संजीवन मिळता आशेचे

देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर, मागील तीन वर्षात आपण अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि उलथापालथ अनुभवले. परदेशात विशेषत: विकसित देशांत एकीकडे महागाई शिगेला पोहोचल्याची झळ आपल्या देशात महागाई विकसित देशांच्या तुलनेत नियंत्रणात असून देखील व्याज दरवाढीचे चटके सगळ्यांना जाणवत आहे. महामारीचे अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चटके जाणवले. कोणी घरातील कर्त्या व्यक्ती गमावल्या तर काहींनी रोजगार गमावला. कोणाला वेतन कपातीला सामोरे जावे लागले तर घरातील दोनपैकी एक व्यक्ती कायमची घरी बसली. पुरेशी गुंतवणूकदार जागरूकता आणि सक्षमीकरणाशिवाय अशा जलद बदलाला सामोरे जाणे अशक्य. समाज माध्यमांच्या प्रभावामुळे, एक विश्वासू सल्लागार या भूमिकेतून करोना बाधितांना मार्गदर्शन करणाऱ्या या सदराला नवीन वर्षात सुरवात करीत आहे.
स्वाती जोशी
स्वाती जोशी (६१) या डिसेंबर महिन्यांत राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झाल्या. त्यांना एक विवाहित मुलगी असून ती परदेशात स्थायिक आहे. स्वाती जोशी यांनी कोरोन काळात आपला आयुष्याचा जोडीदार गमावला. श्रीकांत जोशी हे विद्युत कंत्राटदार होते. पुढील दोन वर्षात त्यांचा व्यवसाय बंद करून व्यावसायातून सेवानिवृत्त होण्याचा त्यांचा विचार होता. परंतु कोरोना काळात त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. व्यवसायातील काही येणी होती काही देणी होती. बँकेचे कर्ज देणे तर कार्यालय या व्यवसायातील मालमत्ता होती. सर्व अचानक झाल्याने सर्वच येणे वासूल झाली नाहीत देणे मात्र द्यावेलागले. कार्यालय विकून बँकेचे कर्ज आणि कर्मचाऱ्याचे देणे फेडले. व्यवसाय बंद केल्यावर फारसे काही उरले नाही. सध्या त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.
त्यांनी निवृत्तीलाभा पोटी मिळालेल्या ५५ लाखांच्या नियोजनासाठी संपर्क केला होता. त्यांचा जोखीमांक संतुलित (बॅलंस्ड) असून त्यांच्यासाठी त्यांच्या बचतीची क्रयशक्ती टिकवणे हे जास्त महत्वाचे वाटते. महागाई पेक्षा अधिक परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी, कर पश्चात किमान १० टक्के परतावा मिळायला हवा. स्वाती जोशी यांच्या सध्याच्या मालमत्तेपैकी ३८ टक्के स्थावर मालमत्ता आहे. केवळ १३ टक्के मालमत्ता उच्च परतावा देणाऱ्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात आहे. २१ टक्के मालमत्ता निश्चित उत्पन्न देणारी आहे (बँकेच्या मुदत ठेवी आवर्थ ठेव योजना वरिष्ठ नागरिक योजना (त्यांच्या पतीच्या नांवरील गुंतवणूक)
कृती योजना
  • राहते घर सोडून अतिरिक्त घर विकून टाकावे.
  • १० लाखांच्या बँकेच्या मुदत ठेवी आणीबाणीसाठी तरतूद म्हणून निश्चित करावी. मुदतपूर्ती नंतर एका वर्षासाठी मुदत ठेवीचे वेळोवेळी नुतनीकरण करावे.
  • सुरु असलेली आवर्ती ठेव योजनेची जून २०२४ मध्ये मुदतपूर्ती होईल. उपलब्ध होणारी ९ लाखाची रक्कम रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवावी (अॅक्सीस डायनॅमिक बॉंड फंड एलआयसी बँकिंग अँण्ड पीएसयु डेट फंड, निप्पॉन इंडिया कॉर्पोरेट बॉंड फंड)
  • ५५ लाखांचा सेवा निवृत्ती लाभ आणि अतिरिक्त सदनिका विकून आलेले ८० लाख समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवावे त्या वर वार्षिक ८ लाखांचा भांडवली लाभ मिळेल. हा लाभ आयुष्यात राहून गेलेल्या गोष्ठी गरजवंतांना करायची मदत आणि ज्यामुळे जीवनाचा आनंद घेता येईल अशा गोष्ठीसाठी खर्च करावा

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top