तुजवरी धरी अनुकंपा (Portfolio Review of Rahul Shinde)

Portfolio Review Rahul Shinde By Vasant Kulkarni Main Image

राहुल शिंदे हे पुणे स्थित लोकसत्तेचे वाचक आहेत. लोकसत्ता अर्थवृत्तांत मध्ये शिफारस प्राप्त फंडात ते ऑक्टोबर २०१७ पासून गुंतवणूक करीत आहेत. ते ‘डीआयवाय’ म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत. साहजिकच सर्व फंड ‘डायरेक्ट’ (मध्यस्था शिवाय) प्रकारातील आहेत. तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीत सुलभता आली त्यामुळे कोणीही स्वतःहून गुंतवणूक करू शकतो. तंत्रज्ञानाने गुंतवणूक प्रक्रिया सोपी केल्याने प्रत्येकजण स्वत:ला ‘डू-इट-युअरसेल्फ (डीआयवाय) गुंतवणुकीसाठी पात्र समजूलागला आहे. राहुल शिंदे यांच्या पोर्टफोलीओतील डोळ्यातलगेच भरणारा दोष असा की मिरॅ असेट लार्जकॅप (३६.०३) आणि युटीआय मास्टर शेअर (३८.८८) या दोन फंडात मिळून ७५ टक्के गुंतवणूक आहे. या दोन फंडांचा पोर्टफ़ोलिओ ओव्हरलॅप ९८ ५६ टक्के आहे. पोर्टफोलिओ ओव्हरलॅप हा एक गुंतवणुकीतील दोष समजला जातो. जेव्हा तुमची गुंतवणूक असलेले दोन फंडातील गुंतवणुकीत समान कंपन्या असतात तेव्हा तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य येण्या ऐवजी मालमत्तांचे धृवीकरण झालेले असते. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही फक्त विविध फंडांमध्ये गुंतवणूक करून तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओतील वैविध्य साध्यकरू शकत नाही. गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी वैविध्य आवश्यक असते. पोर्टफोलिओचे खरे वैविध्य तेव्हाच साधते जेव्हा तुमची गुंतवणूक असलेले फंड वेगवेगळ्या कंपन्यातून गुंतवणूक करतात. एक गुंतवणूक सल्लागार म्हणून गुंतवणूकदारास शिफारस करतांना पोर्टफोलिओ ओव्हरलॅप शक्य तितका टाळण्याकडे कल असतो. तुम्हाच्या गुंतवणुकीचा पोर्टफ़ोलिओ ओव्हरलॅप तपासण्यासाठी विविध वेबसाइट्स तुम्हाला मदत करतात. तुम्ही ‘डीआयवाय’ गुंतवणूकदार असल्याने तुम्हाला हे सहज शक्य आहे. या सदरातून तुम्हाला सल्ला म्हणून मिरॅ असेट लार्जकॅप आणि युटीआय मास्टर शेअर या दोन फंडातील मात्रा कमी करून कॅनरा रोबेको व्हॅल्यु फंड, आयडीएफसी स्टर्लिंग व्हॅल्यु फंड, एल अँण्ड टी मिडकॅप, आणि युनियन फ्लेक्झीकॅप या फंडात मात्रा वाढवावी हा सल्ला देत आहे.

तुमच्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य ७४ लाख आहे. या ७४ लाखांच्या बाजार मूल्यात २४.७८ लाखांच्या भांडवली नफ्याचा समावेश आहे.हा भांडवली लाभ दीर्घकालीन असल्याने त्यावर १० टक्के दाराने २.४७ लाख कर दायित्व आहे. कर दायित्व कमी करण्यासाठी ‘टॅक्स हारवेस्टिंग’ या रणनीतीचा वापर केला जातो. तुम्ही ‘डीआयवाय’ प्रकारचे गुंतवणूकदार असल्याने या रणनीतीचा वापर कसा करावा हे विषद करणारे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते पाहून तुम्ही तुमच्या पोर्टफोलीओचे ‘टॅक्स हारवेस्टिंग’ करू शकाल. अन्य वाचकांनी आपआपल्या म्युच्युअल फंड वितरकांशी संपर्क करून आपल्या दीर्घकालीन नफ्यावर देय असलेल्या कराचे नियोजन करावे.

प्रत्येक डीआयवाय गुंतवणूकदारांना आर्थिक तज्ञ असण्याची गरज नाही, परंतु त्यांनी गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसाद करण्याची गरज असते. त्यांनी आपल्या भावनांवर अंकुश ठेवणे आवश्यक असते. राहुल शिंदे यांनी आपल्या गुंतवणुकीचे संतुलन कधीही केलेले नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या तांत्रिक बाबी सहजपणे शिकता येतात. परंतु त्यांना आपल्याला कोणते कौशल्य आत्मसाद करायचे हेच माहित नसते. महाविद्यालयात तुम्ही पदवी घेतांना अभ्यासक्रम निश्चित केलेला असतो. एक सिद्ध ‘डीआयवाय’ गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते कौशल्य आत्मसाद करण्याची गरज आहे आत्मसाद करण्याच्या कौशल्याची यादी बनवून ती कौशल्ये आत्मसाद करा. केवळ कमिशन(एमएफडी) आणि फी (आरआयए) वाचविण्यासाठी गुंतवणुकीच्या मूळ उद्देशापासून विचलित होऊ नका.

गुंतवणूक : ४९  लाख
बाजार मूल्य : ७४.९८ लाख
वार्षिक नफा (%) : १५.८४
जोखीमांक : साहसी

भांडवली लाभाचा तपशील

Portfolio Review Rahul Shinde By Vasant Kulkarni funds
फंड गटानुसार मालमत्ता विभागणी
टॅक्स हार्वेस्टिंग: म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील परतावा वाढविण्याचा राजमार्ग

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top