जोखीमांक चाचणीचा अभाव

आज या सदरासाठी शेखर वायदांडे (४८) यांच्या आर्थिक नियोजनाची निवड केली आहे. शेखर हे दुबईस्थित असून लोकसत्ताचे वाचक आहेत. ते त्यांच्या पत्नी शुभदा (४८) आणि मुलगा अथर्व (१२) हे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचे कुटुंब वर्तकनगर ठाणे या ठिकाणी राहतात. पत्नी शुभदा या गृहिणी आहेत. शेखर वायदांडे यांच्या बचतीत ५ म्युच्युअल फंड असून त्यांचे त्यांचे १५ मार्च रोजीचे मुल्यांकन ४६.४४ लाख आहे. शेखर वायदंडे यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.
आर्थिक नियोजन हा एखाद्याच्या जीवनातील आर्थिक उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा मार्ग आहे तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलात तरी आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन मूलत:, हे तुम्हाला तुमचे उत्पन्न, खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे यांचा मेळ घालण्यास मदत करते ज्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीचे नियोजन करू शकता, आणि तुमची वित्तीय ध्येये साध्य करू शकता. पैसा ही एक अत्यावश्यक गोष्ट असून जी तुम्हाला तुमचे जीवन व्यतीत चालवण्यास मदत करते. दिवसेंदिवस पैशाचे मूल्य वाढले आहे कारण लोक त्यांच्या भविष्यातील गरजांबाबत अधिक जागरूक होत आहेत. तात्विकदृष्ट्या, पैशाने सर्व काही विकत घेऊ शकत नाही तरीही व्यावहारिकदृष्ट्या पैसा ही मूलभूत गोष्ट आहे जी कोणत्याही व्यक्तीचे समाजातील पत मोजण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला रु. गुंतवणुकीद्वारे तुमच्या मुलीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी १० लाख, तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी हवे असतील तर त्याचे नियोजन ती जन्माला येतांच करावे लागेल.
कृती योजना
सेवा निवृत्तीकोश ५ कोटी असणे आवश्यक आहे. सध्याचे उपलब्ध स्त्रोत आणि वित्तीय ध्येयांची प्राथमिकता निश्चित केल्या नंतर ४ कोटींची रक्कम जमा होऊ शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत २१ लाख जमा असून पुढील वर्षी ही रक्कम उपलब्ध होईल. सध्या म्युच्युअल फंडातील ४६ लाखा गुंतवणुकीपैकी ३० लाख सेवा निवृत्तीकोशासाठी वापरण्याचे नियोजन असून अतिरिक्त ४५ हजाराची एसआयपी पुढील १२ वर्षे करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुण्यात दुसरे घर घेण्याचे वित्तीय ध्येय रहित करण्यात आले. सेवा निवृत्ती आणि मुलाच्या शिक्षणासाठी पुढील ६ वर्षात ३५ लाख रुपये जमा करणे हे ध्येय निश्चित करण्यात आले. उपलब्ध स्त्रोतांपैकी म्युच्युअल फंड गंगाजळीतून १६ लाख शैक्षणिक खर्चाच्या तरतुदीसाठी वापरण्यात येतील.
जोखीमांक चाचणी एखाद्या व्यक्तीची जोखीम घेण्याची इच्छा आणि क्षमता यांचे मूल्यमापन होय. योग्य मालमत्ता विभाजन निश्चित करण्यासाठी जोखीमांक चाचणी महत्त्वाची आहे. शेखर वायदांडे यांची जोखीमांक चाचणी संतुलित (बॅलंस्ड) आली. म्हणजे शंभर वजा वय या निअयामा नुसार ५० टक्के गुंतवणूक समभाग संलग्न गुंतवणूक साधनात असायला हवी होती. प्रत्यक्षात केवळ ३५ टक्के (गुंतवणुकीत सर्व फंड अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड असल्याने) समभाग संलग्न गुंतवणुका आहेत. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा केवळ ६.३० टक्के आहे याच गुंतवणुका समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात असत्या आणि पीपीएफ मध्ये गुंतवणूक कमी केली असती तर ५ कोटीचा निवृत्ती कोश आणि पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार झाले असते.
जगातील अंदाजे २० टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारतीय लोकसंख्येची साक्षरता ७४ टक्के असली तरी केवळ २५ टक्के लोकसंख्या अर्थ साक्षर आहे. याच अर्थ निरक्षरतेमुळे बर्‍याच लोकांना असे वाटते की ते अनुभव, निरीक्षण किंवा फक्त इतरांची कॉपी करून आर्थिक ज्ञान मिळवू शकतात. या कारणास्तव, ते कोणत्याही गुंतवणूकसाधनात त्या गुंतवणुकीतील धोक्यांचा विचार न करता गुंतवणूक करतात. कोणता फंड जास्त परतावा देत आहे त्या फंडाची ते निवड करतात. उच्च जोखीम क्षमता आणि रोकड सुलभता असूनही प्रत्यक्षात चुकीचे मालमत्ता विभाजन आणि चुकीच्या फंडांची निवड केल्याने साध्य होणारी वित्तीय ध्येये असाध्य झाली. या साठी क्षमता असूनही सखोल ज्ञाना अभावी आणि डीआयवायच्या मोहापायी नियोजन पूर्णपणे चुकलेले आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top