जादू  अशी घडे की…

दिनांक ०६ ऑक्टोबर २०१७ रोजी एक परिपत्रक जारी करून म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण या बाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या . या संदर्भात११ सप्टेंबर २०२० रोजी मल्टी कॅप फंडांच्या गुंतवणुकीमध्ये २५ टक्के लार्जकॅप २५ टक्के मिडकॅप २५ टक्के स्मॉलकॅप आणि उर्वरित गुंतवणुका निधी व्यवस्थापकाच्या विवेकानुसार गुंतविण्याची मुभा देण्यात आली आहे. मुख्यतः अतिरिक्त अल्फा निर्माण (निर्देशांकापेक्षा अधिक परतावा) करण्यासाठी मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांसारख्या व्यापक बाजारपेठांमध्ये अधिक सहभाग निर्माण करण्यावर केंद्रित आहे. कॅनरा रोबेको मल्टीकॅप फंडाचा एनएफओ ७ जुलै ते २१ जुलै दरम्यान खुला राहणार असून मल्टी कॅप फंड हे लाईफ सायकल फंड असतात. उदाहरणाने सांगायचे तर हॅवेल्स इडिया ही कंपनी २०१२ ते २०१६ दरम्यान स्मॉलकॅप होती, २०१७ ते २०२० मिडकॅप तर २०२१ पासून ही कंपनी लार्जकॅप म्हणून ओळखली जाते. एखादी स्मॉलकॅप कंपनीचा गुंतवणुकीत समावेश झाला आणि त्या कंपनीच्या उत्सर्जनात (अर्निंग पर शेअर) वाढ होत असेल तर टी कंपनी लार्जकॅप झाली तरी गुंतवणुकीत ठेवता येते. देशातील सर्वात पायाभूत सुविधा विकासक एल अँण्ड टी लार्जकॅप आहे, सर्वात मोठी टायर कंपनी एमआरएफ मिडकॅप आहे, आणि सर्वात मोठी तयार कपडयांची उत्पादक रेमंड स्मॉलकॅप आहे. या तिन्ही कंपन्या या पोर्टफोलिओ मध्ये असण्याची शक्यता आहे. इतके वैविध्य असणे हा दुर्मिळ योग म्हणावा लागेल. मागील महिन्यांत निवर्तलेले हॅरी मार्कोविट्झ यांची ओळख आधुनिक पोर्टफोलिओ थिअरीचे जनक अशी आहे. पोर्टफोलिओच्या परताव्याशी तडजोड न करता पोर्टफोलिओची जोखीम (अस्थिरता) कमी करण्यासाठी पोर्टफोलिओ मालमत्तेत सकारात्मक सहसमंध (कोरिलेशन) नसलेल्या मालमत्तांचा समावेश करावा असे ही थेअरी सांगते. या फंडाचा पोर्टफोलिओ मॉडर्न पोर्टथिअरीचे अनुकरण करणारा पोर्टफोलीओ असेल असे म्हणले तर ते वावगे ठरणार नाही. सर्व समभाग निधी व्यवस्थापकांची १ जुलै २०१८ ते ३० जून २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीतील कामगिरी ‘शार्प रेशो’च्या आधारे तपासली असता पहिल्या चार निधी व्यवस्थापकांत श्रीदत्त भांडवलदार यांचा समावेश आहे. ‘‘आम्ही नेहमीच मूल्यांकनापेक्षा व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोकड सुलभ नफ्याला (फ्रीकॅश फ्लो) अग्रक्रम देतो. मूल्यांकन आकर्षक वाटले तरी एखादा अपवाद वगळता आम्ही उत्सर्जनात दृश्यमानता आल्याशिवाय आम्ही सहसा गुंतवणूक करीत नाही “ असे त्यांचे सांगणे असते. आमच्या दृष्टीने जे व्यवसाय ‘रिटर्न ऑन इक्विटी’ आणि ‘रिटर्न ऑन कॅपिटल’ निर्माण करू शकत नाहीत, ते संपत्तीची निर्मिती करू शकत नाहीत.’’ म्हणून या फंडाच्या गुंतवणुकीत २० टक्क्यांपेक्षा कमी ‘रिटर्न ऑन इक्विटी’ असलेल्या मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांचा आम्ही समावेश करणार नाही.” चांगले समभाग हे चांगल्या मित्रासारखे असतात,‘चांगले व्यवसाय जे गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकतील अशा व्यवसायात आमची गुंतवणूक करायची तयारी असते. आमचे फंड घराणे कायम एखाद्या कंपनीपेक्षा व्यवसायाकडे अधिक लक्ष देते. उद्योग व्यवसाय निश्चित केल्यानंतर आम्ही कंपन्यांकडे वळतो. एखादा व्यवसाय चांगला असेल पण तो व्यवसाय सांभाळणाऱ्यांची नियत चांगली नसेल तर त्या व्यवसायात सोने जरी पेरले तरी माती होते. ज्यांची नियत खराब आहे असे प्रवर्तक आम्ही टाळले आहेत. प्रत्येक व्यवसायासाठी चांगले-वाईट दिवस येतच असतात. चांगले दिवस आले म्हणून आम्ही गुंतवणूक वाढवत नाही किंवा वाईट दिवस आले म्हणून समभाग विकून टाकत नाही.” असे ते नेहमी सांगत असतात. ‘मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स’ अशी इंग्रजी म्हण आहे तसेच ‘द पोर्टफोलिओ मॅनेजर नोन बाय द बिझनेसेस ही ओन्स’ असे त्यांचे सांगणे असते. एखद्या उद्योगाच्या बाबतीत बोलायचे तर कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाले म्हणून आम्ही गुंतवणूक वाढवत नसतो किंवा मुल्यांकन वाढले म्हणून विकून टाकत नसतो. व्याजदर कमी झाले, म्हणून खेळत्या भांडवलाच्या खर्चात बचत झाली म्हणून आम्ही भांडवली वस्तू उद्योगातील कंपन्या खरेदी केल्या नाहीत. आमच्यासाठी व्यवसायातील रोख नफ्याची टक्केवारी किती हे महत्त्वाचे आहे. कितीही चांगली कंपनी असली केवळ उत्सर्जनात (अर्निंग पर शेअर) दृश्यमानता नसल्याने टाटा स्टील अपवादाने कॅनरा रोबेकोच्या फंडात दिसली.
या फंडासाठी समभाग निवडीचीचे निकष आमच्या अन्य फंडांसारखेच असतील. आहे. आमचे गुंतवणूक तत्त्वज्ञान हे अगदी सोपे आहे. आम्ही या मल्टीकॅप फंडामध्ये वेगळ्या प्रमाणात हे तत्त्वज्ञान वापरणात आहोत. या फंडाचा ५०% पोर्टफ़ोलिओ हा स्थिर व्यवसाय असलेल्या लार्ज कॅप मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या असतील. उर्वरित ५० टक्के हा अशा व्यवसायांसाठी ठेवला आहे जे अल्फा तयार करू शकतील. म्हणून फंडाच्या पोर्टफोलीओचे दोन भाग आहेत. वृद्धीदरात सातत्य राखणारे चक्रवाढ व्यवसाय आणि अल्फा निर्मिती करू शकणाऱ्या कंपन्या. पहिल्या भागात बाजार घसरणीत भांडवलाला कमी हानी पोहचवणारे व्यवसाय जे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित होत आहेत. फंडाचा ८० टक्के परतावा या भागातून येईल. बाजार घसरणीत मुद्द्लाला कमीत कमी हानी पोहचेल याची दक्षता घेणारा हा भाग आहे. या भागातील कंपन्या सिद्ध व्यवसाय कुशल व्यवस्थापित व्यावसाय असतील. जेथे कमाईची दृश्यमानता तुलनेने अधिक आहे आणि व्यवस्थापन सक्षम आहे आणि ज्यांच्या सचोटीवर शंका घ्यायला वाव नाही असे व्यवसाय या भागात असतील. त्यामुळे ते संपूर्ण पोर्टफोलीओमध्ये बाजाराच्या घसरण काळात पोर्टफोलिओला त्या घसरणीपासून वाचविण्याचे काम करतील. फंड व्यवस्थापनामध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात एक म्हणजे जोखीम व्यवस्थापन आणि दुसरा म्हणजे निवडलेल्या कंपन्यांचे योग्य प्रमाण ठरविणे. पोर्टफोलिओचा हा पहिला भाग प्रामुख्याने १० ते १२ टक्के वार्षिक परतावा मिळविण्याबरोबर जोखीम व्यवस्थापन सुनिश्चित करेल.
मल्टी कॅप फंड हा अशा प्रकारचा एक प्रकार आहे जिथे तुम्ही बाजारपेठेतील लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करता. ज्यांचे व्यवसाय सिद्ध आहेत अशा लार्जकॅप जे मुखत्वे वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्या त्या व्यवसायाचे नैतृत्व करीत आहेत. या ‘लो बीटा’ कंपन्या असतात. दीर्घकाळ स्थिरतेसह कार्य करतात त्यामुळे पोर्टफोलिओमधील एकूण जोखीम कमी होते. दुसरे म्हणजे ते पोर्टफोलिओमधील व्यापक बाजार सहभागाद्वारे अल्फा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. मागील १० वर्षांतील डेटा तपासाला असता, असे आढळते की मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांनी लार्ज कॅप कंपन्यांपेक्षा अधिक संपत्ती निर्माण केली. मल्टीकॅप फंडामध्ये या सर्व कंपन्यांची अतिशय विवेकाने निवड केलेली असते. जेथे ते आपल्याला पोर्टफ़ोलिओच्या स्थैर्यासह ३ ते ५ वर्षात चांगला अल्फा निर्माण करण्यास मदत करते. जे गुंतवणूकदार मध्यम जोखीम घेणारे आहेत आणि ज्यांचा बाजारातील विशिष्ट फारसे संशोधन करण्याचा कल नाही, असे गुंतवणूकदार दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी कॅनरा रोबेको मल्टी-कॅप फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. कुठल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करायचा या पेक्षा कोणत्या कंपन्या टाळायच्या हे निश्चित ठरलेले आहे. इनव्हेस्टमेंट प्रोसेसेस निश्चित असल्याने साहजिकच कोणत्या कंपन्या असतील हे सुद्धा निश्चित आहे. फंड घराण्याच्या सक्रीय संशोधन परिघात २९० कंपन्यांचा समावेश आहे. या पैकी ७० ते ८० कंपन्यांचा या फंडाच्या पोर्टफोलिओत समावेश असेल. ‘निफ्टी ५०० मल्टीकॅप ५०:२५:२५ टीआरआय’ हा निर्देशांक या फंडाचा मानदंड आहे. सिद्ध आणि स्थिर व्यवसायांवर आधारित, ज्यात वेगाने उत्सर्जन वाढीची शक्यता आहे आणि ज्या कंपन्यांत स्वच्छ आणि नितिमान व्यवस्थापन आहे अशा कंपन्यांचा या फंडाच्या गुंतवणुकीत समावेश असेल. साहजिकच तीन वर्षात हा फंड वार्षिक १२ ते १५ टक्के दराने परतावा देईल अशी आशा आहे. वार्षिक १२ ते १५ टक्के दराने परतावा देणाऱ्या फंडाला “जाद शी घडे की असेच म्हणावे लागेल.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top