‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा

म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने समभाग, रोखे आणि हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या विविध फंड गटातील निवडक ३ फंड निवडण्यासाठी विविध शैलींमध्ये आणि विविध फंड गटातील हजारो फंडांच्या एका वर्षाच्या चलत परताव्यानुसार (वन यिअर रोलिंग रिटर्नस) आणि जोखीम समायोजित परताव्याच्या कामगिरीनुसार यादीबनवून फंडांची शिफारस केली जाते. आवश्यकतेनुसार निधी व्यवस्थापकांशी चर्चा केली जाते. जानेवारी मार्च या तिमाही आढाव्यात असे आढळून आले की सरलेली तिमाही तुलनेने कमी अस्थिर तिमाही होती. सहाजिकच मागील वर्षांतील ऑक्टोबर डिसेंबर आणि जानेवारी मार्च या तिमाहीतील अस्थिरतेत मोठा फरक आढळला. ऑक्टोबर डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी मार्च तिमाहीत अस्थिरता कमी होत असलेली दिसून आली. सेबीच्या डझनभर वर्गवारी वापरण्यापेक्षा मालमत्ता वर्गानुसार अधिक मालमत्ता असलेल्या आठ गट निवडून त्या गटातील फंडांची क्रमवारी निश्चित केली.
ऑक्टोबर डिसेंबर २०२२मधील तेजीनंतर, जानेवारी मार्च २०२३ च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा एकदा मंदीच्या तडाख्यात सापडला. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनानंतर आणि क्रेडिट सुईसच्या खरेदीमुळे जागतिक बँकिंग संकटाची भीती कमी झाली तरी स्तरावर विविध देशांच्या बाजारात मोठी घसरण अनुभवास आली. जानेवारी मार्च तिमाहीत निफ्टी ५० टीआआय निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरला तर सेन्सेक्स २.८ टक्क्यांनी घसरला. तिमाही फंड आढाव्यात क्वचितच एखादा फंड वगळला जातो. कर्त्यांच्या यादीतून एखादा फंड वगळण्याचे ठरवल्यास, त्या फंडाला वगळण्याआधी सुधारणेसाठी पुरेसा वेळ दिला जातो. त्या नंतर तो फंड ‘राखून ठेवा’ (होल्ड) प्रकारात वर्ग केला जातो. या प्रकारात विद्यमान गुंतवणूक राखुन ठेवू शकता आणि फंडातून बाहेर पडण्याचे कोणतेही कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पुनरावलोकनात वगळलेल्या फंडांचा मागोवा घेणे थांबवत नाही. अनेकदा असे वगळलेल्या फंडांनी काही कालावधी नंतर पुनरागमन केल्याचे दिसून येते. बर्‍याच प्रसंगी नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त ‘राखून ठेवावे’ या प्रकारात असतील तर वाचकांनी या प्रकारच्या फंडांचा एकत्रित विचार केला पाहिजे. तुमच्यापोर्टफोलीत खूप फंड असतील तर एकाच फंड गटातील ‘होल्ड’ प्रकारातील फंड वगळणे (एसआयपी थांबविणे) योग्य ठरते. गेल्या ५-७ वर्षांमध्ये, अनेक फंडांनी कामगिरीत घसरण अनुभवली. ज्यामध्ये सातत्य दाखवण्याऐवजी अचानक अल्प कालावधीसाठी (एकाद्या तिमाहीत) कामगिरीत सुधारणा (बाउन्स बॅक) दिसून आली. तुमची मोठी गुंतवणूक सक्रीय व्यवस्थापित फंडात असेल तर पोर्टफोलीओचे कमी व्यवस्थापन केले पाहिजे आणि पोर्ट फ़ोलिओत निश्क्रीय व्यवस्थापित फंड असतील तर पोर्टफोलीओचे सक्रीय व्यवस्थापन केले पाहिजे. एक अब्यासक म्हणून दीर्घकालीन एसआयपी करण्याच्या तत्त्वज्ञानावर ठाम विश्वास आहे. परंतु एखाद्याने आयुष्यभरासाठी फंडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे या मतावर रुद्ध ठाम विश्वास आहे. दुसऱ्या शब्दांत, फंडांचे मंथन करण्यावर अजिबात विश्वास नाही केल्याने काहीही प्राप्त होत नाही तरीही पोर्टफ़ोलिओचा वार्षिक वाढावा घ्यायला हवाच.
मिरे अॅसेट लार्जकॅप, एक लोकप्रिय फंड असला तरी जुलै २०२२ पासून फंडाची कामगिरी खालावलेली दिसत आहे. लार्ज-कॅप फंड गटात ८० टक्के फंडांनी त्यांच्या मानदंडाच्या तुलनेत खराब कामगिरी केली. निर्देशांकाच्या तुलनेत बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्याचा फटका या फंडाला बसला आहे. मागील दहा वर्षात दुसऱ्यांदा या फंडाला ‘कर्त्यांच्या’ यादीतून या फंडाला वगळावे लागत आहे. प्रदीर्घकाळ कर्त्यांच्या यादीचा भाग असलेल्या कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंडाची कामगिरी जुलै २०२२ पासून कामगिरी खालावलेली असली तरी एस अॅण्ड बीएसई ५००च्या ६टक्के घसरणीच्या तुलनेत फंडाच्या एनएव्हीत ३.९ टक्केच घसरण झाली. तथापि फंडाच्या पोर्टफोलीत दर्जेदार कंपन्यांचा समावेश असल्याने सर्वाधिक गुंतवणूक (एचडीएफसी बँक) असल्याने हा फंड मंदीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकला. सर्वाधिक होल्डिंगसह स्टॉक असलेल्या फंडांनी बाजारातील घसरण चांगल्या प्रकारे सहन केली. हा फंड देखील, , घसरणीला सामोरे जाण्यात यशस्वी झाला. म्हणूनच तुलनेने खराब कामगिरी असूनही या फंडाला वगळण्यात आलेले नाही.
स्मॉलकॅप फंड गटात फ्रँकलीन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाचा पहिल्यांदा समावेश झाला आहे. स्मॉल कॅपची व्याख्या वर्षानुवर्षे सुमारे रु. 17,000 कोटी पर्यंत बाजार भांडवल असलेल्या कंपन्या अशी सेबीने परिभाषित केली आहे. या व्याख्येनुसार सरासरी ६९ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक असलेला हा फंड नव्याने स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करू इच्छीणारे गुंतवणूकदार या फंडात मर्यादित एकरकमी (पोर्टफोलीओ गुंतवणुकीच्या ५ टक्के) गुंतवणुकीचा विचार करू शकतात. वर्ष भरापूर्वी या फंडांच्या यादीतील आणखी एक फंड ज्याने जुलै २०२२ पासून (समावेश झाल्यानंतर तीन महिन्यांनी) घसरण पाहिली तो म्हणजे महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप. हा फंड अजूनही रोलिंग वन यिअर रोलिंग रिटर्न परताव्याच्या आधारावर मानदंडापेक्षा कराब कामगिरी असून देखील मागील ३ महिन्यांतील परतावा लक्षणीयरीत्या सुधारला असल्याने या फंडाला वगळण्यात आलेले नसले तरी या फंडाची कामगिरी डोळ्यात तेल घालून तपासली जाईल. सरलेल्या त्रैमासिक आढाव्या नंतर ३२ फंडांच्या यातीतील चार फंडांचा पहिल्यांदा समावेश झाला. या आधी यादीत असलेले परंतु वेळोवेळी वगळण्यात आलेले दोन फंडांचे पुरागमन झाले. तर तीन फंडांना वगळ्यात आले. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी शुभेच्छा !
लार्जकॅप
निप्पॉन इंडिया लार्जकॅप
एचडीएफसी टॉप १००
एडेलवाईज लार्जकॅप

मल्टीकॅप
निप्पॉन इंडिया मल्टीकॅप
एचडीएफसी मल्टीकॅप
बरोडा बीएनपी पारीबास मल्टीकॅप

मल्टीकॅप
निप्पॉन इंडिया मल्टीकॅप
एचडीएफसी मल्टीकॅप
बरोडा बीएनपी पारीबास मल्टीकॅप

फ्लेक्झीकॅप
पीजीआयएम फ्लेक्झीकॅप
एचएसबीसी फ्लेक्झीकॅप
निप्पॉन इंडिया फ्लेक्झीकॅप 

ईएलएसएस 
एचएसबीसी ईएलएसएस कंपनीज
एलआयसी एमएफ टॅक्स प्लान
महिंद्रा मॅन्युलाइफ ईएलएसएस

फोकस्ड फंड
बंधन फोकस्ड इक्विटी
एचडीएफसी फोकस्ड ३०
एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंड

लार्ज अॅण्ड मिडकॅप 
एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप
युटीआय कोअर इक्विटी
एसबीआय लार्ज अॅण्ड मिडकॅप

स्मॉलकॅप
फ्रँकलीन इंडिया स्मॉलर
एचएसबीसी स्मॉलकॅप
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top