एक सांगायचंय…

 

युनियन  फंड घराण्याने   युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड हा व्हॅल्यु फंड गटातील फंड गुंतवणुकीस १४ नोव्हेंबर पासून खुला केला. युनियन फंड घराण्याचा कायम खुला असलेला पाचवा आणि विनय पहारीया हे युनियन म्युच्युअल फंडात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल झाल्यापासून या फंड घराण्याचा हा कायम खुला असलेला तिसरा फंड असल्याने या फंडाची दखल घेणे गरजेचे वाटते. विनय पहारीया युनियन म्युच्युअल फंड घराण्यात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल होण्यापूर्वी इंव्हेस्को आणि चोलामंडलम् या दोन फंड घराण्यात कार्यरत होते. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांची मते आणि विचार करण्याची पद्धत कळपाने वावरणाऱ्या निधी व्यवस्थापकांपेक्षा वेगळी आहे. जानेवारी २००८ पासून समभागांच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ही घसरण ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे झाली त्या दिशादर्शकांची स्थिती   कोष्टकामध्ये दाखविली आहे.

परिणामी बीएसई ५०० निर्देशांकाचे उत्सर्जन (पीई) २८ डिसेंबर २०१७ रोजी २४.८५ पटी वरून ३१ ऑक्टोबर रोजी २५.१६ पट झाले. निर्देशांकाने दिलेल्या परताव्याच्या दरांत देखील मोठी घसरण झाल्याने गुंतवणूक असलेल्या फंडाचा परतावा घसरला. बीएसई ५०० निर्देशांकातील  समभागांची २८ डिसेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ८८ समभाग (१९%) वधारले, १७३ समभागांची (३७%) २५ टक्यांहून अधिक घसरण झाली, १६५ समभागांची (३५%) २५ ते ५० टक्के दरम्यान घसरण झाली ४१ समभाग (९%) ५० ते ७५ टक्के दरम्यान घसरण झाली. तर ५ समभागांची (५%) समभागांची ७५ टक्के पेक्षा अधिक घसरण झाली. समभागांच्या किंमतीतील विस्तृत घसरणीमुळे ‘ग्रोथ’ संकल्पनेवर आधारित समभागांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा ‘व्हॅल्यू’ संकल्पनेवर आधारित गुंतवणूक करावी अशी परिस्थिती आहे. साहजिकच निधी व्यवस्थापकांना योग्य समभागांची निवड करण्यास वाव असलेली परिस्थिती असल्याने नवीन गुंतवणूक करावी अशी आहे. या फंडाचा पोर्टफ़ोलिओ मल्टीकॅप फंड प्रकारचा परंतु लार्जकॅपकडे झुकलेला असेल. आर्थिक वर्ष २०१९ च्या उत्सर्जनावर आधारित सध्याचे निफ्टीचे मुल्यांकन १९ पट आहे. हे मुल्यांकन मध्यम स्वरूपाचे असून नवीन गुंतवणूक टाळावी अशा धोकादायक पातळीवर नक्कीच नाही.

विनय पहारीया यांची निधी व्यवस्थापक म्हणून कामगिरी समाधानकारक आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचे सक्रीय व्यवस्थापन केले जाणार असून समभाग नेमक्या कुठल्या मुल्यांकनाला विकायचे याची निश्चिती समभाग खरेदी करण्याआधी केली जाईल फंडाचे निर्गुंतवणूक धोरण स्पष्ट असणे ही जमेची बाजू आहे. या फंडाच्या पाच वर्षातील नियोजनबद्ध गुंतवणुकीतून ९ ते १० टक्के वार्षिक परतावा मिळण्यची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर युनियन बँकेसारख्या आघाडीच्या राष्ट्रीयकृत बँक पुरस्कृत युनियन म्युच्युअल फंडाकडून सदर झालेल्या या योजनेचा गुंतवणूकदरांनी आपल्या जोखीमांकानुसार एसआयपी पद्धतीनेच किमान पाच वर्षासाठी गुंतवणुकीचा विचार करावा.

 

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top