’एफएमपी’ अर्थात फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान हे निश्चित मुदत असलेला रोखे गुंतवणूक प्रकार आहे. हा प्रकार मुदत ठेवीसारखा परंतु मुदत ठेवींपेक्षा कर कार्यक्षम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याची खात्री नसते त्याप्रमाणे’एफएमपी’त गुंतवणूक करतांना नफ्याची खत्री न देता अंदाज बांधता येतो. हा अंदाज बाधाण्याचे कारण म्हणजे ज्या वेळी एखाद्या फंड घराणे ‘एफएमपी’ विक्रीची तारीख नक्की करते त्याच वेळेला फंडात जमा झालेले पैसे नेमके कुठे गुंतविणार हे सुद्धा ठरलेले असते. एखाद्या फंडात जमा झालेली रक्कम अंशत: कोणत्या कंपनीत गुंतविणार हे निश्चित असते. या कंपनीसोबत फंड घराण्याची बोलणी सुरु असतात. या रोख्यांवर किती व्याज द्यायचे हे जो काही मानदंड ठरलेला असेल अधिक अधिमुल्य (बेंचमार्क + रिस्क प्रीमियम) निश्चित होते. ज्या दिवशी प्रत्यक्ष सौदा होणार त्या दिवशी संदर्भ निर्देशांक नेमका किती असेल हे गुंतवणुकीच्या दिवशे निश्चित नसते. सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या १२१५ ते १२२५ दिवसांची मुदत असलेल्या आणि ‘ट्रिपल ए’ पत धारण करणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या ’एफएमपी’त गुंतवणूक केल्यास मुदतीअंती वार्षिक ८.२० टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.
मुदत ठेवींपेक्षा ’एफएमपी’ कर कार्यक्षम गुंतवणूक साधन आहे. तीन वर्षाची मुदत ठेव आणि तीन वर्षेपेक्षा अधिक मुदतीची एफएमपी या मध्ये ‘एफएमपी’ हे कर कार्यक्षम गुंतवणूक साधन आहे. मुदत ठेवीवर दरवर्षी देय व्याजावर (प्रत्यक्ष खात्यातजमा झाले नाही तरी) उगमस्थानी कर वाजवट होते. म्युच्युअल फंडांचे लेखे उगमस्थान पद्धतीवर (एकृअल) पद्धतीने न होता भांडवली नफा वसूल केल्यास (अॅकच्युअल) पद्धतीने होत असल्याने दरवर्षी जमा झालेला भांडवली लाभ उत्पन्न समाजाला जात नाही. तीन वर्षांनतर ‘एफएमपी’ची मुदत संपल्यावर मिळणारा ब्नाधान्वली लाभ हा दीर्घकालीन भांडवली लाभ समाजाला जातो. या लाभाला ‘इंडेक्ससेशन’चा पश्चात मिळणार लाभ हा करपात्र समजला जातो. मुदत ठेवीवर मिळणारे व्याजावर लागू होणारा कर हा करदात्याच्या उत्पन्नानुसार लागू होणाऱ्या कर कक्षेनुसार ठरतो. करदात्याला ‘इंडेक्ससेशन’चा मिळणारा लाभ हा करकक्षा सापेक्ष नसतो. ’एफएमपी’वर मिळणारा भाडवली लाभ आणि मुदत ठेवींवर मिळणारे व्याज यांच्या दरांत करपूर्व फारसा फरक नसला तरी कर पश्चात भांडवली लाभाची टक्केवारी अधिक सरस असते. आज तीन वर्षाच्या ‘एफएमपी’त आणि एखाद्या बँकेच्या ३ वर्षाच्या मुदत ठेवींवरील दर सारखे असते तरी करपश्चात ’एफएमपी’वरील लाभाची टक्केवारी अधिक सरस असते. सेबीच्या नियमानुसार मुदत बंद योजना बाजारात नोंदणे सक्तीचे असले तरी मुदतपूर्व रोकड सुलभतेच्या दृष्टीने मुदत ठेवी सरस आहेत.
रोखे गुंतवणुकीत मुखत्वे व्याज दर बदलाशी समंधीत (इंटरेस्ट रेट रिस्क) जोखीम, आणि मुदात पुर्तीनंतर मुद्दल परत न मिळण्याची (क्रेडीट रिस्क) जोखीम असे दोन जोखीम प्रकार असतात. ज्यांनी एका वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या रोख्यांत (जी सेक) फंडात गुंतवणूक केली त्यांच्या गुंतवणूक रक्कम कमी झाली असल्याचे आढळते. मागील वर्षभरात भारतात रुपयाच्या विनिमय दरांत घसरण झाल्याने आणि महागाई वाढल्याने रोख्यांच्या किंमतीत घसरण झाली परिणामी सर्वच रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या गुंतवणुकीवर तोटा झाल्याचेह आढळते. सेबीच्या नियमानुसार ’एफएमपी’च्या मुदतीपेक्षा अधिक मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करायला मनाई असल्याने, व्याज दर बदलाशी समंधीत जोखीम जवळ जवळ शून्यवत असते. अनेक कुटुंबात दर महिन्याला एक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करण्याची प्रथा आहे. मुदतपूर्ती नंतर खात्रीशीर मुद्दल व व्याज मिळण्याची खात्री असल्याने बचत मार्गी लावण्यासाठी हा मार्ग अवलंबिला जात असावा. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र धारकाला मिळणारे व्याज हे करपात्र असते. जे कोणी या प्रकारची बचत प्रमाणपत्राची शृंखला खरेदी करीत असतील त्यांनी दर महिन्याला एक या प्रमाणे एफएमपीची श्रुंखला केली तर या बचतीला करकार्य क्षमतेचे कोंदण देता येईल. अनेक बचतकर्ते एसआयपी सध्या उपलब्ध असलेल्या तीन वर्षे मुदत असलेल्या ’एफएमपी’मध्ये गुंतवणूक केल्यास ८.२० टक्के वार्षिक दराने लाभ मिळण्याची शक्यता असल्याने. पारंपारिक गुंतवणूकदारांनी ‘एफएमपी’चा नक्कीच विचार करायला हवा.
अधिक माहितीसाठी खालील Form भरा:
[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]