यशस्वी शस्त्रक्रिया पण रुग्ण दगावला (Portfolio Review of Dr. Jog)

portfolio review dr jog 3

या सदरातून विश्लेषणासाठी घेतलेला पोर्टफ़ोलिओ डॉ.जोग यांचा आहे सर्वसाधारणपणे व्याधी ग्रस्त रुग्ण उपचारांसाठी डॉक्टरांकडे दाखल झाल्यानंतर रोगाचे अचूक निदान आणि त्यावर उपचार योग्य झाले तर रुग्णाचा रोग बरा होतो. डॉ. जोग यांच्या गुंतवणुकीचा उद्देश निवृत्ती नियोजन हा आहे. त्यांच्या १.५० लाखांच्या एसआयपी पाच फंडात सुरु आहेत. ते मागील दहा वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत असून एकूण गुंतवणुकीच्या १०० टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून केली आहे. 

डॉक्टरांचे वय ६२ वर्षे असून वय वर्षे ७५ पर्यंत वैद्यकीय व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे. वय वर्षे ७५ पासून तहहयात दरमहा १ लाख रुपये त्यांना वैयक्तिक खर्चासाठी मिळावे असे त्यांचे नियोजन आहे. वार्षिक ५ टक्के दराने वर्षासन (अॅन्यूइटी) निश्चित केली तर त्यांचे वित्तीय ध्येय ८२ टक्के साध्य झाले आहे. महागाई जमेस धरता वर्षासनात दरमहा ५ टक्के वाढ करायचे असल्यास वित्तीय ध्येय ७६ टक्के साध्य झाले आहे. म्हणूनच त्यांच्या परिभाषेत वर्णन करायचे तर ‘यशस्वी शस्त्रक्रिया पण रुग्ण दगावला’ असे करावे लागेल. अनेकदा शस्त्रक्रियेपश्चात योग्य काळजी न घेतल्याने रुग्ण दगावतो. योग्य फंडांची निवड आणि वार्षिक आढावा घेतला असता तर वित्तीय ध्येय १०० टक्के साध्य झाले असते म्हणजे रुग्ण दगावला नसता. डॉ जोग यांची वायोमर्यादा ९० वर्षे गृहीत धरून ही आकडेमोड केली आहे. डॉ. जोग यांच्या गुंतवणुकीवर २३.५२ लाखांचा करपूर्व भांडवली लाभ आहे. गुंतवणूक कर कार्यक्षम होण्यासाठी दर वर्षी १ लाखापर्यंत करमुक्त भांडवली लाभ गुंतवणुकीतून काढून घेणे गरजेचे असते. डॉ. जोग यांनी आज पर्यंत भांडवली लाभ कधीच घेतलेला नाही. भांडवली लाभ नाकारणे म्हणजे सरकारने दिलेली सवलत नाकारून गुंतवणूक अकार्यक्षम करणे होय. कोटक इंडिया इक्यू कॉंट्रा मधील गुंतवणूक काढून घेऊन उपलब्ध होणारी रोकड सुलभता युटीआय मास्टर शेअर मध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी करावी.

गुंतवणूक : १.६८ कोटी

बाजार मूल्य : १. ९९ कोटी

वार्षिक नफा (%) : १३.९८

जोखीमांक : समतोल

दीर्घकालीन भांडवली लाभाचा तपशील

Mutual Fund Portfolio Review 1

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top