हे ‘आनंदा’चे देणे

 

आनंद राधाकृष्णन यांच्याशी परिचय झाल्याला वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन वरिष्ठसहकारी मिलिंद भुरे यांच्यामुळे आनंद राधाकृष्ण यांच्याशी परिचय झाला.  आनंद राधाकृष्णन त्यावेळी सुंदरम न्यूटन (सध्याचा सुंदरम म्युच्युअल फंड) या फंड घराण्यात सुंदरम बॉंड सेव्हर (नांव बदला नंतर सुंदरम मिडीयम टर्म बॉंड फंड) या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. वर्षातून एकदा चेन्नईला गेल्यानंतर सुंदरम आणि फ्रॅकलीन टेम्पलटन च्या फंड व्यवस्थापकांना भेट होताच असते.  या वीस वर्षात वर्षातून एखादी भेट आणि नियमित फोन किंवा मेलच्या माध्यमातून संपर्कात खंड पडलेला नाही. दरम्यानच्या काळात २००४ मध्ये आनंद राधाकृष्ण सुंदरम म्युच्युअल फंड फ्रॅकलीन सोडून फंड घराण्यांत रुजू झाले आणि सध्या ते या फंड घराण्याचे समभाग गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. सेबीच्या आदेशाच्या अंमलबजावणी नंतर अनेक फंडाच्या गुंतवणूक धोरणांत संदर्भ निर्देशांकात बदल हे अनिवार्य असले तरी फ्रॅकलीन इंडिया इक्विटी फंड या फंडाचे नांव वगळता काहीही बदल झालेले नाही. बीएसइ ५०० हा संदर्भ निर्देशांक सुद्धा तोच आहे.

सेबीच्या म्युच्ग्युअल फंडाचे सुसूत्रीकरण करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणी नंतर मल्टीकॅप फंड प्रकार वगळता अन्य फंड गटातील फंडाच्या समभाग निवडीवर मर्यादा आल्या आहेत. समभाग निवडीचे स्वातंत्र्य केवळ मल्टीकॅप फंडांना आहे मल्टीकॅप फंड गटातील फ्रॅकलीन इंडिया इक्विटी फंड हा सर्वात जुना ( २४ वर्षे) आणि सर्वाधिक मालमत्ता (११४७० कोटी) असलेला फंड आहे. या चोवीस वर्षात १ लाखाच्या गुंतवणुकीचे १८ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार बाजार मुल्य ५७.४३ लाख असून फंडाने वार्षिक १८.५४ वार्षिक टक्के दराने परतावा दिलेला आहे.

हा फंड मल्टीकॅप फंड गटात मोडतो. एस अँड पी बीएसई ५०० निर्देशांकातील समभाग फंडाच्या गुंतवणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. गुंतवणुकीच्या परिघात ५०० समभाग असले तरी १५० समभागांचा गुंतवणुकीत कधीही समावेश झालेला नाही. एस अँड पी बीएसई ५००निर्देशांकात अंतर्भूत असलेल्या समभागांपैकी  गुंतवणुकीचा कधीणा कधी हिस्सा बनलेले ३५० समभाग आहेत. एकूण गुंतवणुकीच्या सरासरी  ७० टक्के लार्जकॅप आणि ३० टक्के मिडकॅप राखण्यात आले आहेत. फंडाची गुंतवणूकितील लार्जकॅप मिडकॅप गुणोत्तर एका विशिष्ठ मर्यादेत राखण्यावर निधी व्यवस्थापकांचा कटाक्ष दिसून येतो. गुंतवणुकीसाठी ‘टॉप डाऊन अॅप्रोच’ वापरला जातो. नजीकच्या एक दोन वर्षात उमदा भांडवली परतावा देऊ शकतील अशा उद्योग शेत्रात संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक तर जवळच्या काळात भांडवली मुल्यात घट होऊ शकेल अशा उद्योग क्षेत्रात संदर्भ निर्देशांकातील त्या उद्योग क्षेत्रातील प्रमाणापेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा, टेलीकॉम उद्योग, आरोग्य निगा क्षेत्रात निर्देशांकापेक्षा अधिक तर तंत्रज्ञान क्षेत्रात निर्देशांकपेक्षा कमी गुंतवणूक केली आहे. मागील तीस दिवसांत फंडाच्या गुंतवणुकीत कोणताही समभागाचा नव्याने समावेश झालेला नाही तसेच कोणत्याही समभागाला वगळण्यात आलेले नाही. फंडाच्या गुंतवणुकी मागील वर्षभरात ५०ते ५५ समभागांचा समावेश राहिलेला आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड सुसूत्रीकरणानंतर ही लवचिकता अन्य फंडांना राहिलेली नाही. या फंडाचे नांव सुसुत्रीकारणानंतर फ्रॅकलीन इंडिया प्रायमा प्लसचे नांव फ्रॅकलीन इंडिया इक्विटी फंड झालेले असून हा नाम बदल वगळता फंडाचे गुंतवणूक धोरण संदर्भ निर्देशांक सारख्या पराताव्यावर परिणाम घडविणाऱ्या गोष्टी बदललेल्या नाहीत. या दूरच्या वित्तीय ध्येयांसाठी या फंडाचा गुंतवणूक सल्लागाराच्या सल्यानुसार समावेश करता येईल

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top