नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव

 

चालू वर्षात भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या राक्कमेहून सर्वाधिक रक्कम आहे. दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मिळून सर्वाधिक ‘सिप’ची नोंदणी झाल्याचे दिसून आल्याचे वृत्त म्युच्युअल फंड विषयक वार्तांकन करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. फटाक्याचा दणदणात आणि सोन्याची चमक फिकी पडणाऱ्या या दिवाळीत ‘एसआयपी’ची विक्रमी नोंद झाली आहे. या वर्षी दिवाळी मागील वर्षाच्या तुलनेत २२ दिवस उशिरा आल्याने नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर होईल तेव्हा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या रक्कमेने ८ हजार कोटींचा टप्पा पार केला असेल. आर्थिक वर्षाच्या आठव्या महिन्यांत असल्याने आयकर नियोजनाच्या दृष्टीने कमी कालावधी राहिला असल्याने फंड गटाच्या सरासरीहून अधिक परतावा दिलेल्या एका इएलएसएस फंडाची ही ओळख.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान हा इएलएसएस फंड गटातील २० वर्षे जुना फंड आहे. इएलएसएस फंड गटात सर्वाधिक रोख रक्कम बाळगणारा फंड असल्याने मागील एका वर्षात बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम झालेला हा फंड आहे. एका वर्षापूर्वीच्या गुंतवणुकीची कामगिरी सोबतच्या कोष्टक  मध्ये दिली आहे.

 

या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे ९ मार्च २०१५ पासून सचिन रेळेकर यांच्याकडे आहेत. फंडाची गुंतवणूक मल्टीकॅप फंडाप्रमाणे असून फंडाच्या मालमत्तेत ४७.२९ टक्के लार्जकॅप, ३०.५६ टक्के मिडकॅप, २.८७ टक्के स्मॉलकॅप प्रकारचे समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीचा २० टक्के हिस्सा आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीत आहे. त्या खालोखाल अनुक्रमे खाजगी बँका, वित्तीय कंपन्या, रसायने, वाहन आणि वाहन निर्मिती या उद्योगातून गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनांस, विनती ऑरगॅनिक्स, सिटी युनियन बँक,रिलायंस इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, अॅव्हेन्यू सुपरमार्ट, कोटक महिंद्रा बँक, आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. निर्देशांक जसे नवीन उच्चांक गाठू लागले तसेतसे निधी व्यवस्थापक नफा वसुली करून आभासी रोकड प्रकारच्या गुंतवणुकीतील हिस्सा वाढवत गेले. बाजार घसरणीचा सर्वात कमी परिणाम या फंडावर झाला. अनेकदा फंडाच्या प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा निधी व्यवस्थापक फंड घराणे इत्यादी बाबींवर फंडाची गुंतवणुकीसाठी निवड केली जाते. एलआयसी फंड घराण्याच्या वास्तवापेक्षा त्याच्या इतिहाचीच चर्चा अधिक होते. वास्तवात या फंड घराण्याचे निवडक फंडांची कामगिरी नजीकच्या वलयांकीय स्पर्धक फंडांच्या तुल्यबळ आहे. विद्यमान निधी व्यवस्थापक रेळेकर यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून फंडाची तुलनात्मक कामगिरी कोष्टकमध्ये दिली आहे.

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान या फंडाची कामगिरी अन्य इलएसएस फंडाच्या कामगिरीच्या जवळपास जाणारी असल्याने आयकराच्या कलम ८० सी खाली उपलब्ध असलेल्या वजावटीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या करदात्यांनी एलआयसी एमएफ टॅक्स प्लानचा गंभीरपणे गुंतवणुकीसाठी विचार करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top