फोकस्ड इक्विटी फंड

पोर्टफोलीओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमच्या गुंतवणुकील वैविध्य. इक्विटी फंडात त्या फंडाच्या उद्दिष्टांनुसार आठ ते दीडशे कंपन्यांचा समावेश अससतो. सेक्टरल फंडात सर्वात अधिक ध्रुवीकरण असते तर स्मॉलकॅप मध्ये सर्वाधिक वैविध्य असते. डिसेंबर अखेरीस १६१ कंपन्यांचा समावेश असलेला निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड हा सर्वाधिक वैविध्य असलेला फंड आहे. तर आयसीआयसीआय पृडेंशीयलटेक्नोलॉजी फंड सर्वाधिक ध्रुवीकरण असलेला फंड असून या फंडाच्या गुंतवणुकीत १९ कंपन्यांचा समावेश आहे. तुमच्या गुंतवणूकीत जोखीम आणि परतावा यांचे संतुलन करण्याकरिता फोकस्ड इक्विटी फंड हा एक योग्य पर्याय उपलब्ध आहे. फोकस्ड इक्विटी फंड हा एक म्युच्युअल फंड गट असून या फंडांच्या गुंतवणुकीत २५ ते ३० कंपन्यांचा समावेश असतो. वैविध्य मर्यादित राखल्याने परतावा वाढण्याची शक्यता असते. मर्यादित कंपन्यांची निवड करण्याच्या पद्धतीमुळे हे फंड “बेस्ट आयडिया फंड” म्हणूनही ओळखले जातात. या फंडांचे मुख्य उद्दिष्ट उच्च परतावा देणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देणे मग या कंपन्या कोणत्याही उद्योग क्षेत्रातील किंवा कोणत्याही मार्केट कॅप मधील असल्या तरी निधी व्यवस्थापकाला त्याच्याशी देणे घेणे नसते.
फंडमालमत्ता (कोटी रुपये)
३१ डिसेंबर २०२२
एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड२८४५३
अॅक्सीस फोकस्ड २५ फंड १७८९३
मिरॅ असेट फोकस्ड इक्विटी फंड९१२८
फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड८६५५
निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड६२२०

फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड हा जोखीम परतावा गुणोत्तरात दुसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे.
फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाने दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांतील अस्थिर बाजारात फोकस्ड इक्विटी फंडांनी फ्लेक्सी-कॅप आणि लार्ज- आणि मिड-कॅप फंडांच्या तुलनेत गेल्या सात वर्षांत रोलिंग रिटर्न्सच्या आधारावर सर्वाधिक जोखीम समायोजित परतावा दिला आहे. हा फंड लार्ज-कॅप केंद्रित असल्याने बाजाराची वाटचाल फंडाला पोषक ठरली आहे. या संदर्भात, फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड हा एक मजबूत कामगिरी करणारा फंड म्हणून समोर आला आहे. या फंडाने मानदंड (एस अॅण्ड पी बीएसइ ५०० टीआरआय) सापेक्ष आणि या फंड गटातील अन्य स्पर्धकांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. तुमची जोखीम मध्यम (बॅलंस्ड) असेल आणि तुमाच्या गुंतवणुकीचा कालावधी किमान ५ वर्षे असेल तर हा फंड तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही प्रदीर्घ काळ एसआयपीच्या मार्गाने संपत्ती निर्मिती साठी हा फंड एक योग्य पर्याय आहे. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०२२ या सात वर्षांच्या काळात फंडाने वार्षिक १२.४९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंड गटात या कालावधीत हा फंड अॅक्सीस फोकस्ड २५ फंडानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडात विदेशातील गुंतवणुका असल्यातरी देशांतर्गत अधिक अमेरिकेतील गुंतवणुका जमेस धरून देखील सात वर्षांच्या चलत सरासरीच्या आधारावर फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाची कामगिरी अव्वल ठरली आहे. या फंडाने या कालावधीतील सर्वच तिमाहीत आपल्या मानदंड सापेक्ष किमान १.५ ते २ टक्यांपेक्षा अधिक नफा मिळविला आहे. गेल्या सात वर्षात ३ वर्षाच्या चलत सरासरीच्या आधारे ९५ टक्के वेळा मानदंडसापेक्ष अधिक नफा मिळविला आहे. मे २०२० ते डिसेंबर २०२२ दरम्यान या फंडाने २४.३६ टक्के वार्षिक परतावा देणारा फंड असून या कालावधीत या फंडाची कामगिरी एचडीएफसी फोकस्ड इक्विटी फंडानंतर दुसऱ्या क्र्मांकाची कामगिरी नोंदलेला फंड आहे. फेब्रुवारी मार्च २०२० दरम्यानच्या घसरणीत ३ एप्रिल २०२० रोजी या फंडाच्या रेग्युलर ग्रोथची एनएव्ही रुपये २८.०९ च्या निच्चांकावरून २०२२ मधील शेवटची एनएव्ही ३० डिसेंबर २०२२ रोजी ७१.००६३ होती.

अजय अरगल हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाच्या व्यतिरिक्त ते फ्रँकलीन बिल्ड इंडिया फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा वाहतात. सेबीच्या फंड सुसुत्रीकारणानंतर ४ जून २०१८ पासून फ्रँकलिन इंडिया हाय ग्रोथ कंपनीज फंडाचे वर्गीकरण फोकस्ड फंड म्हणून केले आणि फंडाचे नांव फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड असे केले.
फ्रँकलिन इंडिया हाय ग्रोथ कंपनीज फंड हा उच्च विकास दर किंवा क्षमता असलेल्या कंपन्या आणि उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणारा करणारा हा फंड मल्टी-कॅप घाटणीचा होता. फ्रँकलिन इंडिया हाय ग्रोथ कंपनीज फंडात ३० ते ३५ कंपन्यांचा समावेश असायचा. नांव बदला नंतर गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची संख्या कमी होण्याव्यतिरिक्त काहीही बदल झालेला नाही. फंडाच्या निधी व्यावास्थापकांत १८ ऑक्टोबर २०२१ पासून बदल झाले. रोशी जैन या एचडीएफसी म्युच्युअल फंडात दाखल झाल्या नंतर फंडाची धुरा फंड घराण्याने अजय अरगल यांच्याकडे दिली. अजय अरगल यांनी फंडाच्या गुंतवणुकीत काही बदल केले. रोशी जैन यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला पूर्णपणे वगळले होते. अजय अरगल यांनी गुंतवणुकीत इंफोसिसचा समावेश केला. या व्यतिरिक्त काही किरकोळ बदल वगळता पोर्टफोलीओत फारसे बदल केलेले नाहीत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रात आहे. निधी व्यवस्थापक वृद्धी, गुणवत्ता, टिकाव आणि वाजवी मूल्यमापन यावर लक्ष केंद्रित करतात. या निकषांवर आधारित, गुंतवणुकीच्या संधी ओळखण्यात आणि त्यांची अंबलबजावणी करण्यात निधी व्यवस्थापक यशस्वी ठरल्याचे दिसते. प्रत्येक कंपनीची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत, जी फंडाच्या निकषात बसतात. फंडाच्या गुंतवणुकीत स्मॉल आणि मिडकॅप कॅपचे प्रमाण उद्योगक्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण हे मानदंड सापेक्ष कमी अधिक असते. हा फंड मानदंडांचे प्रतिनिधित्व करत नाही.
गुंतवणुकीतील अति-वैविध्य व्यवस्थापित करणे सोपी गोष्ट नाही. तीन ते चार फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असल्यास तुमच्या गुंतवणुकीत ७० ते ८० कंपन्या असतात. अति-वैविध्यामुळे गुंतवणुकीवरील परतावा कमी होतो. कमी कंपन्या असलेल्या काही सर्वोत्तम फंडात गुंतवणूक ठेवल्यास परतावा कमी होईल. पोर्टफोलिओ बांधणी आणि मोठ्या/मिड आणि स्मॉल कॅप्समधील वाटप हे स्टॉक आणि सेक्टर निवड आणि जोखीम-परतावा समतोल साधण्याचे परिणाम आहेत. म्हणूनच दीर्घकालीन वित्तीय ध्येय साध्य करण्यासाची क्षमता असलेला हा फंड आहे.फोकस्ड इक्विटी फंड हा एक म्युच्युअल फंड गट असून या फंडांच्या गुंतवणुकीत २५ ते ३० कंपन्यांचा समावेश असतो. वैविध्य मर्यादित राखल्याने परतावा वाढण्याची शक्यता असते. मर्यादित कंपन्यांची निवड करण्याच्या पद्धतीमुळे हे फंड “बेस्ट आयडिया फंड” म्हणूनही ओळखले जातात. या फंडांचे मुख्य उद्दिष्ट उच्च परतावा देणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देणे मग या कंपन्या कोणत्याही उद्योग क्षेत्रातील किंवा कोणत्याही मार्केट कॅप मधील असल्या तरी निधी व्यवस्थापकाला त्याच्याशी देणे घेणे नसते.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top