दिसते मजला सुख चित्र नवे!

 

बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रक्कमेची बँकेत मुदत ठेव करावे किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करु लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली असा देखील समज करून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजात वाढ होत असतांतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा समाधानकार नसण्यामागच्या कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.

सेन्सेक्स किंवा निफ्टी मध्ये निवडक कंपन्यांचा समावेश असतो. या कंपन्यांच्या बाजारातीन भावानुसार निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये चढउतार होत असतात. सेन्सेक्स आणि निफ्टी कंपन्याचे बाजारमूल्य एकूण भांडवली बाजाराच्या बाजारमूल्याच्या जवळपास ८५ टक्के आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. १ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ या एका वर्षाचा विचार केल्यास निफ्टीमधील केवळ ७ सेन्सेक्स मधील ५ आणि बीएसई ५०० निर्देशांकातील केवळ १० कंपन्यांच्या भावात वाढ दिसून आली. याचा अर्थ ही तेजी निवडक समभागांमुळे आलेली असून बाजारातील सर्वाधिक बाजारमुल्य असलेल्या बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र, निवडक समभाग वगळता वाहन उद्योगाचा या तेजीत सहभाग दिसून आलेला नाही. निर्देशांकांना नवीन शिखरापर्यंत नेण्यात टीसीएस एचडीएफसी बँक, रिलायंस इंडस्ट्रीज बजाज फायनांस मारुती उद्योग या निवडक समभागांचे योगदान असल्याने ही तेजी सर्वव्यापी नाही. निर्देशांक सर्वोच्च शिखराला स्पर्शकरून देखील त्याचे प्रतिबिंब म्युच्युअल फंड गुंतवणुकीत न दिसण्यास हे मुख्य कारण आहे.

गुंतवणूकदारांचे नेमके काय चुकले?

फंड योजनांचा मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देऊ शकत नाही असा बाजार नियंत्रक सेबीकडून वारंवार इशारा देऊन देखील मागील परतावा हाच अनेकांच्या फंड निवडीचा निकष असतो. मागील दोन तीन वर्षांचा विचार केल्यास २०१४ नंतर सर्वसाधारणपणे मिडकॅप समभागांची भांडवलीवृद्धी लार्जकॅप समभागांपेक्षा अधिक असल्याने, मिड आणि स्मॉलकॅप योजनांचा परतावा अधिक राहिला. तेजीवर स्वार झालेल्या मिडकॅप समभागांचे मुल्यांकन हे लार्जकॅप समभागांच्या मुल्यांकनापेक्षा अधिक होते. या सदराचा हेतू  केवळ चांगल्या फंडांची ओळख करून देण्याचा नसून या फंडाच्या गुंतवणुकीतील जोखीमिची जाणीव करून देण्याचा असतो. ३१ डिसेंबर रोजी बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांचा एका वर्षातील परतावा अनुक्रमे  ५१ टक्के आणि ६८ टक्के होता. जनेवारीपासून याच निर्देशांकांनी अनुक्रमे १४ टक्के ३२ टक्के घट नोंदविली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी शिखराला स्पर्शकेला असला तरी रोजी बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांची कामगिरी रोडावली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार केल्यास निर्देशांकांचा कल वेगवेगळा आहे. मालमत्तेचे विभाजन हा यशस्वी गुंतवणुकीचा पाया मनाला जातो. या नवगुंतवणूकदारांनी मालमता विभाजन सारख्या मुलभूत गोष्टींना हरताळ फासल्याने या सर्व नव गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप गुंतवणुकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर केला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप घसरणीचे पडसात त्यांच्या गुंतवणुकीत दिसत आहेत. गुंतवणूकदरांचे काम सल्लागार निवडण्याचे काम करावे आणि फंड निवड ही सल्ल्लागारावर सोडवी. परंतु गुंतवणूकदारांना सल्ल्लागाराने सुचविलेल्या योजना नेहमीच पसंत  नामांकित फंड घराण्याच्या योजना हव्या असतात. अनेक अप्रचलित फंडांचा परतावा ‘एचडीएफसी टॉप १००’, ‘आयसीआयसीआय पृडेशीयल व्हॅल्यू डिस्कवरी’ आदित्य बिर्ला सनलाईफ फ्रंटलाईन इक्विटी सारख्या नामांकित फंडांपेक्षा कितीतरी अधिक आहे. संत तुकाराम यांच्या ‘महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती | येता सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी|| बाजारातील मिड आणि स्मॉलकॅप मधील आघाताचा सर्वाधिक फटका या प्रचलित फंडांना बसल्याचे आकडेवारी सांगते. म्युच्युअल फंड सल्ल्लागारापेक्षा आपल्याला अधिक कळते हा गुंतणूकदरांचा समज घातक ठरला. मागील आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रांसला मागे टाकले. येत्या वर्षभरात आपल्या अर्थव्यवस्थेचे आकारमान इंग्लंडच्या अर्थव्यावास्थेहून मोठे असेल. समभाग गुंतवणूक ही दीर्घमुदतीची असते आपापल्या जोखीमांकानुसार एकूण गुंतवणुकीचा ठराविक हिस्सा बाजारात गुंतवायला हवाच. केवळ बँक मुदत ठेविंपेक्षा परतावा कमी झाला म्हणून म्युच्युअल फंड मोडून मुदत ठेव करणे ही आर्थिक हाराकिरी ठरेल.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top