मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणता म्युच्युअल फंड घ्याल?

कुटुंबात जेव्हा एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबांला आनंद होतो. परंतु नवीन सदस्याच्या आगमनासोबत नवजात बालकाच्या आईवडिलांवर मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या येतात. हल्ली पालक सजग झाल्याने मूल जन्माला येताच पालकांना त्या नावजात शिशूच्या भविष्यातील खर्चाची चिंता वाटू लागते. मुलाचे शिक्षण आईवडिलांच्या आवाक्यात असेल याची खात्री देता येत नसल्याने मुलाच्या वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी करावी लागणारी तरतूद पुरेशी असेल की नाही, ही चिंता त्या बालकाच्या आगमनाचा आनंद पुरेपूर उपभोगता येत नाही. पालकांसाठी, शिक्षण हा खर्च नसून ती एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. मध्यंतरी व्हॉटसअॅप आलेला एक विनोद वाचनात आला. सरकारने करोडो रुपये खर्च करून देखील कुटुंब नियोजनाला जे यश आले नाही ते यश खाजगी शाळांच्या वाढत्या शैक्षणिक शुल्कांमुळे आटोक्यात आले.
उदारीकरणाला तीस वर्षांहून अधिक काळ लोटला. उदारीकरणामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ उदारीकरणाला सुरवात झाली तेव्हा अर्थतज्ञ (एकोनॉमिस्ट) म्हणून फार कमी संधी उपलब्ध होत्या. महाविद्यालयात प्राध्यापक होणे किंवा रिझर्व्ह बँक आणि शासकीय संस्था वगळता एकोनॉमिस्ट म्हणून करिअर करण्यास मर्यादित संधी उपलब्ध होत्या. गेल्या पंचवीस वर्षात एकोनॉमिस्ट म्हणून अर्थार्जन करण्यास शासकीय आस्थापनांसोबत खाजगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. करिअरसाठी विवध पर्याय उपलब्ध असल्याने मुलांचा कल त्यांना रुची असलेल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यात करिअर करण्याचा मुलांचा मानस असतो. दिवसेंदिवस परदेशी विद्यापीठांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने, अलीकडच्या वर्षांत उच्च शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. शैक्षणिक खर्चाची तरतूद करण्याची चिंता बहुतेक पालकांना चुकीच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करते. बहुतेक बचतकर्ते पारंपरिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. तथापि, जर आपण वाढत्या महागाईचा विचार केला, तर विमा उत्पादने, मुदत ठेवी या सारख्या पारंपारिक साधनांतून मिळणारा परतावा अपेक्षित उद्दिष्टे गाठण्यासाठी मुळीच पुरेसा नसतो. तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ एकरकमी आणि महागाईच्या दरापेक्षा तुलनेत अधिक दराने परतावा हवा असेल तर योग्य गुंतवणूक साधन निवडणे महत्त्वाचे आहे.
बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाने बडोदा बीएनपी परिबास चिल्ड्रन फंड उपलब्ध केला सून फंडाचा एसएफओ ६ ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत खुला आहे. या फंडात गुंतविलेली रक्कम कमीत कमी ५ वर्षे किंवा मुल १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे आधी होईल ते) काढता येणार नाही. या फंड गुंतवणुकीस कायम खुला असलेला (ओपन-एंडेड) आणि समभाग गुंतवणूक करणारा फंड आहे. शैक्षणिक खर्च हे सामान्य चलनवाढीपेक्षा अधिक दराने वाढतात. बडोदा बीएनपी परिबा चिल्ड्रेन्स फंड हा एक विशिष्ठ लक्ष्य निर्धारित करून गुंतवणूक करणारा (सोल्युशन ओरीएंटेड) फंड आहे. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करू पाहणाऱ्या पालकांना, त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनाशी सुसंगत शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय देणारा हा फंड आहे. या फंडात गुंतवणूक करून, पालक त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करू शकतात. हा फंड समभाग केंद्रित गुंतवणुकीद्वारे उच्च-संभाव्य परतावा मिळवून महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवू शकेल.
लक्ष्य केंद्रित गुंतवणुकीत यशस्वी होण्याच्या पाच पायऱ्या’ आहेत.
नियोजन
पहिली पायरी म्हणजे सुयोग्य नियोजन. मुलाचे शालेय शिक्षण, पदवीपर्यंत शिक्षण आणि पदव्योत्तर शिक्षणासाठी किती खर्च करावा आल्गेल आणि शिक्षण सुरु होण्यास किती कालावधी शिल्लक आहे याचा आढावा घेऊन लवकरात लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. जितक्या लवकर एसआयपीला सुरवात कराल तितका कालावधी तुमची गुंतवणूक वाढण्यास उपलब्ध असतो.
पद्धतशीर मासिक गुंतवणूक करून जा
मोठ्या खर्चाची तरतूद करण्यास दीर्घकालीन एसआयपी हे एक उत्तम साधन आहे. नियमित गुंतवणुकीमुळे बाजारातील अस्थिरतेवर मात करता येते आणि चक्रवाढ दराने लाभ घेता येतो. नियोजनबद्ध मासिक गुंतवणूक वर्षानुवर्षे केल्यास अशक्य वाटणारा मोठा निधी सहज उपलब्ध होतो. पालकाने आपल्या नवजात शिशूसाठी मासिक ५००० रुपयांची एसआयपी १५ वर्षांसाठी केल्यास आणि वार्षिक १२ टक्के दराने परतावा मिळाल्यास सुमारे २५ लाख रुपये उपलब्ध होतील.
गुंतवणूक समभाग संलग्न फंडात हवी.
वेगवेळ्या मत्तावर्गांनी दिलेल्या मागील परताव्याचा विचार केल्यास समभाग समर्थित मालमत्ता वर्गाने दीर्घ कालावधीत सर्वाधिक परतावा दिला आहे. तथापि, सामान्य गुंतवणूकदाराला कंपन्यांचे संशोधन करणे कठीण जाते. म्हणून त्याने समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांची निवड केली पाहिजे.
प्रत्येक वित्तीय उद्दिष्ठांसाठी वेगवेगळी गुंतवणूक हवी
प्रत्येक उद्दिष्टासाठी गुंतवणुकीची व्याख्या आणि विलगीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योग्य गुंतवणूक नियोजन तयार करण्यासाठी आर्थिक सल्लागार मदत करू शकतात. तुमच्या ध्येय साध्य करण्यास १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी असेल, तर समभागगुंतवणूक करणाऱ्या फंडात जास्त मात्रा असायला हवी.
वेळोवेळी गुंतवणूकीचा आढावा घ्यावा.
रोज गुंतवणुकीचे मूल्य बघून काळजी करत बसण्यापेक्षा निधी व्यवस्थापक आणि इंडिया ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवा. पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला कोणते बदल करावे लागतील याचा वर्षातून एकाद आढावा घेणे योग्य ठरते. घ्या.
वर उल्लेख केलेल्या कार्यपद्धतींशी बडोदा बीएनपी परिबा चिल्ड्रन्स फंड सुसंगत कार्य पद्धती असणारा फंड आहे. साधारण रिटायरमेंट आणि चिल्ड्रेन फंडात अनिवार्य ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असल्याने निधी व्यवस्थापकांना कॅश कॉल घ्यावे लागत नाहीत. परिणामी परतावा अन्य फंड गटापेक्षा उजवा असतो. शैक्षणिक महागाई दर वार्षिक सरासरी ११ टक्के असताना, हा फंड या पेक्षा अधिक परतावा देईल असे मानण्यास वाव आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हहा एक आदर्श साधन आहे. वाढत्या शैक्षणिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी महागाई-समायोजित वृद्धीदर शोधणाऱ्या पालकांना हा फंड नक्कीच समाधानी ठेवेल.