वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले..

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते.

भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने वस्तूंचा उपभोग (कंझमशन) ही गोष्ट परदेशी गुंतवणूक अर्थसंस्थासाठी भारत हा गुंतवणुकीसाठी आकर्षण राहिला आहे. काही फंड घराण्यांच्या म्युच्युअल फंडाच्या योजना उपभोग याच संकल्पनेवर आधारीत आहेत. कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा सुद्धा फंड याच संकल्पनेवर आधारीत आहे. परंतु या फंडातील गुंतवणुकीसाठी उपभोग ही संकल्पना केवळ ग्राहकउपयोगी वस्तूंपुरती मर्यादित न ठेवता उपभोगाच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर गुंतवणुकीसाठी करण्यात आला आहे. तरुण वर्ग नवीन घरे घरे घेतो. घर बांधण्यासाठी सिमेंट, पोलाद रंग आणि या वस्तुनाच्या बरोबरीने ही घरे घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. या या व अशा अनेक उपभोगाच्या संकल्पना या फंडात दिसून येतात. फंडाच्या गुंतवणुकीत हिंदुस्थान युनिलिव्हर आहे तसा मल्टीप्लेक्स व्यवसायात असलेला पीव्हीआर आहे. बिस्किटे चीज या सारख्या तयार खाद्य पदार्थांचा उत्पादक ब्रिटानिया आहे तसाच पिझ्झा दालनांची साखळी असलेला ज्यूबीलीएंट फूडवर्क्स सुद्धा आहे. गृहउपयोगी वस्तूंचा निर्माता व्हरपुल आहे तसाच ग्रामीण भागातील वित्तीय सेवा देणारा एल अँड टी फायनांशियल होल्डिंग्जआणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशियल सर्व्हिसेस या समभागाचा समावेश आहे.

कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा मल्टी सेक्टर फंड आहे. हा फंड फायनांशियल ऑपोरच्युनीटीज रिटेल कंझमशन अँड एन्टरटेनमेंट या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणारा फंड असून या सेक्टर्सच्या आद्याक्षरांपासून ‘फोर्स’ हा शब्द तयार झाला आहे. हा मल्टी सेक्टर्स प्रकारचा फंड असल्याने गुंतवणुकीसाठी क्रम गुंतवणूक खाजगी बँका, ग्राहकांभिमुख टिकाऊ वस्तू, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, माध्यमे आणि मनोरंजन वैयक्तिक वापराच्या वस्तू असा ठरविला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, झी एन्टरटेनमेंट एचडीएफसी कोटक महिंद्रा बँक इंडसिंध बँक हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिन्सर्व्ह आयटीसी, ज्यूबीलीएंट फूडवर्क्स, ब्रिटानिया, सन टीव्ही, यां समभागांचा समावेश पहिल्या दहा क्रमांकात आहे. फंडाच्या गुंतवणुकीत असलेले डीसीबी बँकेचे सर्व समभाग मागील महिन्यांत निधी व्यवस्थापकांनी विकून टाकले असून कोणत्याही कंपनीचा नव्याने गुंतवणुकीत समावेश केलेला नाही. मागील वर्ष भरात सर साधारणपणे फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३३ समभागांचा समावेश होता. सध्याच्या पीएनबी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फंडाच्या गुंतवणुकीत एकाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला गुंतवणुकीत निधी व्यवस्थापकांनी स्थान दिलेले नाही ही नक्कीच दखल घेण्यायोग्य गोष्ट आहे. हा फंड वर उल्लेख केलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांत एकूण गुंतवणुकीच्या १०० ते ६५ टक्क्यांदरम्यान गुंतवणूक करू शकतो. उर्वरीत गुंतवणूक अन्य उद्योग क्षेत्रातील समभागांत करण्याची निधी व्यवस्थापकांना मुभा आहे. जानेवारी महिन्याच्या फंड फॅक्टशीट नुसार, पहिल्या ५ गुंतवणुकांची टक्केवारी ३४.२१ तर पहिल्या १० गुंतवणुकांची टक्केवारी ५२.८४ टक्के आहे. फंडाच्या गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक आर्थिक सेवा आणि वित्तपुरवठा क्षेत्रातील कंपन्यांतून केली आहे.

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते. दर दहा वर्षाला पिढी बदलते तशी पिढीगणित उपभोगाची संकल्पना सुद्धा बदलत असते. आजची चैन भावी पिढीची गरज असते. पंचवीस वर्षापूर्वी घरी दुचाकी येणे हा साजरा करण्याचा सोहळा असे. आज मारुतीच्या ‘अल्टो के टेन’ किंवा ‘वॅगन आर’ यांची खरेदी बे दाखल झालेली आहे. मारुतीच्या ग्राहकांची पसंती लाभलेल्या मॉडेल्समध्ये वेगाने बदल होत आहेत. कुटुंबाचे वाढते उपोभोग्य उत्पन्न (डिस्पोजेबल इन्कम) आणि उपभोग यांच्यात जवळचा समंध आहे. वाढत्या उपोभोग्य उत्पन्नामुळे उद्याची खरेदी कर्ज काढून पण आजच करण्याकडे नवीन पिढीची मानसिकता उपभोगला अग्रक्रम देणारी आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा वार्षिक दर डोईउत्पन्न हजार डॉलर्सच्या आसपास होते तेव्हा भारतात ‘रोटी कपडा मकान ‘ या गोष्टींना प्राधान्य होते. आज भारताचे वार्षिक दर डोई उत्पन्न १८०० डॉलर्सवर पोहचले असल्याने प्राथमिक गरजा भागविल्यानंतर मोबाईल टीव्ही आणि वॉशिंग मशीनची खरेदी होतांना दिसत आहे. हाच कल थोड्या फार बदलाने पुढील वीस पंचवीस वर्षे टिकून राहिलेला दिसेल. म्हणूनच ग्राहकांची पसंती लाभलेल्या या उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक चागला नफा मिळविण देईल या बद्दाल शंका बाळगण्याचे करण नाही.

अधिक माहितीसाठी  खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top