चाळीशीतले विम्याचे नियोजन

जीवन विमा हा वित्तीय नियोजनातील पहिला घटक आहे. सर्वात कमी विमा हप्त्यात सर्वात जास्त विमा छत्र देणारा हा प्रकार असला तरी सुमार अर्थ शिक्षित विमा खरेदी इच्छुक शुद्ध विमा (टर्म प्लान) खरेदी करणे टाळतात. भारतातबहुसंख्यांकडे कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. भारतात जीवन विम्याबाबत अनेकदा गैरसमज आहेत. ज्यांना विम्याची फारशी गरज नाही ते अर्थ शिक्षित असल्याने मोठ्या रक्कमेचा शुद्ध विमा खरेदी करतात. ज्यांना पुरेश्या विमा छत्राची आवश्यकता आहे असे विमा खरेदी इच्छुकांना विमा कवच किती महत्त्वाचे आहे हे कळत नाही. लोक शुद्ध विमा का खरेदी करत नाहीत हे समजून घेण्यासाठीविमा खरेदी इच्छुकांचे आर्थिक वर्तन समजून घेतले पाहिजे. भारतातक्वचितच कोणी आर्थिक साधने समजावून सांगण्यासाठी वेळ घालवतात. दुर्दैवानेयामुळे लोक मोठी आर्थिक जोखम घेऊन जगात असतात. भारतात जीवन विमा खरेदी इच्छुक शुद्ध विम्याची खरेदी का टाळतात याची काही मुख्य कारणे अशी सांगता येतील.

पहिले कारण विमाधारक व्यक्तीचे अकाली निधन झाल्यावर शुद्ध विमा त्या दुर्दैवी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देते. मृत्यू ही अशी घटना आहेलोक त्याबद्दल विचार सुद्धा करणे टाळतात. साहजिकच त्याच्या परिणामाचा विचार सुद्धा केलेला नसतो. शुद्ध विमा हा पैशाचा अपव्यय आहे असे असे सुद्धा मानणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भारतात वेगवेगळ्या मान्यताप्राप्त विमा कंपन्यांच्या शुद्ध विमा योजना उपलब्ध आहेत. सर्वच योजना केवळ जीवन विमा डेट नाहीत. काही योजना टर्म प्लॅन्स प्रमाणेच जीवन कवच देतात परंतु काही मुदतपूर्ती नंतर लाभ देखील देतात. आज अनेक युनिट-लिंक्ड विमा योजना उपलब्ध आहेत. या योजना  गुंतवणुकीच्या संधी आणि जीवन विमा संरक्षण दोन्ही देतात. परंतु युलिपकडे अनेकदा नकारात्मकतेने पाहिले जाते. बरेच पर्याय उपलब्ध असल्यानेकोणते उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे याबद्दल लोक गोंधळून जातात. जेव्हा ते समजू शकत नाहीत किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. विमा विक्रेत्यांचा कल देखील शुद्ध विमा विकण्याकडे नसतो.

बहुतेक लोक वैयक्तिक विमा पॉलिसी घेण्यास नकार देतात कारण ते जिथे नोकरी करतात त्या ठिकाणी घेतलेल्या समूहा विमा योजनेचे सभासद असतात. अनेकांना असे वाटते की समूह विमा (ग्रुप पॉलिसी) मिळणारे विमा छत्र त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे आहे. बर्‍याचदासमूह विमा योजनांद्वारे प्रदान केलेले विमा छत्र खूपच कमी असते. तसेच या योजनेचे सभासद असलेल्या व्यक्तीने विद्यमान नोकरी सोडून दुसरी नोकरी सोडली तर त्यांचे विमा छत्र रद्द होते. वय वाढल्याने नवीन टर्म प्लान घ्यायचा तर विमा हप्ता महाग झालेला असतो. त्यामुळे विमा खरेदी करीत नाहीत. कमावत्या व्यक्ती जीवन विमा न घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ते निरोगी आहेत हा त्यांचा गैरसमज असतो. त्यांच्या मतेत्यांना विम्याची आवश्यकता नाही. ते आपल्या रोग्याची उत्तम काळजी घेतात. ते आजारी पडण्याची किंवा मरण्याची शक्यता नाही. त्यांना हे कळत नाही की निरोगी व्यक्तींना भारतात जीवन विमा खरेदी करणे किती स्वस्त आहे. ज्या तरुण व्यक्तींचे आरोग्य उत्ताम आहे अशा व्यक्तींना  किफायतशीर विमा हप्त्यात विमा संरक्षण मिळू शकते. भारतातविमा छत्र अनिवार्य असणारा कोणताही कायद्याच्या अभावामुळे अनेक जण विमा खरेदी करीत नाहीत. जीवन विमा पॉलिसी घेण्याचे योग्य वय कोणते या बद्दल लोकांच्या मनात कायम संभ्रम असतो. बहुतेक तरुण विमा खरेदी इच्छुकांना स्वस्त हप्यात मोठे विमा छत्र मिळू शकते, कारण नजीकच्या काळात कंपनीकडे दावा मंजूर करण्याची वेळ येणार नसते. जसजसे लोकांचे वय वाढत जातेतसतसे त्यांची जोखीम क्षमता वाढतेम्हणून विमा हप्ता वाढत जातो.

योजना विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इच्छुकांना भेडसावणारा पहिला प्रश्न म्हणजे – विमा छत्र किती असावे आणि त्यासाठी किती विमाहप्ता द्यावा हा असतो. बहुतेक लोक याचा फारसा विचार करत नाहीत आणि त्यांच्या विमा एजंटने सुचविलेल्या विमा छ्त्राची (साधारणपणे १ कोटी रुपये असते)  आवश्यकता आहे का उदाहार्णार्थ २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ४० वर्षीय महिलेसाठीएका विमा कंपनीच्या एका संकेत स्थळावर १ कोटी रुपयांचे विमा छत्र घेण्याचे सुचविलेले असते.  तर दुसर्‍याने ३ कोटी रुपयांच्या विमा छत्राची आवश्यकता दर्शविलेले असते. एका सर्व साधारण नियमानुसार तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १०, १५ किंवा २० पट विमा छत्राची आवश्यकता आहे. परंतु तुमच्या शुद्ध विम्याची गरज तुमच्या कौटुंबिक गरजांनुसार आणि तुमच्यावर असलेल्या कर्जानुसार असते. तीन पद्धतीने विमा छत्र निश्चित करता येते.

पहिली पद्धत ‘इंकम रिप्लेसमेंट मेथड’
टर्म लाइफ कव्हरचा प्राथमिक उद्देश तुमच्या कौटुंबिक खर्चात तुमचा वाटा किती आहे. तुमच्या अकाली निधना नंतर अनुपस्थितीत तुमच्या खर्चाच्या वाटा उचलून तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्यावर  अवलंबून असलेल्यांना तुमची आर्थिक उणीव भासणार नाही याची ताजवीज करणे हा होय. यासाठी विमा कंपनीने दिलेली एकरकमी भरपाई पुरेशी असणे आवश्यक आहे. आता माझे स्वत:चे उदाहरण घेऊ मी ४० वर्षांचा असातांना पहिला टर्म प्लान खरेदी केला तेव्हा माझी मुलगी ४ वर्षाची होती. तिच्या वयाच्या २५ व्या वर्षा पर्यंत तिला आर्थिक मदतीची आवश्यकता लागेल असे वाटल्याने विम्याची मुदत २० वर्षे निश्चित केली. त्यावेळी आमचा घराचा खर्च ३० हजार रुपये होता, आणि या खर्चाचा मोठा वाटा मी उचलत असे. महागाई मुळे हा खर्च वाढत जाणार असे गृहीत धरून जे गणित मांडले त्यानुसार १.६८ कोटी विमाछत्राची आवश्यकता होती. या साठी ७५ हजार विमाहप्ता द्यावा लागणार होता.  

सरी पद्धत: वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक रक्कमेइतके विमा छत्र
विम्याची आवश्यक गरज किती हे तुमच्या कुटुंबाच्या राहणीमानावर अवलंबून असते. परंतु प्रत्येक कुटुंबाची काही आर्थिक उद्दिष्टे असतात.या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तुमच्या भविष्यातील उत्पन्नातून काही हिश्याची बचत होणार असते. तुमच्या शुद्ध विमा छात्रातून या साठी निधी मिळणे आवश्यक असते. आमची मुलगी श्रीयाच्या २१ व्या वर्षी तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवीसाठी जर ५० लाख रुपयांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधीची आवश्यकता गृहीत धरली तर आणखी ५० लाखांचा विमा आवश्यक आहे.      

तिसरी पद्धत : न फेडलेली कर्जे
तुमच्या कुटुंबाची जीवनशैली आणि उद्दिष्टे यांची काळजी घेण्यासाठी अत्यंत सावधगिरीने नियोजन केल्यामुळेतुमच्या निधनानंतर तुमच्या कुटुंबाला तुमच्या वतीने न फेडलेली कर्जे फेडावी लागतील.  गृहकर्जवाहनवैयक्तिक आणि न दिलेली क्रेडिट कार्डांची बिले यांचा सुद्धा आवशक विमा छत्राच्या आवश्यकतेमध्ये अंतर्भाव करणे आवश्यक असते. तुमच्‍या कर्जांचा अंदाज लावतांना गृह कर्ज वाहन कर्ज या सारख्या मोठ्या न फेडलेल्या कर्जाचा अचूक अंदाज लावता येतो. आपण कळत न कळत अनेक समूह विमा अपघाती समूह विम्याचे लाभार्थी असतो जसे की प्रत्येक क्रेडीट कार्डाला २ लाखांच्या अपघाती विम्याचे संरक्षण असते. वेगवेगळ्या समूह विमा लाभांची यादी आपल्या वारसांना ठाऊक असायला हवी. जेणे जरून आपल्या पश्चात या लाभांसाठी दावा करता येईल. त्यामुळेतुमच्या आयुष्यात एकदाच मुदत विमा योजना खरेदी करणे आणि विमा हप्ता भाराने पुरेसे नाही. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे विमा छत्र आहे याची खात्री करण्यासाठी तुम्हाला एकदा वित्तीय नियोजनाचे पुनरावलोकन करावे लागेल.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top