“गुलजार नार” ही…

अतिरिक्त जोखीम घेण्याची इच्छा असलेले म्युच्युअल फंड गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडांना आपल्या गुंतवणुकीत स्थान देतात. आर्थिक नियोजक या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओची रचना करतांना एकूण एसआयपी पैकी किमान १० टक्के गुंतवणुकीसाठी स्मॉल कॅप इक्विटी म्युच्युअल फंडांची शिफारस करतात. कारण स्मोलकॅप फंड अन्य फंड प्रकाराच्या तुलनेत अधिक परतावा देतात. या फंडाचे निधी व्यवस्थापक कमी-संशोधित कंपन्यांचा मागोवा घेण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. स्मॉल कॅप इक्विटी फंडांच्या एकूण मालमत्ते पैकी ६५ टक्के मालमत्ता बाजार भांडवलाच्या क्रमवारीनुसार २५१व्या क्रमांकापुढील कंपन्यांत गुंतवितात. सर्व प्रकारच्या समभाग गुंतवणुकीत धोके असतात परंतु स्मॉल-कॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा एखाद्या नकारत्मक किंवा मंदीच्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याच्या शक्यतेमुळे अधिक धोकादायक असतात. लार्जकॅप फंडांनी मागील ५ वर्षात दिलेल्या परताव्याची वार्षिक सरासरी ११.१७ टक्के तर याच कालावधीत स्मॉलकॅप फंडांनी दिलेल्या परताव्याची वार्षिक सरासरी १६.९३ टक्के आहे. ‘रिस्क रिवॉर्ड रेशो’ स्मॉलकॅप कंपन्यांच्या बाजूला असल्याने अनेक गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप फंडांचा मोह पडतो. मागील ५ वर्षातील ३ वर्षाची चलत सरासरी (रोलिंग रिटर्न) तपासले असताअसे दिसते की स्मॉल कॅप्सने निफ्टीची काही काळ चांगली कामगिरी झाल्या नंतर आता स्मॉलकॅप निफ्टीने वेग पकडला असून स्मॉल कॅप कॅप गुंतवणुकीत नव्याने गुंतवणूक केली तर आगामी तीन वर्षात चांगला परतावा मिळू शकेल. विशेषत: भांडवली वस्तूं, वाहन पूरक उत्पादने आणि रसायने यांसारख्या क्षेत्रातील पुनर्प्राप्ती लक्षात घेता स्मॉलकॅप फंड चांगली कामगिरी करतील. निफ्टी स्मॉलकॅप २५० मध्ये अंतर्भूत असलेल्या कंपन्यांचा पीई डेटा तपासाला असता उत्सर्जनातील वाढीमुळे मूल्यांकन (पीई रेशो) लक्षणीयरीत्या कमी झाला असून स्मॉल-कॅप निर्देशांक त्याच्या शिखराच्या अगदी जवळ असूनही स्मॉलकॅप निर्देशांकाच्या पीई मध्ये घसरण झाली आहे. सक्रीय व्यवस्थापित स्मॉल कॅप फंड गटाची मालमत्ता १लाख ५७ हजार कोटींची असून या क्षेत्राचे नैतृत्व २८ हजार कोटी मालमत्ता असणारा निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाकडे आहे. फंडांच्या त्रैमासिक आढाव्यात निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाची शिफारस केल्यानंतर या फंडाचे सखोल विश्लेषण करणे अनिवार्य झाले आहे.
पहिली गोष्ट सांगू इच्छितो तुमच्या गुंतवणुकीत असलेल्या कोणत्याही स्मॉल-कॅप फंडाची एसआयपी बंद करू नका. तुम्ही त्या व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम स्मॉल कॅप फंडात गुंतवू इच्छित असाल तर निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाला गुंतवणुकीसाठी प्राथमिकता द्या. लोकसत्ताच्या वाचकांना निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ‘कर्ते म्युच्युअल फंडांचा’ २०१४ पासून (जेव्हा पासून या यादीची सुरवात झाली) शिफारस केलेल्या यादीत निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड हा फंड आपले स्थान अबाधित राखून आहे. या टप्प्यावर हा फंड निवडण्याचे कारण असे आहे की या फंडाचे सेक्टर होल्डिंग एसबीआय स्मॉलकॅपपेक्षा निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकाच्या जवळ जाणरे आहे. आज स्मॉलकॅप फंडाचा आढावा घेतल्यास अनेक स्मॉल-कॅप फंडाचे सेक्टरल होल्डिंग निर्देशांकापेक्षा खूप वेगळे असल्याने निर्देशांकाच्या तुलनेत खराब कामगिरी होण्याची शक्यता आहे. या गोष्टीमुळे तुमच्या गुंतवणुकीत एसबीआय स्मॉलकॅप असल्यास, निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडातील गुंतवणूक पूरक ठरू शकते. या फंडाला प्राधान्य देण्याचे दुसरे कारण म्हणजे निप्पॉन फंडात एसबीआय स्मॉल कॅपमध्ये नव्या गुंतवणुकीची मर्यादा (इनफ्लो रीसट्रिकशन) अधिक आहेत. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड हा स्मॉल-कॅप फंड गटात अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. फंडाने ५ वर्षाच्या कालावाधीतीत ३ वर्षांच्या चलत परताव्याच्या आधारावर आणि ५ वर्षाच्या कालावधीत १ वर्षाच्या चलत परताव्याच्या आधारे निर्देशांकापेक्षा अनुक्रमे ९८ टक्के आणि ९२ टक्के वेळा अधिक परतावा मिळविला आहे. चलत परताव्याच्या तुलनेत निर्देशांकापेक्षा सर्वाधिक वेळा अधिक परतावा मिळविणारा फंड राहिला आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये निधी व्यवस्थापक समीर रांच यांनी १७० कंपन्यांच्या समभागांचा समावेश असून हा पोर्टफ़ोलिओ वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. स्मॉल कॅप कंपन्यांची रोकड सुलभता कमी असते. म्हणून कंपन्यांचे ध्रुवीकरण असलेला पोर्टफोलिओ बांधता येत नाही. फंडाची २८ हजार कोटींची मालमत्ता लक्षात घेता १७० कंपन्या असणं वावग ठरतं नाही. या १७० कंपन्यांचा मागेवा घेण्यासाठी समभाग विश्लेशकांचा सर्वात मोठा चमू फंड घराण्याने तैनात केला आहे.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅपचे भांडवली वस्तूंना २१ टक्के स्थान दिले असून हे निफ्टी स्मॉलकॅप २५० पेक्षा जास्त आहे. भांडवली वस्तू सरख्या क्षेत्राच्या उत्सर्जनात मोठी वाढ दिसत असल्याने हे क्षेत्र फंडाच्या कामगिरीत मोठे य्गादान देईल. या क्षेत्रांखालोखाल फंडाच्या गुंतवणुकीत वाहन पूरक उत्पादने आणि रसायने यांचा वाटा आहे. आणखी एक क्षेत्र ज्यात या फंडाची गुंतवणूक आहे ते म्हणजे वित्तीय सेवा क्षेत्र. तथापि, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाच्या गुंतवणुकीत प्रामुख्याने मोठ्या बँकांसह गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना प्राधान्य दिले आहे स्मॉल-कॅप फंडांना स्मॉल-कॅप कंपन्यांच्या बाहेर ३५ टक्के गुंतवणूक स्मॉलकॅप व्यतिरिक्त करण्यास मुभा असल्याचा फायदा घेत मोठ्या बँकात गुंतवणूक केली आहे. स्मॉलकॅप फंडासाठी रोकड सुलभता हा महत्वाचा घटक असतो. निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंडांच्या पोर्टफोलिओची सरासरी तरलता (विशिष्ट दिवसांत संपूर्ण पोर्टफोलीओ खाली करण्याची क्षमता) देखील एसबीआय आणि एचडीएफसी स्मॉलकॅप पेक्षा सरस आहे.
जे गुंतवणूकदार ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी साठी गुंतवणूक करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठीच ही शिफारस आहे. जे गुंतवणूकदार अल्पकालासाठी गुंतवणूक करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीतून तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व पोर्टफोलीओत २० टक्के पेक्षा अधिक गुंतवणूक स्मॉलकॅप मध्ये असल्यास हा फंड टाळणे हिताचे ठरेल. वेगवेळ्या रणनीती तपासल्या नंतर तुमच्या एसआयपी सोबत दर सहा महिन्यांनी ३ महिन्याच्या एसआयपी इतकी रक्कम एकरक्कमी गुंतविल्यास परतावा २० टक्के पर्यंत वाढल्याचे दिसून आले. जर तुमचा पोर्ट फोलिओ मोठा असेल, आणि तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी १० वर्षे पेक्षा अधिक असल्यास दर वर्षी १० टक्के स्टेप अप एसआयपी १८ टक्के पेक्षा अधिक परतावा दिल्याचे दिसून आले. या फंडाच्या पोर्टफ़ोलिओ एचडीएफसी आणि एसबीआय बरोबर तपासाला असता अनुक्रमे १८ आणि २४ टक्के ओव्हरलॅप आहे . सध्याच्या परिस्थितीत किमान ५ वर्षे गुंतवणुकीचा कालावधी राखून गुंतवणूक केल्यास परताव्याचे आषाढ घन नक्कीच बरसतील असे वाटते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते हे लक्षात ठेऊन गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top