त्रिवेणी

 

एबीएसएल टॅक्स रिलीफ 96 हा इएलएसएस (आयकर वजावट पात्र) फंड गटातील एक २२ वर्षे जुना फंड आहे. मार्च ९६ पासून या फंडाने २४ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मागील २२ वर्षात हा फंड आपल्या कारकिर्दीत तीन आर्थिक आवर्तनांना सामोरा गेला. मागील ३ वर्षात फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. कामगिरीतील सुधारणेच्या बळावर हा फंडाचा ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत कर्ते म्युच्युअल फंडाच्या सुधारित यादीत समावेश झाला आहे. व्हॅल्यू रिसर्चने या फंडाच्या रेटिंग मध्ये नुकतीच सुधारणा केली असून ‘थ्री स्टार’वरून या फंडाचे रेटिंग फाईव्ह स्टार केले आहे. या फंडाच्या २२ वर्षापैकी मागील १२ वर्षे अजय गर्ग या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाची गुंतवणुक मल्टीकॅप प्रकारची आहे. गुंतवणुकीत ५३ टक्के समभाग मिडकॅप असून ४०.७५ टक्के लार्जकॅप तर २.८७ टक्के स्मॉलकॅप प्रकारचे आहेत. फंडाचे गुंतवणूक धोरण ‘बॉटम अप अॅप्रोच’ हे आहे. दर्जेदार कंपनी व्यस्थापन हा गुंतवणूकीसाठी समभाग निवडीचा मूलमंत्र आहे. व्यावसायीक प्रवर्तक, आदर्श व्यवस्थापन प्रथांचे कसोशीने पालन करणाऱ्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश झाला आहे. एबीएसएल एमएनसी फंडाचे अजय गर्ग हे निधी व्यवस्थापक असल्याने एबीएसएल टॅक्स रिलीफ 96 या फंडाच्या गुंतवणुकीत पहिल्या पाच पैकी चार कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. फंडाची ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मालमत्ता ६४८० कोटी होती. फंडाने आरोग्यनिगा, वाहन उद्योग व पूरक उत्पादने, वैयक्तिक उपभोगाच्या वस्तू, बँक, इत्यादीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. हनीवेल ऑटोमेशन, जिलेट, रिलायंस इंडस्ट्रीज,  बायर क्रॉपसायन्स आणि फायझर या गुंतवणुकीतील आघाडीच्या पाच कंपन्या आहेत.

कर वजावटीसाठी करायच्या गुंतवणुक साधनांमध्ये सर्वाधिक परतावा इएलएसएस फंडांनी दिलेला आहे. बाजारातील २००८ आणि २०११  मधील घातक चढउतारात या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याचे सोबतच्या कोष्टकात दिसत आहे. फंड निवडीचे जे काही निकष आहेत त्यापैकी पराताव्यातील सातत्य, फंडाची मालमत्ता आणि व्यवस्थापन खर्च (एक्स्पेन्स रेशो) हे महत्वाचे निकष आहेत.या निकषांवर आधारित एबीएसएल टॅक्स रिलीफ 96 या फंड कर वजावट प्राप्त दीर्घकालीन गुंतवणुकीस पात्र ठरतो. या फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक एसआयपी रक्कमेच्या १०० पट नि:शुल्क विमाछत्र गुंतवणूकदारास काही अटी आणि शर्थींच्या अधीन मिळविता येते. या फंडाच्या एसआयपीतून कर बचत, संपत्तीची निर्मिती आणि नि:शुल्क विमा छत्र असे तीन लाभ मिळविता येतात.

 

अधिक माहितीसाठी खालील Form भरा: [contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top