रंग माझा वेगळा

या फंडाची ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांत आहे ज्यांच्या उत्सर्जनात (ईपीएस) मध्ये सतत वाढ होत आहे.

फोकस्ड फंड हा फंड प्रकार ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’च्या वाचकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. डीएसपी ब्लॅक रॉक फोकस्ड २५, आयडीएफसी फोकस्ड इक्विटी आणि अॅक्सीस फोकस्ड २५ या फंडांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला आहे. सध्या हा फंड लार्जकॅप फंड गटात अग्रभागी असला तरी अॅक्सीस फोकस्ड २५ फंडचे विश्लेषण १० जुलै २०१७ रोजी पहिल्यांदा केले होते. तेव्हा पासून या फंडाने ९.३२ टक्के वृद्धी दिली आहे. हा फंड समभाग केंद्रित जोखीम पत्करून परतावा मिळविणारा फंड आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मागील सहा महिम्यांत २१ ते २५ समभाग आहेत. जीनेश गोपनी हे अॅक्सीस फंड घराण्याचे मुख्य समभाग गुंतवणूक अधिकारी आणि या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. जानेवारीच्या फंड फॅक्टशीटनुसार निधी व्यवस्थापकांनी १० टक्के गुंतवणुक रोकड सलग्न प्रकारात ठेवली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत अग्रक्रमाने एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी, श्री सिमेंट, सुप्रीम इंडस्ट्रीज, गृह फायनांस, बजाज फायनांस, बजाज फिनसर्व्ह, इंफोएज (इंडिया), मदर्सन सुमी, या दहा कंपन्या आहेत.

 

या फंडाची ५० टक्के गुंतवणूक मारुती सुझुकी एचडीएफसी बँक पेज इंडस्ट्रीज या सारख्या अशा कंपन्यांत आहे ज्या कंपन्यांच्या उत्सर्जनात (इपीएस) मध्ये सतत वाढ होत आहे. येत्या जून महिन्यांत हा फंड सातव्यावर्षात पदार्पण करेल. फंडाच्या सुरवाती पासून मागील साडेसहा वर्षाचा विचार केल्यास फंडाने लार्जकॅप मिडकॅप, स्मॉल आणि मायक्रो कॅप यांचे सरासरी प्रमाण अनुक्रमे ७५ टक्के १६ टक्के आणि ३ टक्के आणि १ टक्का इतके आहे. पंकज मोरारका यांच्याकडून या फंडाची सूत्रे जीनेश गोपनी यांच्याकडे आल्यापासून स्मॉल आणि मायक्रो कॅप प्रकारच्या समभागांना गुंतवणुकीत स्थान दिलेले नाही. अन्य फंडांच्या परताव्यात मिडकॅप समभागांचे योगदान आहे तसे या फंडाबाबतीत म्हणता येत नाही. या फंडाचा परतावा समभागांची योग्य निवड आणि सक्रीय व्यवस्थापन या दोन गोष्टींमुळे मिळाला आहे. या फंडाची सूत्रे विद्यमान निधी व्यवस्थापकांकडे आल्यापासून जून २०१७ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान पोर्टफ़ोलिओत अमुलाग्र बदल झाले हे बदल पूर्ण होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे या बदलांचे परिणाम आता परताव्यात दिसू लागले आहेत. दर्जेदार व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांच्या योग्य मूल्यांकनात गुंतवणुकीत अंतर्भाव केल्याची व्ही गार्ड, सुप्रीम इंडस्ट्रीज, इंफोएज, सन फार्म अॅडव्हांस रिसर्च ही उदाहरणे दिसतात तसेच योग्य वेळी इन्फोसिसच्या गुंतवणुकीतून बाहेर पडणे ही निधी व्यवस्थापकांच्या सक्रीय गुंतवणूक व्यवस्थापनाची काही उदाहरणे देता येतील. निधी व्यवस्थापकांनी कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीत (आयपीओ) आरबीएल बँक, एस चांद. सीडीएसएल सारख्या कंपन्यांचा समावेश करून योग्य भावात नफावसुली केली तर प्राथमिक समभाग विक्रीपश्चात अॅव्हेन्यू सुपर मार्ट, गोदरेज अॅग्रोव्हॅट, एमएएस फिनांशीयल सर्व्हिसेस या सारख्या कंपन्यांचे गुंतवणुकीत प्रमाण वाढवत नेले.

नियोजनबद्ध गुंतवणुकीवर (एसआयपी) मागील दहा वर्षात सर्वाधिक परतावा देणारा फंड हा आयसीआयसीआय प्रूडेशियल व्हॅल्यु डिस्कव्हरी फंड आहे. परंतु पाच वर्षाच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा देणाऱ्या पहिल्या वीस फंडात आयसीआयसीआय प्रूडेशियल व्हॅल्यु डिस्कव्हरीचा समावेश नाही. दहा वर्षाचा विचार केल्यास नियोजनबद्ध गुंतवणुकीवर २० टक्यांहून अधिक परतावा असलेला हा एकमेव फंड आहे. परंतु १७ ते १९ टक्यांच्या दरम्यान परतावा देणारे तब्बल २१ फंड आहेत. पाच वर्षाच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर १९ ते १६ टक्क्यांच्या दरम्यान परतावा देणारे २० फंड आहेत. पाच आणि दहा वर्षाच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर परताव्याच्या दरावर आधारीत केलेल्या यादीत केवळ पहिल्या पाच फंडात केवळ एक आणि पहिल्या दहात केवळ दोन फंड आहेत. सातत्य राखणारे फंड शोधणे आणि विश्लेषकांनी शिफारस केल्यानंतर त्या फंडात गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या पचनी पडणे कठीण असते. प्रत्येक गुंतवणूकदार वेगळ्या ‘रंगात’ न्हालेला असतो.  या फंडाच्या पोर्टफोलीची पुन:र्रचना पूर्ण होत असतांना जुलै २०१७ मध्ये पहिल्यादा या फंडाचे विश्लेषण केले होते. समभाग केंद्रित जोखीम आणि सक्रीय व्यवस्थापन हे या फंडाचे वेगळेपण उद्याच्या रंगपंचमीच्या निमित्ताने अन्य फंडापेक्षा वेगळेपण जपणारा हा फंड गुंतवणुकीची शोभा वाढवेल या अपेक्षेने केलेली ही शिफारस

 

 

अधिक माहितीसाठी  खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top