ टक्क्यांची झेप घेतली तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधत्व करणाऱ्या बीएसई मिडकॅपने ४३ टक्यांनी तर बीएसई स्मॉलकॅपने ४६ टक्यांनी वाढ नोंदविली. आज सर्वच निर्देशांक विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहेत. बाजाराच्या घसरणीची वाट पहात बसून गुंतवणुकीची वेळ साधण्या ऐवजी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी स्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे एखाद्या चांगल्या लार्ज अँण्ड मिडकॅप फंडात गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीसाठी हा फंड गट  एक आशादायक परतावा देण्याची क्षमता असलेला फंड आहे. गेल्या वर्षभरात बंधन कोअर इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीत केलेले बदल फंड गटाच्या सरासरीपेक्षा जास्त परताव्याच्या अक्षमतेसह एक अव्वल कामगिरी करणारा फंड म्हणून भविष्यात पुढे येईल असे वाटते. जोखीम परतावा गुणोत्तर तपासले असतात निफ्टी लार्ज मिडकॅप २५० हा जोखीम परतावा समतोल साधलेला निर्देशांक असून एप्रिल-मे २०२० नंतर सुरु झालेल्या तेजीत, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात लार्जकॅपकडे दुर्लक्ष करून स्मॉल आणि मिडकॅप इक्विटी फंडांवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्याच्या परिस्थितीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडातून नफा काढून घेऊन लार्ज आणि मिडकॅप फंडांमध्ये पुनर्गुंतवणूक करण्याची वेळ आली असून त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओचे जोखीम परतावा गुणोत्तराचा समतोल साधू शकतात. लार्ज आणि मिडकॅप फंड सुस्थापित लार्जकॅप कंपन्या आणि संभाव्य उच्च-वाढीची क्षमता असलेल्या मिडकॅप कंपन्यांतून गुंतवणूक करतात. हे वैविध्य  बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, हे फंड बाजार आवर्तनाचा लाभ घेण्यासाठी आदर्श गुंतवणूक साधन आहेत. दैनंदिन चलत परताव्याच्या (डेली रोलिंग रिटर्न)  विश्लेषणानुसार निफ्टी लार्ज मिडकॅप २५० निर्देशांकाने तीन पाच सात आणि दहा वर्षांच्या कालावधीत कधीही तोटा झालेला नाही. या फंडांमध्ये किमान पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तोटा होण्याची शक्यता ०.८१ टक्के आहे. (कोष्टक क्रमांक २ पहा)

फंड रणनीती

बंधन कोअर इक्विटी फंडाला ७० टक्के पोर्टफोलीओ हा आघाडीच्या २५० कंपन्यांमध्ये (लार्जकॅप आणि मिड-कॅप कंपन्यांत प्रत्येकी ३५ टक्के ) गुंतवावा लागतो. मुल्यांकन आधारित गुंतवणूक करण्यात निधी व्यवस्थापक सजग आहेत, आणि त्यानुसार पोर्टफोलिओ सक्रीय व्यवस्थापित केला जातो. निधी व्यवस्थापक मानदंड सापेक्ष जागरूकता दर्शवत असून मानदंडाशी विपरीत कोणतेही मोठी क्षेत्रीय गुंतवणूक करीत नाहीत. वाजवी मूल्य आणि ‘टर्नअराउंड’ कंपन्यांमध्ये गुंतवणूक संधी शोधणे हा गुंतवणुकीमागचा मूळ हेतू आहे. कंपन्यांच्या निवडीसाठी ‘बॉटम-अप’ आणि ‘टॉप-डाउन’ अशा दोन्ही रानानितींचा अवलंब केला जातो. 

या फंडांच्या गुंतवणुकीत लार्ज कॅप कंपन्यांचे प्रमाण कायम ४०-४२ टक्के दरम्यान राहिले आहे. लार्ज कॅप कंपन्या मिडकॅप कंपन्यांपेक्षा कमी अस्थिर असतात आणि बाजार अस्थिरतेत पोर्टफोलिओला स्थैर्य प्रदान करतात. तर मिडकॅप कंपन्यांत दीर्घ कालीन  गुंतवणुकीच्या मार्गे अल्फा तयार करण्याची क्षमता असते. बंधन कोअर इक्विटी फंडाने मागील दह वर्षात वार्षिक १६.२२ टक्के वार्षिक दराने १ लाख गुंतवणुकीचे ४.४९ लाख केले आहेत.  बंधन कोअर इक्विटी फंडाची सुरवात ९  ऑगस्ट २००५ रोजी झाली.

बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील गुंतवणूक मानदंड सापेक्ष अधिक आहे. सध्या हे क्षेत्र ग्रोथ अँट रिझनेबल प्राईस’ या प्रकारात मोडते. सर्व बँका/एनबीएफसीमध्ये मूल्यमापन वाजवी आहेत आणि सध्या बँकांच्या कर्ज वितारणातील वृद्धीदर समाधानकारक असून व्याज दर वाढल्याने बँकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. निवडक ‘नॉन-लेंडिंग’ वित्तीय सेवा क्षेत्र देखील देखील आकर्षक मुल्यांकानावर उपलब्ध आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक मानदंड सापेक्ष कमी असून हे क्षेत्र अमेरिका आणि युरोप मधील मंदीचा सामना करत आहे. मागील आठवड्यात जाहीर झालेल्या ‘आयटी’ क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या निकालांनी याची प्रचीती दिली आहे.  वाहन आणि वाहन पूरक उद्योगात मूल्य आणि वृद्धी यांचा समतोल दिसत असल्याने फंडाची या क्षेत्रात मानदंड सापेक्ष अधिक गुंतवणूक आहे. ग्रामीण आणि बहु संख्य प्रवाश्यांच्या वापराच्या असलेल्या वाहनांना (एसयुव्ही) गुंतवणुकीत महतावाचे स्थान असून सणासुदीच्या हंगामाने प्रवासी वाहनांच्या विकलेल्या संख्येने या गुंतवणुकीला समर्थन दिल्याचे दिसत आहे. जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, निधी व्यवस्थापक निर्यात करणाऱ्या वाहन पूरक उत्पादक कंपन्यांच्या गुंतवणुकीबाबत सजग असल्याचे दिसते. 

आलेख क्रमांक २ मार्केट कॅप नुसार फंडाची गुंतवणूक 

कोष्टक क्रमांक २ (५ वर्षाची चलत सरासरी)

रिटर्न डिसट्रिब्यूशन (% वेळा)
सरासरीकमालकिमान   ० पेक्षा कमी ० ते ८ (%)               ८ ते १२   (%)     १२ पेक्षा अधिक
(%)
बंधन कोअर इक्विटी फंड१०.९२१९.२१-१.८३०.८११४.०३४३.७९४१.३५
निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय८.४३२१.४४१.४२०.८६१२.६७४८.५२३७.९५

आलेख क्रमांक ३ मागील दहा वर्षातील ५ वर्षाची चलत सरासरी 

बंधन कोअर इक्विटी फंडाची ५ वर्षांची कामगिरी समाधान कारक आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापकांत झालेला बदलाचा परिणाम  फंडाच्या कामगिरीवर झाला असून भविष्यातील फंडाच्या कामगिरीबाबत सकारात्मकता दिसत आहे. अशा प्रकारे हा फंड दीर्घकाळासाठी गुंतवणूककरू इच्छिणाऱ्यागुंतवणूकदारांसाठी एक चांगले साधन आहे. लार्ज कॅप आणि मिडकॅप कंपन्यांचा सहयोगातून एक चांगला डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी दीर्घ मुदतीत संपत्ती निर्मिती करण्यात यशस्वी ठरला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) किंवा एकरकमी या दोन्ही मार्गांनी या फंडात  गुंतवणूक केल्यास दीर्घ कालावधीत हा फंड गुंतवणूकदारांना निराश करणार नाही. 

अधिक माहितीसाठी आणि गुंतवणूकिसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा
+91 97024 90900

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top