रिझर्व्ह  बँकेचे पत धोरण आणि फेडच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुंदरम म्युच्युअल फंडाचे मुख्य रोखे गुंतवणूक अधिकारी द्विजेंद्र श्रीवास्तव यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपादित अंश  

रिझर्व्ह बँकेने भारतातील महागाईला वेसण घालण्यासाठी व्याज दरात वाढ केली. रिझर्व्ह बँकेला महागाई नियंत्रणात आणण्यात यश आले. या बाबतीत तुमची काय मते आहेत?

भारतात, ग्राहक किंमत निर्देशांकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न धान्य (४५.८६%) या पैकी तृणधान्ये (९.६७%)  दूध आणि दुग्धजन्य उत्पादने (६.६१%) भाज्या (६.०४%), मांस आणि मासे (३.३६%) आणि तेल आणि तेलबिया (३.५६%) आहे. दुसरा महत्वाचे घटक म्हणजे इंधन, कपडे आणि पादत्राणे, परिवहन आणि दळणवळण, आरोग्य निगा  आणि शिक्षण आहेत. ऊर्जेच्या आयातीवरील अवलंबित्व, मोसमी शेती क्षेत्रावर मान्सूनच्या पावसाचा अनिश्चित परिणाम, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि घसरत्या रुपयामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे वित्तीय तुट वाढत आहे. यांमुळे भारतातील ग्राहक किंमतीत खूपच अस्थिरता आली अनुभवण्यात येत आहे. महागाईचा दर मोजण्याच्या पद्धतीत बदल झाले. घाऊक किंमत निर्देशांक (डब्युपीआय) कडून रिझर्व्ह बँकेने ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधाभूत मानण्यास सुरवात केली. करोना काळात निर्माण झालेली टंचाई आणि करोना पश्चात जिन्नस आणि अन्नधान्य पुरवठा विस्कळीत झाल्याने अन्नधान्याच्या किंमतीत वाढ झाली. मे २०२२पासून रिझर्व्ह बँकेने भारतातील महागाईला वेसण घालण्यासाठी व्याज दरात वाढ करण्यास सुरवात केली.  व्याजदर वाढ आणि पुरवठ्यात सुरळीतपणा आल्यामुळे महागाई कमी झाली. एक निधी व्यवस्थापक या भूमिकेतून पाहिल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील व्याज दर फरक ठेवणे गरजेचे होते. भारतापेक्षा अमेरिकेत महागाई वेगाने वाढली. आणि फेडने व्याज दर वाढीचा सपाटा लावल्याने रुपयाला तीव्र घसरणीपासून वाचविण्यासाठी भारतात व्याजदर वरच्या पातळीवर राखणे ही अपरिहार्यता होती.

मागच्या आठवड्यात ‘फेड’ने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. या कडे तुम्ही कसे पाहता?

‘फेडरल रिझर्व्ह’च्या २०२३ मधील अखेरच्या आढाव्यात व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेतला. जूलै पासून व्याज दर स्थिर राखले आहेत. ‘फेड’ने जानेवारीपासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षात तीन टप्प्यात व्याज दर कमी करण्याची संकेत दिले आहेत. अमेरिकेतल्या वाढलेल्या महागाईवर काबू मिळविण्यासाठी मार्च २२ पासून ‘फेड’ने व्याजदर वाढविण्यास सुरवात केली. व्याज दरांनी मागील २२ वर्षातील शिखर गाठल्यानंतर नवीन वर्षात व्याज दर कपातीचे दिलेले संकेत म्हणजे ‘फेड’चा महागाई विरोधातील लढा पुढील टप्प्यावर पोहाच्याचे संकेत आहे. अमेरिकेतील चलनवाढीचा दर एका वर्षाच्या ७.७५ टक्यांच्या तुलनेत ३.७० टक्यांवर आला आहे. अमेरिकेतील महागाईच्या दराची मागील  पन्नास वर्षातील सरासरी ३.२४ टक्के असल्याने अजूनही महागाई या सरासरीपेक्षा अधिक आहे. ‘फेड’च्या या संकेतामुळे बाजारपेठेत चैतन्य परतले. ‘फेड’च्या दहा वर्षाच्या सरकारी रोख्यांवरील परतावा कमी झाला. जरी ‘फेड’च्या अध्यक्षांनी दर कपात कधी सुरू होईल या वर स्पष्ट संकेत देणे टाळले असले तरी, महगाई कमी होण्याबाबत समाधान व्यक्त केले. घर खरेदी आणि वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा स्वस्त होण्याचे संकेत असल्याने मागणी वाढून बेरोजगारीचा दर कमी होईल.

अमेरिकेत व्याजदर भविष्यात शून्याच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे का?

अलीकडील अमेरिकेतील महागाईच्या घसरणीला अनेक घटक कारणीभूत आहेत. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे इंधनाच्या किमती कमी होणे. अलिकडच्या काही महिन्यांत इंधनाच्या किमती झपाट्याने घसरल्या आहेत. हिवाळ्यात अंधानाच्या किंमतीत घसरण होणे कठीण असते. या किंमतीत घसरण झाल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किंमती कमी होण्यास मदत झाली आहे. आणखी एक घटक म्हणजे अमेरिकन डॉलर मजबूत होणे अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होत आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी आयात स्वस्त झाली आहे. म्हणूनच, फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर राखले असून भविष्यात व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. महागाई मोजण्याच्या निर्देशंकातील महत्वाचा घटक म्हणजे अन्नधान्य. अमेरिकेतील अन्नधान्याच्या किंमती अजूनही चढ्या आहेत.  घरांच्या भाड्यात मागील चार वर्षात सर्वात वेगाने वाढ झाली. घर मालकांनी देखभाल करणाऱ्या कर्मचार्‍यांचे वाढलेले वेतन आणि दुरुस्ती खर्चात वाढ झाल्याने भाड्यात वाढ केली. दुसरे कारण सर्वसाधारणपणे उपलब्ध भाड्याच्या घरांची आणि विशेषतः परवडणाऱ्या घरांची तीव्र टंचाई मालमत्तांची कमतरता आहे. घरमालक महागाई शून्य असल्याने भाडे करार नूतनीकरणाच्या वेळी भाडे वाढवून मागत नसत. साथीच्या काळात दूरस्थ कामाची लोकप्रियता वाढवल्यामुळे, भाडेकरूंनी पूर्वी तुलनेने कमी भाड्यातील   मोठी घरे शोधली. या स्थलांतरामुळे उपनगरी भागातील भाडे शहरी भागापेक्षा जास्त वाढले, ज्यामुळे भाड्यात वाढ झाली.

घरांच्या शोधात असलेले भाडेकरू स्टुडिओ आणि एक-बेडरूम अपार्टमेंट्स शोधत आहेत, म्हणजे मोठ्या घरांकडून लहान घरात संक्रमित होत आहेत. ज्यामुळे उपलब्ध घरांची मागणी वाढत आहे. अन्नधान्य, इंधन आणि घरभाडी यांच्यात जो पर्यंत मोठी घसरण होत नाही तो पर्यंत महागाई १ -२ टक्के दरम्यान येणार नाही. आणि व्याज दर शून्याच्या जवळपास येण्यास अजून बराच काळ जावा लागेल.  

देशांतर्गत आणि वैश्विक समष्ठी अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळविण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी?  

कॉर्पोरेट बॉंड फंड हा फंड प्रकार किमान ८० टक्के गुंतवणूक ‘डबल ए प्लस’ किंवा त्यापेक्षा अधिक पत असलेल्या कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करते. तुलनेने उच्च व्याजदर जोखीम (ड्यूरेशन रिस्क) आणि मध्यम पत जोखीम (क्रेडिट रिस्क) असलेला फंड प्रकार आहे. कॉर्पोरेट बाँड हे सुरक्षित गुंतवणूक पर्यायातून नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्ही कॉर्पोरेट बाँड फंडांत गुंतवणूक केलीत तर त्या फंडाने उच्च-गुणवत्तेच्या रोखे साधनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते. जेव्हा व्याजदर अपेक्षेपेक्षा जास्त वर जातात तेव्हा या फंडात गुंतवणूक करणे धोकादायक बनतात. परिणामी, कॉर्पोरेट बाँड फंड अस्थिरतेचा सामना करण्यासाठी एक वर्ष ते चार वर्षांच्या रोख्यांत गुंतवणू करतात. तीन ते पाच वर्षाचे रोखे सर्वाधिक रोकड सुलभ असतात. व्याजदर वाढले तरी या मुदतीच्या रोख्यांच्या किंमतीत कमी घसरण होते. तुम्ही तीन ते पाच वर्षाच्या मुदतीसाठी बँक मुदत ठेव करण्याच्या विचारात असाल तर या फंड प्रकारात तितक्याच मुदतीसाठी केलेली गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा देईल.

अधिक माहितीसाठी आणि गुंतवणूकिसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा
+91 97024 90900

खालील लिंकवर क्लिक करून आजच आपली भेट निश्चिंत करा
https://bit.ly/vkEnquiryform

Scroll to Top