उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती

Portfolio Review on 31 Jan 2022 Main Image

या सदरातील दुसऱ्या पोर्टफोलीओ रिव्ह्यूसाठी लोकसत्तेचे वाचक आशिष यांचा पोर्टफोलीओ निवडला आहे. या पोर्टफोलिओतील बहुसंख्य फंडाची निवड म्युच्युअल फंड वितारकाने केली आहे. त्या मागील चार वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत असून एकूण गुंतवणुकीच्या ९२ टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून तर ८ टक्के गुंतवणूक एक रक्कमी केली आहे. गुंतवणुकीचा उद्देश निवृत्ती नियोजन हा आहे. त्यांच्या १.५० लाखांच्या एसआयपी सहा फंडात सुरु आहेत.

गुंतवणुकीचा कोणताही प्रकार जोखीम मुक्त कधीही नसतो. प्रत्येक गुंतवणूक त्यात नेहमी काही ना काही जोखीम असते. तुमचे पैसे तुम्ही जितकी जोखीम घेता त्याच्या सापेक्ष किती नफा मिळवून देते हे पहाणे आवश्यक असते. प्रमाणित विचलन (स्टॅण्डर्ड डेव्हिएशन) हे पोर्टफ़ोलिओ जोखीम मोजण्याचे साधन आहे. तुमचा पोर्टफ़ोलिओ तीन वर्षे रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉटवर पोर्टफोलिओ दुसऱ्या चतुष्कोनात आहे. याचा अर्थ ज्या प्रमाणात तुम्ही जोखीम स्विकारत अहात त्याच्या निम्म्याने सुद्धा परतावा मिळत नाही. योग्य जोखीम समायोजित परतावा मिळविण्यासाठी उपलब्ध दीर्घकालीन भांडवली लाभातून एबीएसएल फ्रंट लाईन इक्विटी आणि एचडीएफसी टॉप १०० या फंडांतून पैसे काढून घ्यावे.

उपलब्ध रोकड सुलभतेतून लार्जकॅप गुंतवणुकीसाठी कमी प्रमाणित विचलन असलेल्या निप्पॉन इंडिया लार्जकॅप, अॅक्सीस ब्लूचीप आयसीआयसीआय प्रूडेंशिअल ब्लूचीप, आयडीबीआय टॉप १००, युटीआय मास्टरशेअर या पैकी एक किंवा दोन फंडांची निवड करावी.

लोकसत्ता शिफारस प्राप्त लार्जकॅप फंडाची निवड केली असती तर सध्याच्या १६.७३ टक्के नफ्या वरून २४.५८ टक्के नफा मिळवितानांच पोर्टफ़ोलिओची जोखीम ३.४४ टक्क्यांनी कमी करणे शक्य झाले होईल.

(संदर्भ: ‘मोर्निंगस्टार हायपोथिसीस’)

पोर्टफ़ोलिओ गुंतवणूक (लाख) : ८७.६१

पोर्टफोलिओ बाजार मूल्य  (लाख) : १३१.८९ 

गुंतवणूक असलेल्या फंडांची संख्या : १४

पोर्टफ़ोलिओ वरील वार्षिक परतावा (%) : १६.७३

जोखीमांक : समतोल

दीर्घकालीन भांडवली लाभाचा तपशील
Mutual Fund Review on 31 Image 1Jan 22
तीन वर्षे रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट
Mutual Fund Review on 31st Jan 2022 Image 2
Mutual Fund Review on 31 Jan 2022 Image 3
Scroll to Top