वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आहेत. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी आम्ही आमच्या संशोधनानुसार भविष्यात समाधानकारक परतावा देणाऱ्या फंडांची आम्ही शिफारस करीत आहोत. फोकस्ड इक्विटी फंड दीर्घावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देऊ शकतात. मूळत: मल्टिकॅप प्रकारचा पोर्टफोलिओ असलेल्या फोकस्ड फंडात ‘हाय रिस्क हाय रिटर्न्‍स’ प्रकारच्या समभागांची निधी व्यवस्थापक निवड करतात. फोकस्ड फंडाच्या गुंतवणुकीत ३० पेक्षा अधिक कंपन्या नसतात. गुंतवणुकीतील वैविध्य आणि जोखीम यांच्या उत्तम समतोल फोकस्ड फंडांच्या गुंतवणुकीतून साधता येतो. गुंतवणुकीचा परीघ संकुचित करावयाचा ठरवले तर या परिघात फोकस्ड इक्विटी फंडांना अग्रस्थन द्यायला हवे. हा फंड आपल्या गुंतवणुकीत कितपत योग्य आहे हे आम्हाला जाणून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.