धारयति इति धर्मः Role of Research Analyst

Role of Risk Analyst

धर्माची व्याख्या विद्वानांनी धारयति इति धर्मः अशी केली आहे. “धृतिः क्षमस्व दमोस्त्यं सौचामिंद्रियानिग्रहः । धीरविद्या सत्यमक्रोधो, दशकम धर्मलक्षणम् । (धृती (संयम), क्षमा (इतरांनी केलेले अपराध पोटात घालणे), दम (भावनांवर नियंत्रण ठेवणे), अस्तेय (चोरी न करणे), शौच (आंतरिक आणि बाह्य स्वच्छता), इंद्रिय निग्रह (इंद्रियांवर नियंत्रण), धी. (बुद्धीचा वापर), विद्या (ज्ञानाची आस), सत्य (मन, वचन, कर्म याद्वारे सत्याचे पालन) आणि अक्रोध (क्रोधावर नियंत्रण); ही मानवी धर्माची दहा वैशिष्ट्ये आहेत.)

सेबीने (#SEBI) अलीकडे (रिसर्च अॅनॅलिस्ट) (#RA) ‘आरआयए’(#RIA) आणि ‘एमएफडी’ (#MFD) यांचा धर्म कोणता आणि त्यांनी आपआपल्या धर्माचे पालन कसे करावे या बाबतीतला एक निर्णय नुकताच जाहीर केला आहे. ‘सेबी’च्या (#SEBI) अलीकडील सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषक (रिसर्च अॅनॅलिस्ट) संदर्भात दिलेल्या एका निर्णयाची दखल घेणे आवश्यक वाटते. अमित जेसवानी (स्टॅलियन अॅसेट) (#StallionAssetCorePMS) यांच्याविरुद्ध एक मनोरंजक (आणि वादग्रस्त) आदेश सेबीने दिला आहे. अमित जेसवानी यांना २८.६ लाखाचा दंड भरण्याचा आदेश देतांना या आदेशात नोंदणीकृत संशोधन विश्लेषक हे आदर्श पोर्टफोलिओ (मॉडेल पोर्टफोलिओ) (#MODELPORTFOLIO)किंवा गुंतवणूक सल्ला देऊ शकत नाहीत स्पष्टपणे नमूद केले आहे. रिसर्च अॅनॅलिस्ट हे गुंतवणुक विषयक सल्ला देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञात असले तरी, सेबीने रिसर्च अॅनॅलिस्ट, आरआयए (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार) यांची कर्तव्ये (धर्म) अधोरेखित केला आहे. या निमित्ताने प्रत्येकाने पाळायचा ज्याच्या त्याच्या धर्माची उजळणी करायला हवी.

संशोधन विश्लेषकाचा धर्म ?

संशोधन विश्लेषक कंपन्या आणि उद्योगांचा अभ्यास करतो, उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करतो आणि त्या उद्योगात गुंतवणूक करावी किंवा कसे आणि करायची असेल तर कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी किंवा कोणत्या कंपनीचे शेअर्स विकावे या बाबतीत आकडेवारीवर आधारित अंदाज किंवा शिफारसी करणे अपेक्षित असते. संशोधन विश्लेषकाची एखादी गुंतवणुकीची शिफारस एखाद्या गुंतवणूकदाराच्या जोखीमांकाला साजेशी नसेल. परंतु त्या विश्लेशकाला गुंतवणूकदाराच्या जोखीमांकाची (#RISKPROFILE) कल्पना असेलच असे नाही.

विश्लेषकांच्या अशा शिफारशी अनेक वेळा गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करतीलच असे नसल्याने गुंतवणुकीच्या निर्णयाचा परिणाम गुंतवणूकदारावर होण्याची शक्यता असते. “सेल-साइड अॅनॅलिस्ट” जे संस्थात्मक गुंतवणूकदार, इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा प्रदाते यांच्यासाठी असतात. तर बाय साईड अॅनॅलिस्ट म्युच्युअल फंड, हेज फंड, पेन्शन फंड किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर्स जे त्यांच्या स्वतःच्या गुंतवणूकीसाठी किंवा इतरांच्या वतीने समभागांची खरेदी आणि विक्री करतात अशा निधी व्यवस्थापकांसाठी “बाय-साइड विश्लेषक” या व्यतिरिक्त स्वतंत्र विश्लेषक (इंडीपेंडंट अॅनॅलिस्ट) आहेत, म्हणजे संशोधन प्रवर्तक किंवा गुंतवणूक समुदायासाठी किंवा गैर-व्यक्ती जे पूर्ण-सेवा गुंतवणूक संस्थांसाठी काम करतात. या समुदायातील संशोधन विश्लेषकांचे नियमन करण्यासाठी ‘आरआयए रेग्युलेशन’ आणले गेले. विनियम २(५) नुसार, संशोधन संस्था म्हणजे सेबी नोंदणीकृत मध्यस्थ जो मर्चंट बँकिंग किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा ब्रोकरेज सेवा किंवा अंडररायटिंग सेवांमध्ये आहे आणि त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीं संशोधन अहवाल किंवा संशोधन विश्लेषण स्वतःच्या नावाने जारी करतो. संशोधन विश्लेषक आणि संशोधन अहवाल किंवा संशोधन विश्लेषण जारी करण्यात गुंतलेल्या इतर मध्यस्थांचा समावेश आहे. विश्लेषक थेट गुंतवणूकदारांना आपल्या शिफारसी विकु शकत नाही.

माध्यमातील बातम्यांनुसारया आदेशाचा मॉडेल पोर्टफोलिओ विकणाऱ्या स्मॉलकेस सारख्या मंचावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जे संशोधन विश्लेषकांनी तसेच गुंतवणूक सल्लागारांनी तयार केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ‘क्युरेटेड पोर्टफोलिओ’ (#QYRATEDPORTFOLIO) विकतात ते गैर असून ‘आरए रेग्युलेशन’च्या विरोधी आहे असे मत नोंदवत या आदेशात अर्जदाराने (अमित जेसवानी) “प्रामाणिकपणे आणि सद्भावनेने काम केले नाही” आणि “योग्य आचार मानकांचे पालन आणि योग्य प्रक्रियांचे पालन केले नाही,” असा निरीक्षण सेबीने नोंदले आहे.

भारतातील किरकोळ डिमॅट खाती ६.५ कोटींच्या जवळपास वाढली आहेत आणि गेल्या काही तिमाहीत जोडलेले बहुतेक वैयक्तिक गुंतवणूकदार हे प्रथमच गुंतवणूक करणारे आहेत, ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. नियमन केलेल्या संस्था किंवा गैर कंपनी सल्लागार अशा निर्बंधांच्या अधीन असतात. गुंतवणूकदार समाज माध्यमावर मिळणाऱ्या ‘स्टॉक टिप्स’ आणि सुरत इंदूरसारख्या शहरातून फोनद्वारे काम करणारे अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवतात. हे घटक रिसर्च अॅनॅलिस्ट म्हणून सेबीकडे नोंद झालेले असले तरी त्यांना थेट ग्राहकांना ‘स्टॉक टिप्स’ विकण्याची मुभा नाही. अशा व्यक्ती किंवा कंपन्यांवर कारवाई झालेली दिसत नाही. खरे तर अशा घटकांवर या आधीच सेबीने असून ओढायला हवा होता. ‘सेबी’च्या या आदेशाने संशोधन विश्लेषक (रिसर्च अॅनॅलिस्ट) आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (आरआयए) यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. ज्या व्यक्ती किंवा मंच मोठ्या समूहांना सेवा देत आहेत त्यांनी सेबीकडून याबाबत संपूर्ण स्पष्टता मागितली पाहिजे संशोधन विश्लेषक आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांच्या धर्माबाबत एक पुसटशी लक्ष्मण रेषा असून ही रेषा गुंतवणूक विश्लेषक आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांची भूमिका वेगळी करते.

आरआयए अधिनियामानुसार नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखीमांकानुसार गुंतवणूक साधने सुचवू शकतात. ही मुभा रिसर्च अॅनॅलिस्ट यांना नाही. रिसर्च अॅनॅलिस्ट यांच्या संशोधन अहवाल एखादे उत्पादना बाबत (समभाग किंवा म्युच्युअल फंड) अधिक समजावून घेण्यास आरआयए किंवा एमएफडी (वितरक) यांनी वापरावा आणि गुंतवणूकदाराच्या जोखीमंकानुसार त्यासाधनाची शिफारस करावी. असा याचा अर्थ आहे. या निमित्ताने सेबीने रिसर्च अॅनॅलिस्ट, आरआयए आणि एमएफडी यांच्या धर्माची व्याख्या अधोरेखित केली आहे. अनेक गुंतवणूकदार आपला जोखीमांक समजावून न घेता समाज माध्यमावर मिळणाऱ्या ‘स्टॉक टिप्स’ आणि सुरत इंदूरसारख्या शहरातून फोनद्वारे मिळालेल्या सल्यानुसार गुंतवणूक करतात. अश्या सल्ल्या नुसार गुंतवणूक करणे वैध नाही हे सुद्धा समजावून घेणे आवश्यक आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top