लखलखते जणू शुक्राची चांदणी

 

मिरॅ असेट टॅक्स सेव्हर फंड हा इएलएसएस फंड गटातील नावाखा परंतु उत्तम परतावा असलेला फंड आहे. ज्या कोणी तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.५ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे १९ डिसेंबर २०१८ च्या एनएव्हीनुसार २.५२ लाख झाले आहेत. येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी तीन वर्षे पुरी करत आहे. फंडाने सुरवातीपासून १६.९२% वार्षिक परतावा दिला आहे. निलेश सुराणा हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ३० नोव्हेंबरच्या ‘फॅक्टशीट’ नुसार फंडाची मालमत्ता १२०९ कोटी आहे. बँकेने किंवा औद्योगिक घराण्याचे प्रवर्तन नसूनही  फंडाला तीन वर्षे पुरी होण्याआधी १ हजार कोटींच्या मालमत्तेचा टप्पा पार फंडाने पार केला आहे.

आयकराच्या कलम ८० (सी) खाली उपलब्ध पर्यायांपैकी इएलएसएस फंड या गुंतवणूक साधनाने सर्वाधिक परतावा दिला आहे. मागील दहा वर्षात इएलएसएस फंडांनी कर बचती व्यतिरिक्त वार्षिक १८.३४ टक्के वृद्धी दर राखला आहे५ वर्षे मुदतीच्या करकपातप्राप्त मुदत ठेवींनी वार्षिक परतावा ५.३२ सार्वजनिक भविष निर्वाह निधीतील गुंतवणुकीतून वार्षिक परतावा ८.७८ % तर पारंपारिक विमा पॉलिसीतील गुंतवणुकीतून विमाछत्रा व्यतिरिक्त वार्षिक परतवा ५.३२ टक्के मिळाला आहे. कर बचतीव्यतिरिक्त संपत्तीची निर्मिती करण्यासाठी इएलएसएस फंडा व्यतिरिक्त अन्य गुंतवणूक साधने बिनकामाची आहेत. शुद्ध विमा, इएलएसएस फंड आणि अतिरिक्त ५० हजार एनपीएस मधील गुंतवणूक ही करबचतीची त्रिसूत्री आहे. कमावत्या वयात १२ हजार २५ वर्षे  नियोजनबद्ध पद्धतीने गुंतविल्या व गुंतवणुकीवर १२ टक्के चक्रवाढ परतावा मिळेल असे गृहीत धरल्यास ३६ लाखाच्या गुंतवणुकीचे २.२७ कोटी मिळविणे सहज शक्य आहे. बाजारातील चढ उतारांना निर्धारपूर्वक सामोरे गेल्यास इएलएसएस फंडाच्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्य आहे.

निलेश सुराणा निधी हे मिरॅ असेट टॅक्स सेव्हर फंडा सोबत मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड, मिरॅ असेट इमर्जिंग ब्ल्यूचीप फंड आणि मिरॅ असेट हायब्रीड इक्विटी फंड या फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या ३० नोव्हेंबरच्या ‘फॅक्टशीट’ नुसार फंडाने सर्वाधिक ७३.५७ टक्के गुंतवणूक लार्जकॅपमध्ये २३.१५ टक्के गुंतवणूक मिडकॅप मध्ये २.०९ टक्के गुंतवणूक स्मॉलकॅप तर उर्वरीत गुंतवणूक आभासी रोकड प्रकारात केली आहे. एचडीएफसी बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक, आणि कोटक महिंद्रा बँक या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पाच कंपन्या आहेत. पहिल्या पाच गुंतवणुका जास्त केंद्रित असल्या तरी उर्वरित गुंतवणुकांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

२००८ ते २०१८ या कालावधीत निलेश सुराणा निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची कामगिरी लखलखीत राहिलेली आहे. दर्जेदार उत्पादने असलेल्या कंपन्या, उत्तम व्यवस्थापन आणि आकर्षक मुल्यांकन ही निधी व्यवस्थापकांची यशाची त्रिसूत्री आहे. बँका आणि वित्तीय सेवा उद्योग मागील बारा तिमाहीत सर्वात अधिक गुंतवणूक असणारेउद्योग क्षेत्र आहे. अन्य निधी व्यवस्थापक ‘सेक्टर रोटेशन’मुळे नफा कमवत असतांना मिरॅ असेटच्या सर्वच फंडांचा नफा हा योग्य मूल्यांकनात योग्य कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झाल्याने मिळाला आहे. फंडाने पहिला लाभांश मार्च २०१७ मध्ये (०.५०) दुसरा मार्च २०१८ (१.२५) तर तिसरा लाभांश डिसेंबर २०१८ (०.५५) जाहीर केला आहे. सर्व साधारणपणे फंडाने ३ वर्षे पूर्ण केल्यानंतर मोर्निंग स्टार आणि व्हॅल्यूरिसर्च फंडाचे रेटिंग जाहीर करतात. अनेक बँका त्या नंतर हे फंड आपल्या ग्राहकांना विकतात. साहजिकच फंडांना बँका मोठी गुंतवणूक मिळवून देतात. या फंडाला येत्या शुक्रवारी ३ वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील आठवड्यात या फंडाचे रेटिंग जाहीर होईल. फंडाची तीन वर्षाची कामगिरी पाहता या फंडाला किमान ‘फोर स्टार रेटिंग’ मिळेल अशी अशा बाळगायला वाव आहे. या गृहितकावर हा फंड पुढील वर्ष दोन वर्षात ५ हजार कोटींचा टप्पा गाठेल. म्हणूनच या वर्षातील शेवटची शिफारस म्हणून मिरॅ असेट टॅक्स सेव्हर फंडाची निवड केली.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top