जातातची हे नेत्र दिपुनी…

 

आपल्या गुंतवणुकीचा किती हिस्सा मिडकॅप फंडांसाठी असावा याला अनेक उत्तरे असू शकतील. ही उत्तरे गुंतवणूक एक रक्कमी की नियोजनबद्ध पद्धतीने, गुंतवणूकदाराचा जोखीमांक किती आहे यावर ठरेल. या प्रश्नांची उत्तरे काहीही असली तरी डोळे दीपऊन टाकणारा परतावा देणाऱ्या आजच्या या फंडाचा समावेश गुंतवणुकीत असावा या बद्दल दुमत असण्याचे कारण नाही. कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या फंडात ‘एनएफओ’त वेळी ‘रेयुलर ग्रोथ प्लान मधील एका लाखाचे २४ ऑगस्टच्या एनएव्ही नुसार ९.८४ लाख झाले असून वार्षिक परताव्याचा दर १८.५१ टक्के आहे.

म्युच्युअल फंडांच्या सुसुत्रीकारणा नंतर कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या फंडाचा समावेश फंड घराण्याने लार्ज अँड मिडकॅप फंड गटात करण्याचा निर्णय घेतला आहे.  लार्ज अँड मिडकॅप गटातील फंडांना ३० ते ३५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप आणि किमान ३५ टक्के मिडकॅप गुंतवणूक राखणे अनिवार्य आहे. म्युच्युअल फंडाच्या सुसूत्रीकरणा आधी या फंडाची गणना मिडकॅप गटात केली जात होती. फंडाच्या सुसूत्रीकरणानंतर फंड घराण्याने ‘सेबी’ने नव्याने तयार केलेल्या लार्ज अँड मिडकॅप फंड गटात या फंडाचा समावेश करविण्याचे निश्चित केले आहे. लार्ज अँड मिडकॅप फंड गटात लार्जकॅप  गुंतवणूक किमान ३० टक्के राखणे सक्तीचे असल्याने भविष्यात या फंडाकडून डोळे दिपविणाऱ्या कामगिरीची अपेक्षा ठेवणे रास्त नसले तरी हा फंड फंड गटातील सरासरीपेक्षा अधिक परतावा देईल या बद्दल शंका नाही. म्युच्युअल फंड सुसुत्रीकारणा नंतर विविध फंड गटातून सर्वाधिक फंडांचे स्थानांतर या फंड गटात झाले आहे. सुसुत्रीकारणापूर्वीचे अव्वल मिरेअसेट इमर्जिंग ब्ल्यूचीप, प्रिन्सिपल इमर्जिंग ब्ल्यूचीप, एलआयसी मिडकॅप, सुंदरम इक्विटी मल्टीप्लायर या सारख्या मिडकॅप घाटणीचे फंड लार्ज अँड मिडकॅप फंड गटात स्थानांतरीतल झाले आहेत. लार्ज अँड मिडकॅप फंड गुंतवणूकदारांच्या बचतीला स्थैर्य आणि वृद्धी देतील.

फंडाची गुंतवणुक ‘बॉटम्स अप अप्रोच’ धोरणानुसार होत असून भक्कम पाया असलेल्या मिडकॅप फंडाची निवड फंड व्यवस्थापक करीत असतात. फंडाच्या गुंतवणुकीत ६५ ते ७० कंपन्यांचा समावेश असून बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, रिलायंस इंडस्ट्रीज, बजाज फायनांस, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, अतुल लिमिटेड,पिरामल एंटरप्राइझेस, महिंद्रा अँड महिंद्रा फायनांस, व्हरपूल इंडस्ट्रीज, आणि एमआरएफ या आघाडीच्या दहा गुंतवणुका असलेल्या कंपन्या आहेत. आघाडीच्या दहा गुंतवणुकाचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या २८ टक्के दरम्यान आहे. निधी व्यवस्थापकांचे धोरण समभाग केंद्रित जोखीम स्वीकारून नफा मिळविण्यापेक्षा भक्कम पाया असलेल्या कंपन्यांत जोखीम विभागान्यावर राहिला आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी सक्रीय व्यवस्थापन हे फंडाचे वैशिष्ठ्य आहे. जुलै महिन्यांत फंड व्यवस्थापनाने कोटक महिंद्र बँक, एनसीसी इंडसिंध बँक, बायोकॉन, शंकरा बिल्डींग, महानगर गॅस यांना वगळून, टायाटन इंडस्ट्रीज, एलआयसी हौसिंग फायनांस डीवीस लॅब, इंद्रप्रस्थ गॅस, यास बँक आणि एलआयसी फायनांनशीयल होल्डिंग्ज यांचा समावेश केला आहे. मागील पाच वर्षात फंडाच्या निधी व्यावास्थापनांत अनेक बदल झाले आहेत. मे २०१६ मध्ये कृष्णा संघवी यांनी फंड घराण्याला अलविदा म्हटल्यानंतर या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे कार्तिक मेहता यांच्याकडे आली. मे २०१८ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापन फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राहिलेल्या रवि गोपालकृष्णन आणि मियुश गांधी यांच्याकडे होती. रवि यांनी फंड घराण्याच्या सेवेचा राजीनामा दिल्यानंतर कृष्णा संघवी यांची मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून घरवापसी झाली आहे. शास्त्रीय संगितात एखादा मिया मल्हार सारखा राग सादर करतांना भीमसेन जोशींची आलापी आणि प्रभा अत्रें कडून होणारा सरगमचा वापर भिन्न शैलीतील असले तरी प्रत्येकाचा मिया मल्हार श्रोत्यांना आनंद देतो. प्रत्येक निधी व्यवस्थापकाची शैली वेगवेगळी असली तरी प्रत्येकाने या फंडाला आपापल्या परींनी अधिक समृद्ध केले, आणि परतावा टिकवून धरला.   फंड व्यवस्थापकांत बदल होऊन देखील फंडाचा मागील १७ तिमाही या फंडाचा समावेश क्रिसिलच्या ‘सीपीआर -१’ मध्ये राहिला असल्याची नोंद घेणे गरजेचे आहे.

 

हे डोळे दिपविणाऱ्या कामगिरीत सातत्य राखत असल्याने ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या पहिल्या यादीपासून या फंडाने आपले भावड असलेल्या कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडा सोबत आपले स्थान आजतागायत अबाधित राखले आहे. मिडकॅप गुंतवणुकात भक्कम पाया आदर्श व्यवस्थापन आणि व्यवसाय वृद्धीच्या संधी हे महत्वाचे घटक असतात. मागील चार ते पाच महिन्यांत मिडकॅप फंडातील घसरणीमुळे मिडकॅप फंड पुढील चार ते पाच वर्षांसाठी आकर्षक पर्याय वाटतात. या फंडाची जुलै महिना अखेर मालमत्ता ३७९२  कोटी होती. फंड सुसुत्रीकारणापूर्वी हा फंड गुंतवणुकीचा मोठा हिस्सा भांडवली मूल्यांनुसार १५१ ते ५०० दरम्यान क्रमवारी असलेल्या कंपन्यांत गुंतवत असे. सुसुत्रीकारणापश्चात किमान ३५ टक्के गुंतवणूक भांडवली मूल्यांनुसार १ ते १०० कंपन्यांतून गुनाविला गेला आहे फंडाच्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा मिडकॅप भांडवली मूल्यांनुसार १०१ ते २५० दरम्यानच्या समभागांत गुंतविला आहे. एस अँड पी बीएसई २०० टीआर हा निर्देशांक फंडाचा मानदंड आहे. एक रक्कमी गुंतवणुकीपेक्षा मिडकॅप फंडातील नियोजन बद्ध गुंतवणुका नेहमीच चांगला परतावा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते या इशाऱ्याचा अनुभव बाजारातील हात पोळून घेतलेले मिडकॅप गुंतवणूकदार प्रत्येक तेजीत घेत असतात. या पोळलेल्या जखमांवर फुंकर मारणाऱ्या या फंडाचा समावेश

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top