कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा…

 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडाचा मागील एक वर्षाचा परतावा गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकणारा आहे २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप १६१४७.९७ वर बंद झाला होता. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप निर्देशांक १३८३४.५ वर बंद झाला. वर्षभरात मिडकॅप निर्देशांकात १४ टक्क्यांची तर १ जनेवारी २०१८ पासून २० टक्क्यांची घसरण झाली. तर  २३ ऑक्टोबर २०१७ ते २४ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत लार्जकॅप निर्देशांकात ३ टक्क्याची वाढ झाली. सेंसेक्स आणि निफ्टी हे बाजाराचे मुख्य निर्देशांक ७ महिन्यांच्या तळाला आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये मिडकॅप फंडांचा परतावा १६ ते १७ टक्क्यादरम्यान होता. साहजिकच आजपासून एका वर्षापूर्वी ज्यांना नवीन गुंतवणूक करायची होती त्यांनी मिडकॅप फंडाची निवड केली. ही निवडच निद्रानाशाला कारण ठरली आहे. देवाला वाहण्यासाठी बाजारातून आणलेल्या काळ्या फुलण्यापूर्वीच कोमेजून जाव्या आणि त्याचे निर्माल्य झाल्याप्रमाणे  गुंतवणूकदारांची अवस्था झाली आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या ऱ्हासाला ज्या गोष्टी करण ठरल्या त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास वाढती वाढते व्याजदर, वित्तीय तुट, परदेश व्यापारातील फरक (बॅलंस ऑफ पेमेंट) या गोष्टी अर्थकरणाला हिताच्या नसल्याची भती वाटते. सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा (कंपनी संदर्भात) विचार केल्यास गोष्टी वाटल्या तितक्या वाईट नसल्याचा दिलासा मिळतो. ज्या कंपन्यांचा ताळेबंद सुस्थितीत आहे ज्या कंपन्यांनी अतिरिक्त कर्ज घेतलेले नाही त्यांना देशांतर्गत व्याज दर वाढीचा फटका सध्या बसला असला तरी निधी व्यवस्थापकांनी स्थितीतील ताळेबंद असलेल्या कंपन्यांचे समभागांचा गुंतवणुकीत समावेश केल्याने सध्याचा कठीण काळ संपल्यावर याच कंपन्यांचे समभाग वधारतांना दिसतील. जगभरात २००८ पासून मध्यवर्ती बँकांकडून स्वस्त झालेला पत पुरवठा आता धोरण मध्यवर्ती बँकांच्या बदलामुळे संकुचित होण्यास सुरवात झाली आहे. मागील बारा महिन्यांत अमेरिकेच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर ४ टक्के असून व्याजदर वाढवत पत पुरवठयास आवर घालण्याचे धोरण अर्थकारणाच्या मुलभूत तत्त्वांनुसार आहे. जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थेत पत पुरवठा आकुंचित होतो तेव्हा तेव्हा या धोरणाचा विपरीत परिणाम स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांवर होतो. कारण दीर्घकालीन मुदतीच्या कर्जापासून खेळत्या भांडवला पर्यंत सर्वच कर्जासाठी या कंपन्या बँकांवर अवलंबून असतात. वाढते व्याजदर आणि आकुंचित पतपुरवठा यांचा परिणाम स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांवर झाला असून त्यात विपरीत असे काही घडलेले नाही.

 

 

या कंपन्यांचा नफ्याचा वृद्धीदर एकावर्षापूर्वी १० ते १२ टक्के होता. या सदरातून सुचविलेले मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंडांच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्याच्या जूलै सप्टेंबर तिमाहीच्या नफ्याच्या वृद्धीदरांत फार फरक पडलेला नाही जितकी या फंडाच्या ‘एनएव्ही’ घसरण झालेली आहे. सेबीच्या नवीन वर्गीकरणनुसार कंपनीच्या भांडवली मूल्यनुसार क्रमवारीतील  १०१ ते २५० क्रमांकाच्या कंपन्या मिडकॅप समजल्या जातात. म्युच्युअल फंडाच्या वर्गीकरणापूर्वी मिडकॅप फंडात या कंपन्यांतून सरसरी ३५ टक्के गुंतवणूक होती. सेबीच्या नवीन नियमानुसार एखाद्या फंडाला ‘मिडकॅप फंड’ म्हणऊन घेण्यासाठी त्या फंडाची मिडकॅप समभागांत किमान ६५ टक्के गुंतवणूक राखणे अनिवार्य आहे. फंडाच्या गुंतवणुकीतील मिडकॅप मात्रा वाढल्याने साहजिकच फंडाच्या एनएव्हीत वेगाने चढ उतार होत आहेत. मिडकॅप गुंतवणुकीवर होत असलेल्या तोट्यामुळे थरकाप उडण्याचे जराही कारण नाही.

मालमत्तेचे विभाजन हे वित्तीय नियोजनातील महत्वाचे अंग आहे. वित्तीय नियोजन करतांना मिडकॅपची मात्रा वित्तीय ध्येयांची पूर्ती होण्यास शिल्लक असलेला कालावधी आणि गुंतवणूकदाराचा जोखीमांक या वर निश्चित होत असते. मिडकॅप गुंतवणुकीत तोटा होता म्हणून मिडकॅप फंडातील एसआयपी थांबविणे किंवा मिडकॅपमधून पैसे काढून घेणे म्हणजे वित्तीय नियोजनात निश्चित केलेल्या ध्येयांपासून विचलित होणे होय. एका वर्षीपूर्वी मिडकॅपमध्ये नव्याने गुंतवणूक करणे हे धोकादायक होते. या सदरातून मिडकॅप फंडात एसआयपी किंवा एसटीपीच्या पद्धतीने गुंतवणूक करण्याची शिफारस केली होती. सध्याचे मुल्यांकन पाच ते सात वर्षासाठी पोषक आहे. मिडकॅप गुंतवणुकीची मात्रा ज्यांना वाढविणे जोखमीचे वाटत असेल त्यांनी निदान आहे त्या फंडात एसआयपी थांबऊ नये हा आग्रह.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top