दिवस सुगीचे सुरु जाहले

राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी आहे असे राम गणेश गडकरी सांगून गेले. वास्तवात सध्याच्या जगात समाजाचा मोठा वर्ग हा राजासारखा उपभोग घेतांना दिसत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार सामान्य माणूसाच्या जगण्याचे आर्थिक निकष बदलत असल्याचे दिसत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेची ही आकडेवारी भारतीयांच्या उपभोगाच्या कक्षा रुंदावत असल्याचे अधोरेखित करीत आहे. गेल्या काही वर्षात भारतीयांच्या बचतीचा दर आटला असून दरडोई कर्जाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. भारतातील तरुण पिढीने ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या विचारधारेला तिलांजली देत, उपभोगला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. नागरिकांचे दर डोई उत्पन्न वाढते तसा त्यांच्या उपभोगावरील खर्चात वाढ होते. भारतीय नागरिक बचतीपेक्षा प्रसंगी कर्ज काढून विविध गोष्टींच्या उपभोगला देत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या या आकडेवारीने दाखवूनदिले आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी भारतीयांची सरासरी बचत दहा टक्क्यांपेक्षाही कमी होती. वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे उत्तरोत्तर ती वाढत गेली आणि २०१०च्या दशकात बचतीच्या दराने ३६ टक्क्यांचे शिखर गाठले. आता बचतीचा दरात पुन्हा घट होत असून सध्या बचतीचा दर ९ टक्के दरम्यान आहे. भारतीय नागरिक त्यांच्या उभोगासाठी कर्जातील वाढ हा वाढत्या उपभोगाचा परिणाम आहे. भारतीय नागरिक त्यांची मिळकत विविध गोष्टींसाठी (उपभोगासाठी) खर्च करीत असल्याने बचतीत घट झाली आहे. घटत्या बचतदराबाबत अर्थतज्ञ चिंतीत असले तरी वाढता उपभोग लक्षात घेता ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो त्या कंपन्यांत गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करता येते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
उपभोग (कंझम्शन) ही थीम दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी पोर्टफोलिओमध्ये कधीही समावेश करावा अशी गोष्ठ आहे. या थीम अंतर्गत मनोरंजन, सुट्टीतील पर्यटन, जीवनावश्यक गोष्टी, आदरातिथ्य आणि अगदी आरोग्या निगेवरील खर्च आदींचा समावेश होतो. या क्षेत्रातील कंपन्या निवडण्यास म्हणूनच विस्तृत वाव असून उद्योगांच्या विविध क्षेत्रांत ग्राहकांनी केलेल्या खर्चाचा समावेश ‘उपभोगा’ अंतर्गत होतो. दहा वर्षांपूर्वी उपभोगांतर्गत केवळ एफएमसीजी सारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होत होता. बदलेल्या परीस्थित एफएमसीजी, क्यूएसआर, हवाई प्रवास, प्रवासी वाहने, पेये, दळणवळण, मनोरंजन इत्यादी उद्योगात असणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करणे शक्य होत आहे. ज्या फंडाच्या गुंतवणुकीत या उद्योगांतील कंपन्यांचा समावेश असलेल्या निप्पॉन इंडिया कंझम्शन फंडाचा गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा.
अमर काळकुंद्रीकर हे निप्पॉन इंडिया कंझम्शन फंडाचे २० ऑक्टोबर २०२० पासून निधी व्यवस्थापक आहेत. श्री काळकुंद्रीकर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए केले असून त्यांनी वाणिज्यविषयात पदवी घेतली असून ते सीए, सीएफए पात्रता धारक आहेत. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये जबाबदारीभूषवत होते. त्यांनी गुंतवणूकी समंधी ते अनेक भूमिकांतून ते वावरले आहेत. कन्झ्युमर स्टेपल्स, कन्झ्युमर डीसक्रिशनरी, रिटेल, बांधकाम साहित्य यासारख्या विविध उद्योग क्षेत्रांशी समंधीत कंपन्यांचे समभाग संशोधन त्यांनी केले आहे. हा फंड २० एप्रिल २०१८ पूर्वी निप्पॉन इंडिया मिडिया अँण्ड एन्टरटेनमेंट फंड म्हणून ओळखला जात होता. सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर हा फंड निप्पॉन इंडिया कंझम्शन फंड म्हणून ओळखला जावू लागला.
फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर मारुती सुझुकी या सारख्या कंपन्यांनी एप्रिल जून तिमाहीच्या निकालांवर भाष्य करून असे सूचित केले की वर्ष २०२२ मध्ये महागाईमुळे त्यांच्या उत्पादनांच्या मागणीत घट झाली होती. तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झालि. परिणामी नफ्याचे प्रमाण घटले. या पार्श्वभूमीवर (एप्रिल जून २०२३या कालावधीत) मागणीत वाढ दिसून आली असून महागाईकमी झाल्याने नफ्याचे प्रमाण सामान्य होत आहे. विक्री वाढविण्यासाठी कंपन्या जाहिरातींच्या खर्चाला चालना देण्यास सज्ज झाल्या आहेत. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२२ हा सर्वात वाईट मंदीचा कालावधी संपुष्टात आला असून गणपती ते दिवाळी या उत्सवी हंगामात कंपन्या नवीन उत्पादने बाजारात उतरविण्यास सज्ज झाल्या आहेत. मॅरिको सारख्या कंपन्या नफ्याचे अधिक प्रमाण असलेली आरोग्यदायी खाद्यपदार्थ, निरोगीपणा, पुरूषांची सौदर्यप्रसाधने, न्यूट्रास्युटिकल्स इत्यादीसारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्याची रणनीती आखत आहेत. दुसऱ्या बाजूला रिझर्व्ह बँकेचे ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक (कन्झ्युमर कॉंफीडंस इंडेक्स) सकारात्मक संकेत देत आहे. अत्यावश्यक आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यात जानेवारी २०२३ पासून लक्षणीय सुधारणा झाली आहे. वर्तमान परिस्थिती निर्देशांकात चांगल्या पुनर्प्राप्तीचे संकेत नजीकच्या काळात मागणीत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. वाढत्या महागाईने २०२२ मध्ये सर्वच ग्राहकाभिमुख उत्पादनांच्या मागणीत घट झाली होती. एप्रिल २०२३ पासुन बदलाचे संकेत दिले आहेत. वर्ष २०२२च्या चारही तिमाहीत कंपन्यांच्या ग्रामीण भारतातील मागणीत सातत्याने घट होत होती. एप्रिल-जून २०२३ पासून आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ३ टक्के वाढ झाली असून गैर-खाद्य श्रेणींमध्ये मूल्यवृद्धी झाल्याचे आढळले.
पुनर्प्राप्ती पूर्ण होणे अद्याप बाकी असताना, बाजाराला सणासुदीच्या हंगामात (गणपती ते दिवाळी) ग्राहकांकडून वरील बाबींवर मोठा खर्च होण्याच्या अपेक्षेने ‘निफ्टी कंझंम्शन निर्देशांकातील वाढ निफ्टीच्या वाढीपेक्षा अधिक आहे. परंतु निर्देशांकात वाढ होऊनही ‘निफ्टी कंझंम्शन निर्देशांकाच्या मूल्यांकनात (पीई) घट झाली आहे. त्यामुळे, सध्याचे मूल्यांकन सरासरीच्या आत राहिले आहे.
या फंडाच्या परिघात असलेल्या उद्योगांचा जीडीपी मधील वाटा ६१ टक्के आहे. म्हणूनच निप्पॉन इंडिया कंझम्शन फंड हे संपत्ती निर्मितीचे दीर्घकाळ साधन ठरू शकते. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आता आपल्या साखळी विस्तार लहान शहरांत करत आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये – जसे की खाद्यपदार्थ, वैयक्तिक निगा, गृहनिगा, प्रवासी वाहन, तयार कपडे, पर्यटनासाठी होणारा प्रवास इत्यादी उत्पादन आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. वैयक्तिक उपभोगात मोठे बदल होतांना दिसत आहेत. त्यामुळे ही वाढ वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे शाश्वत ठरेल असे संकेत मिळत आहेत. घरगुती उत्पादने (देशांतर्गत बाजारपेठेत मागणी असलेली उत्पादने आणि सेवा) कंपन्यांसाठी हा सकारत्मक संकेत असून कंपन्यांची नफा क्षमता वाढेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे. विविध आर्थिक अहवाल देशाच्या दरडोई उत्पन्नातील वाढीचे वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात. सध्याच्या २४५० अमेरिकी डॉलर्सवरून आर्थिक वर्ष २०३० मध्ये दरडोई उत्पन्न ४००० अमेरिकी डॉलर्सवर पोहोचलेले असेल असा अंदाज या आर्थिक अहवालांनी व्यक्त केला आहे. वाढत्या घरगुती उत्पन्नातील वाढ आणि उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांची वाढती संख्या यामुळे विवेकाधीन खर्चात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या अंदाजानुसार, विवेकाधीन खर्च आर्थिक वर्ष-२२ मधील ७४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष ३० पर्यंत ७९ टक्के असेल असा अंदाज आहे.
वर्तमानात अशा संधी लहान दिसत असल्या तरी भविष्यात या संधींचे रुपांतर मोठ्या संधीत होण्याची शक्यता निधी व्यवस्थापकांना वाटत आहे. भविष्यात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणारी अनेक उत्पादने ‘प्रोडक्ट लाईफ सायकल’च्या सुरवातीच्या टप्प्यावर आहेत. सेक्टरल फंडाच्या गुंतवणुकीत ८० टक्के गुंतवणूक त्या सेक्टरमध्ये करणे सक्तीचे असते उर्वरित २० टक्के गुंतवणूक सेक्टर बाहेर करतांना सशक्त ताळेबंद असलेल्या आणि परिचित नाममुद्रा (स्ट्रॉग ब्रँडस्) असलेल्या कंपन्यां ज्यांचा भांडवली परतावा (आरओसी) समाधानकारक आहे गुंतवणूकीसाठी निवडल्या जातात. यामुळे ग्राहकांच्या विवेकाधीन वस्तू म्हणजे अनावश्यक वस्तू ज्याची ग्राहकांना दररोज आवश्यकता नसते. अशा वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तू, वाहने, सुट्ट्यातील पर्यटन, फास्ट फूड, तयार फर्निचर आणि उपकरणे यांचा समावेश होतो. दुसरीकडे कपडे, अन्न, पेये, घरगुती वापराच्या वस्तू ज्या सध्या ज्या कुटुंबांसाठी चैनीच्या वस्तू आहेत त्या आवश्यक बाबी ठरतील. उपभोगा अंतर्गत येणाऱ्या उद्योगक्षेत्रांची श्रेणी विस्तृत आहे, या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वैयक्तिक वापराच्या वस्तू दागिने, रंग आणि गृह सजावटीच्या वस्तू, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, कपडे, फुटवेअर, क्विक सर्व्हि रेस्टॉरंट्स वाहन आणि या साठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
कंझम्शन फंडांमधून निप्पॉन इंडिया कन्झम्पशन फंडाची निवड अनेक गोष्टींवर केली आहे. अमर कालकुंद्रीकर हे निप्पॉन कंझम्पशन फंड पोर्टफोलिओमधील कंपन्यांत नफा वसुली करण्यात आणि आवश्यक तेव्हा गुंतवणुकीतून बाहेर पडण्यात पारंगत आहेत. ताज्या उपलब्ध पोर्टफोलिओ नुसार ५० टक्के लार्जकॅप १९ टक्के मिडकॅप आणि २४ टक्के स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. सर्व कंझम्शन फंडांचा विचार करता सर्वाधिक स्मॉलकॅप कंपन्या निप्पॉन इंडिया कंझम्शन फंडाच्या गुंतवणुकीत आहेत.
निप्पॉन इंडिया कंझम्शन फंडाची निवड फंडाची कामगिरी आणि पोर्टफोलिओ या दोन्हींमुळे करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फंड ‘निफ्टी कंझंम्शन निर्देशांकाच्या तुलनेत सतत आठ तिमाही सरस परतावा दिलेला फंड आहे. मागील ३ वर्षे आणि १ वर्षाच्या कालावधीत फंडाने सर्व कालावधीत निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. कामगिरीच्या सातत्यामुळे या फंडाने एसबीआय कंझंम्शन, आयसीआयसीआय पृडेनशिअल एफएमसीजी आणि मिरॅ असेट ग्रेट कंझ्युमर फंडांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. निप्पॉन कंझम्पशनचा सध्याचा पोर्टफोलिओ इतर कंझंम्शन फंडांपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आहे. तुमच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओमधला म्हणूनच हा एकमेव सेक्टरल फंड असू शकतो किंवा या फंडात गुंतवणूक करून तुम्ही १२ ते १५ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक राखू शकता. एक रणनीती म्हणून या फंडातील गुंतवणूक नक्कीच सुगीचे दिवस दाखवू शकेल.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top