खेळाडू पाहिजे नवा!

 

सध्या एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने ओळखला जाणारा हा फंड जेपी मॉर्गन मिड अँड स्मॉलकॅप फंड या नांवाने ओळखला जात असे. एडलवाइज म्युच्युअल फंडाने जेपीमॉर्गनच्या योजना खरेदी केल्यामुळे २८ नोव्हेंबर २०१६ पासून या फंडाला नवीन ओळख मिळाली. सेबीच्या नवीन वर्गीकरणानुसार हा फंड २८ मार्च २०१८ पासून एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने आणि मिडकॅप गटात मोडणारा फंड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. समभागांच्या बाजारमुल्यांनुसार अनुक्रमे १०१ ते २५० या दीडशे समभागांत किमान ६५ टक्के गुंतवणूक करणारा हा फंड आहे. फंड व्यवस्थापक हर्षद पटवर्धन हे अमित गाडगीळ यांच्यासह या फंडाचे निधी व्यवस्थापक होते ऑगस्ट २०१७ पासून या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी हर्षद पटवर्धन सांभाळत आहेत.

मागील दहा वर्षे या फंडात ५०००ची एसआयपी करून ६ लाखाच्या गुंतवणुकीचे 2 मे २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही प्रमाणे २०.३६ लाख झाले आहेत. निफ्टी मिडकॅप १०० टीआरआय हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाच्या गुंतवणुकीत मागील वर्षभरात सरासरी ६० कंपन्याच्या समभागांचा समावेश असून पहिल्या पाच गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या सरासरी १५ टक्के दहा गुंतवणुका २६ टक्के आणि पंधरा गुंतवणुका ३६ टक्के होत्या. ३१ मार्च २०१८ रोजी फंडाची एकूण मालमत्ता ६६९ कोटी होती. फंडाने गुंतवणुकीसाठी औद्योगिक वापराच्या वस्तूंना प्राथमिकता दिली असून त्या खालोखाल खाजगी बँका, अभियांत्रिकी भांडवली वस्तू, ग्राहक उपयोगी वस्तू या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशीयल सर्व्हिसेस आरबीएलबँक, व्होल्टास, इंडियन हॉटेल्स, ज्युबीलीअंट फूड वर्क्स या पहिल्या पाच गुंतवणुका आहेत. फंडाच्या पोर्टफ़ोलिओचे सक्रीय व्यवस्थापन केले जाते. मार्च महिन्यांत फंडाने ९ समभाग पूर्ण पणे विकून टाकले तर ८ समभागांत नव्याने गुंतवणूक केली. फंडाने दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण केला असल्याने बाजारातील चढ उतारांशीचा सामना करीत परतावा मिळविला आहे. फंड अस्तित्वात आल्यानंतर लगेचच २००८ मधील वैश्विक घसरणींना फंड समोर गेला तर २०१५ ते २०१८ या कालावधीतील मिडकॅप फंडांचे सुवर्णयुग अनुभवले. या चढ उतरांतून गेल्यामुळे फंड परिपक्व होत जाणारा फंड आहे.

हा फंड बाजारमुल्यानुसारच्या क्रमवारीतील तळातील कंपन्यांत गुंतवणूक करून परतावा कामिणारा  फंड आहे. मिडकॅप कंपन्यांतून गुंतवणूककरण्यासाठी समभाग निवडणे हे तुलनेने कठीण काम आहे. मिडकॅप फंडात परतावा मिळविण्यासाठी समभागांचा दर्जा आणि समभागाची रोकड सुलभता यांचा तोल सांभाळणे गरजेचे असते हा तोल निधी व्यवस्थापकांनी योग्य रीतीने सांभाळल्यामुळे फंडाच्या परताव्यात सातत्य राखणे जमेले आहे.

नव्याने प्रदर्शित झालेल्या शिकारी या मराठी चित्रपटातील ‘सिनियर प्लेयर्स थकले रे खेळाडू पायजे नवा’ या  गाण्याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप वर व्हायरल झाला आहे. (कि केला गेला) जेणे करून हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांचे पाय हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतील. म्युच्युअल फंड आणि चित्रपट यांच्यात सुद्धा साम्य आहे, चित्रपटाचा ट्रेलर किंवा एखाद्या गाण्याचा व्हिडीओ पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतात तसेच फंडाचा परतावा पाहून निर्णय घेण्याची गुंतवणूकदारांची जुनी सवय आहे. ‘मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देत नाही असा इशारा वारंवार देऊन देखील गुंतवणूकदार आपली सवय सोडत नाहीत अशा गुंतवणूकदरांनी फारसा गाजावाजा नसलेला परंतु गुंतवणूक प्रक्रियेवर ठाम असल्याने योग्य त्या समभागांची निवड करून दर्जा आणि रोकड सुलभता यांचा समतोल राखणाऱ्या या फंडाचा नियोजनात्मक गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top