अंतरर्यामी सूर गवसला…

मागील तिमाहीतील फंडांचा त्रैमासिक आढावा मह्तवाचा आहे मागील तिमाही ही निफ्टीने कमाई केलेल्या दहा वर्षातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील तिमाहीतील ५८ कामकाजाचे दिवस होते. या काळात निफ्टीने १५७४ अंशाची कमाई केली. ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंडांच्या यादीत इक्विटी, डेट आणि हायब्रीड म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचा त्रैमासिक आढावा घेतला जातो. तीन वर्षे पूर्ण केलेल्या हजारो फंडांमधून गुंतवणूक योग्य फंडांची शिफारस केली जाते. वेगवेगळ्या शैलींमध्ये पसरलेल्या फंडांच्या संक्षिप्त यादीत फंड फंडांची कामगिरी, गुंतवणूक पोर्टफोलिओ आणि गुंतवणूक धोरणांवर आधारित निवडले जातात. ही निवड करण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक निकष फंड शिफारशींपर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जातात. इक्विटी आणि हायब्रिड फंडांसाठी जोखीम पातळी (रिस्क) आणि डेट फंडातील कालमर्यादा (ड्युरेशन) यावर आधारित गुंतवणूक योग्य आणि टाळावे अशा दोन गटात उपलब्ध फंड विभागले जातात. सेबीच्या सर्व वर्गवारी वापरण्याऐवजी ही यादी कमी करण्याच्या उद्देशाने घटकांकडेही लक्ष देले जाते. या यादीचे दर तिमाहीत पुनरावलोकन करण्याचे उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की भविष्यात उपलब्ध कोणत्याही चांगल्या संधी गमावू नये आणि सतत चार तिमाही गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडाला शिफारसप्राप्त फंडांच्या यादीतून वगळले जाते. एका वर्षापूर्वी या यादीतून अॅक्सीस लार्जकॅप अॅक्सीस मिडकॅप अॅक्सीस फोकस्ड २५ या फंडांना राजा देण्यात आली. त्या नंतर या फंडांच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचा अनुभव गुंतवणूकदारांनी घेतला असेल. या फंडांत गुंतवणूक केली असल्यास नक्की काय करावे याचे विवेचन या पुनारावालोकानाच्या निमिताने केले जाते. वगळलेल्या फंडातून गुंतवणूक काढून घ्यावी किंवा फक्त एसआयपी थांबावावी, याचे विवेचन केले जाते. थोडीशी घसरण असेल तर राखून ठेवण्याची शिफारस केली जाते, किंवा आवश्यक तेथे निधी व्यवस्थापनाकडून प्रसंगी त्यांची बाजू समजून घेतली जाते. फंड यादीचे पुनरावलोकन हा सततचा ध्यास असतो. उदाहरण द्यायचे झाले तर पीजीआयएमच्या कामगिरीत घसरण झाल्यावर नवीन गुंतवणूक प्रमुख विनय पहारीया यांच्याशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेचा गोषवारा लवकरच प्रसिद्ध होईल. डिसेंबर २०२२ मध्ये निर्देशांकांनी शिखर गाठल्यानंतर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजार कल विरहित होता. एप्रिल महिन्यांत तेजीचा मागमूस नसतांना शेअर बाजारांनी मेच्यामध्यापासून जोरदार पुनरागमन केले आहे. मेच्या मध्यास सुरवात लार्ज-कॅप पासून झाली असली तरी मे अखेरीपासुन तेजीचा परीघ विस्तारत मिडकॅप आणि स्मॉल-कॅप समभागांनी जोरदार तेजीची सुरवात केली. परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या परिणामांमुळे हे घडले तरी जागतिक बाजार मंदीच्या चिंता दूर सारत असलेले दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरातील वाढ थांबवली असे वाटत असतांना प्रमुख उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या प्रतीसमभाग कमाईत वाढ झाल्याचे तीन तिमाहींनंतर दिसले. (संदर्भ : १० जुलै जादू अशी घडे की)
कंपन्यांच्या प्रतिसमभाग कमाईने ‘यु टर्न’ घेऊन देखील मागील दोन तिमाहीत वगळलेल्या फंडांच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली नाही. या पुनरावलोकनात, कर-बचत म्युच्युअल फंड (इएलएसएस) शिफारशींमध्येही झालेले बदल दाखल घेण्याजोगे आहेत. इएलएसएस फंड गटात, एचएसबीसी, ईएलएसएस, एलआयसी एमएफ टॅक्स प्लान आणि महिंद्रा मॅन्युलाइफ ईएलएसएस या फंडांचा समावेश होता महिंद्रा मॅन्युलाइफ ईएलएसएस यांच्या जोडीला पराग पारीख टॅक्स सेव्हर आणि निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर यांना स्थान देण्यात आले आहे. या त्रैमासिक पुनरावलोकनात दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे मिरॅ लार्जकॅपच्या कामगिरीत पुन्हा या तिमाहीत हा फंड खराब कामगिरी (मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष) करेल अशी चिन्हे दिसत आहेत. तर फ्लेक्झीकॅप गटात कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप १ वर्षाची कामगिरी चिंता जनक असली तरी दीर्घकालीन ३ वर्षांची कामगिरी मात्र अव्वल आहे. या दोन फंडांच्या कामगिरीवर या तिमाहीत विशेष लक्ष ठेवण्यात येईल. या तिमाहीत निर्देशांकांत बदल झाले आहेत. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विनिलीनीकरणामुळे फंड आपल्या गुंतवणुकीत मोठे बदल करीत आहेत. अनेक फंडांनी या आधीच लार्ज-कॅप आयटी समभागांना त्यांच्या मानदंडातील प्रमाणापेक्षा जास्त स्थान दिले असल्याने अशा फंडांची कामगिरी अव्वल असण्याची आशा आहे. दीर्घकालीन कामगिरीच्या जोरावर हे दोन फंड अजूनही कामगिरी सुधारतील असे वाटत असल्याने तात्तापुरते या दोन फंडांना शिफारसप्राप्त यादीतून वगळण्यात येत नसले तरी नाही पुढील तिमाही आढाव्यात यांना वगळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या एसआयपी बंद करू नये असे सूचित करण्यात येत आहे. ऑक्टोबर- डिसेंबर २०२२च्या तिमाही आढाव्यात १ वर्षाच्या कामगिरीवर एसबीआय फोकस्ड इक्विटीच्या कामागिरीबाबत चिंता व्यक्त करतांना या फंडाच्या समावेशा बाबत भविष्यात सूचित करण्यात येईल असे सांगितले होते. ती वेळ आली असल्याने एसबीआय फोकस्ड इक्विटीला या यादीतून काढून- टाकण्यात येत आहे. एसबीआय फोकस्ड फंडाने काही गुंतवणूक परदेशातील कंपन्यांत केली आहे ही रणनीती पूर्णपणे फसली असल्याने या फंडाच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे असमान ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत फंडाची (पाच वर्षाच्या कालावधीत १ वर्षाच्या चलतसरासरीच्या तुलनेत) परतावा ८-९ टक्क्यांपर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे दीर्घ मुदतीच्या परताव्यातही हा फंड सतत मागे पडत आहे. या चढ-उताराच्या कामगिरीमुळे जोपर्यंत परताव्यात स्थैर्य दिसत नाही तोपर्यंत या फंडाला वगळण्यात येत आहे. फोकस्ड फंड गटात बंधन फोकस्ड इक्विटी, एचडीएफसी फोकस्ड ३० एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाची जागा कालच तीन वर्षे पूर्ण झालेल्या एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाने घेतली आहे. नोव्हेंबर महिन्यात एल अॅण्ड टी आणि एचएसबीसी या दोन फंड घराण्यांच्या विलीनीकरणानंतर निधी व्यवस्थापकात बदल झाला होता. या बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाचा विस्तृत आढावा घेण्यात येईल. अॅक्सीस फोकस्ड २५ फंडाची कामगिरी आश्वासक वाटत असली तरी या फंडाचा समावेश करण्याआधी थोडी प्रतीक्षा करावी असे वाटते. कर्त्यांच्या यादीतून वगळलेला दुसरा फंड म्हणजे मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप. एका वर्षापूर्वी जुलै सप्टेंबर २०२२ च्या आढाव्यात एकेकाळच्या या विजेत्या फंडाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळच्या झालेल्या मिड-कॅप्समधील घसरणीला मुळे या फंडाची कामगिरी खालावल्याचे नमूद केले होते. मात्र, सरलेल्या एप्रिल जून २०२३ तिमाहीत मिडकॅपनी चांगली कामगिरी करून देखील या फंडाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. सध्या हा फंडाची दीर्घ कालीन (५ वर्षे आणि ३ वर्षे) तसेच नजीकच्या काळातील ( तीन वर्षे कालावधीतील १ वर्षे चलत सरासरी) कामगिरी (जून २०२२) पासून निफ्टी लार्ज अँण्ड मिडकॅप २५० च्या तुलनेत ५ ते ६ टक्के टक्के खालावली आहे. तथापि, बाजार सध्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांसाठी अनुकूल आहे हे लक्षात घेता, फंडाची खालावत असलेली असलेली कामगिरी भविष्यातील धोक्यांची चाहूल आपल्याला सावध करते. या सर्व कारणांमुळे, सध्या या फंडात नवीन गुंतवणूक (एसआयपी किंवा एक रक्कमी) थांबविण्याची शिफारस आहे.
लार्जकॅप

निप्पॉन इंडिया लार्जकॅप

एचडीएफसी टॉप १००

एडेलवाईज लार्जकॅप

मल्टीकॅप

निप्पॉन इंडिया मल्टीकॅप

एचडीएफसी मल्टीकॅप

बरोडा बीएनपी पारीबास

मिडकॅप

एचडीएफसी मिडकॅप

महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप

अॅक्सीस मिडकॅप

फ्लेक्झीकॅप

पीजीआयएम फ्लेक्झीकॅप

एचएसबीसी फ्लेक्झीकॅप

निप्पॉन इंडिया फ्लेक्झीकॅप

ईएलएसएस

एचएसबीसी ईएलएसएस

एलआयसी एमएफ टॅक्स प्लान

महिंद्रा मॅन्युलाइफ ईएलएसएस

फोकस्ड फंड

बंधन फोकस्ड इक्विटी

एचडीएफसी फोकस्ड ३०

एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंड

लार्ज अॅण्ड मिडकॅप

एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप

युटीआय कोअर इक्विटी

एसबीआय लार्ज अॅण्ड मिडकॅप

स्मॉलकॅप

फ्रँकलीन इंडिया स्मॉलर कंपनीज

एचएसबीसी स्मॉलकॅप

निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप

Scroll to Top