उगाची भितेसी भय हे पळू दे

सक्रीय मालमत्ता विभाजन हा यशस्वी गुंतवणुकीचा एक मुल मंत्र आहे.  दीर्घकाळापर्यंत, एक धोरणात्मक मालमत्ता विभाजन केल्यास सध्या सारख्या युद्धजन्य काळातील  घसरणीचा फायदा घेता येतो. त्यामुळे, असामान्य किंवा अपवादात्मक गुंतवणुकीच्या संधींचा फायदा घेत लवचिकता असलेला पोर्टफोलिओ एकापेक्षा अधिक  मालमत्ता वर्गासाठी अधिक अनुकूल ठरतो. एक रणनीती म्हणून सक्रिय मालमत्ता विभाजनाला खऱ्या अर्थाने सुरवात होते जेव्हा एखादी मालमत्ता चांगला परतावा देते तेव्हा त्या मालमत्ता वर्गाची मात्रा कमी करून पोर्टफ़ोलिओचे पुन:र्संतुलन करणे.

Mrudula Kirloskar

मृदुला किर्लोस्कर 

या रणनीतीमध्ये काही शिस्तीची आवश्यकता असते. कारण अल्प-मुदतीतील संधी कधी सुरू झाल्या हे ओळखण्यास आणि नंतर दीर्घकालीन मालमत्तेच्या स्थितीत पोर्टफोलिओचे संतुलन साधण्यासाठी आपण प्रथम सक्षम असणे आवश्यक असते. आज ज्यांचा पोर्टफ़ोलिओ विश्लेषणासाठी घेतला आहे त्या मृदुला किर्लोस्कर पुण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. गुंतवणुकीचा एकमेव उद्देश सेवानिवृत्ती नियोजन हा आहे. सेवानिवृत्तीस अद्याप १८ वर्षे शिल्लक आहेत. एकूण बाजार मुल्यापैकी १९ लाख रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात आहेत.  १०० टक्के गुंतवणूक एक रक्कमी असून एकही एसआयपी सुरु नाही. त्यांचा बाजारातील वेळ साधण्यावर विश्वास आहे. बाजारातील सध्या वेळ गुंतवणुकीला कशी आहे याची विचारणा करणारी मेळ त्यांनी पाठवली होती. एसआयपी गुंतवणुकीचे फायदे नव्याने पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही.  सध्याचा त्यांचा मासिक खर्च ४० हजार असून सेवा निवृत्त होतांना मासिक खर्च १.३५ लाख रुपये दरमहा झाला असेल. त्यांना ३.१५ कोटी सेवानिवृत्ती कोषाची आवश्यकता भासणार आहे. सध्याचा ७० लाखांचा कोश जमेस धरता त्यांना दरमहा २१ हजाराची एसआयपी  समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात करणे आवश्यक आहे. ही एसआयपी करण्यासाठी कँनरा रोबेको फ्लेक्झीकॅप,  युटीआय मास्टर शेअर आणि निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड सुचवीत आहे. या फंडात प्रत्येकी ७ हजाराची एसआयपी करावी. 

गुंतवणूक: ५२ लाख
बाजार मूल्य: ७२ कोटी
वार्षिक नफा (%): १०.९२
जोखीमांक: पापभिरू

गुंतवणूक असलेले फंड

एबीएसएल फ्लेक्झीकॅप

एबीएसएल डिजिटल इंडिया

एबीएसएल फ्रंटलाईन इक्विटी

आयडीएफसी स्टर्लिंग व्हॅल्यु

आयटीआय डायनॅमिक बॉंड फंड

एल अँण्ड टी फोकस्ड इक्विटी

निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी

एसबीआय फोकस्ड इक्विटी

एल अँण्ड टी ओव्हर नाईट

एल अँण्ड टी इंडिया व्हॅल्यु

निप्पॉन इंडिया गोल्ड फंड

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top