लागली अनाम ओढ

बाजार निर्देशांक योज नवीन उच्चांकाला स्पर्श करीत असल्याचे लक्षात घेता, पोर्टफोलिओमूल्यात भविष्यात होणारी संभाव्य घसरण टाळण्यासाठी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड एक चांगला पर्याय असू शकतो. दीर्घ कालीन एसआयपीच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाचा नक्कीच विचार करावा. हा फंड लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड गटातील सर्वोत्कृष्ट फंडांपैकी एक नसला तरी अलीकडील काळात (निधी व्यवस्थापक बदला नंतर) फंडाच्या मानदंडसापेक्ष (बेंचमार्क – बीएसइ लार्ज मिडकॅप टीआरआय) कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसते. चिनू गुप्ता या कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडातून एल अॅण्ड टी म्युच्युअल फंडात जून २०२१ मध्ये दाखल झाल्या. त्या नंतर त्यांची या फंडाच्या निधी व्यवस्थापक नेमणूक झाली. त्या नंतर सहा महिन्यांत या फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. एल अॅण्ड टी म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण एचएसबीसी म्युच्युअल फंडाने केले असल्याने एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड आता एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप म्हणून ओळखला जातो. एल अॅण्ड टी फंडाचा मानदंड सापेक्ष कामागीरीचा ठिकठाक इतिहास लक्षात घेता एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड हा दीर्घकालीन गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा राखण्याची शिफारस आहे.
सेबीने फंड गटाच्या प्रमाणिकरणानुसार लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ३५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप आणि ३५ टक्के गुंतवणूक मिडकॅप मध्ये गुंतविणे अनिवार्य असते. उर्वरित ३० टक्के गुंतवणूक निधी व्यवस्थापकाच्या इच्छेने करण्याची मुभा सेबीने निधी व्यवस्थापकांना दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या गुंतवणुकीत ६०.५ टक्के लार्जकॅप ३६.५५ टक्के मिडकॅप आणि १.६९ टक्के स्मॉलकॅप गुंतवणुका असून उर्वरित १.२७ टक्के हिस्सा रोकड सुलभ गुंतवणुकीत आहे. (ही आकडेवारी एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅपची असून २८ नोव्हेंबरपासून दोन्ही फंडांचे विलीनीकरण झाले असले तरी या आकडेवारीत एक दोन टक्यांचा फरक संभवतो) फंड विलीनीकरणा नंतर फडाच्या निधी व्यवस्थापिका म्हणून चिनू गुप्ता यांची नेमणूक झाली असून निलोत्पल सहानी हे सह निधी व्यवस्थापक आहेत. चिनू गुप्त यांनी बाजाराच्या परिस्थितीनुसार, मिडकॅपची मात्रा कायम ३५ ते ४० टक्क्यांनदरम्यान राखल्याने लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड गटाच्या तुलनेत एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅप कमी अस्थिर राहिला आहे. एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅपची जून २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या काळातील कामगिरी मानदंडापेक्षा सरस राहिली असून या कालावधीत फंडाचा मासिक परतावा मानदंड सापेक्ष किमान अडीच ते साडेतीन टक्यांनी अधिक आहे. मागील दोन वर्षे सुरु असलेल्या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना करून देण्यात हा फंड यशस्वी झाल्याचे दिसते. एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाची कामगिरी सर्वच कालखंडात फंड गटाच्या सरासरी कामगिरी पेक्षा सरस झ्ल्याचे दिसत आहे. एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅपफंडाने (कंसात गंड गटाची सरासरी) एका महिन्यांत (४.०१(३.३५) सहा महिन्यांत ८.०३(७.७७) एका वर्षात (२०.२२ (१९.१७) पाच वर्षात १५.३२ (१२.१९) परतावा दिला आहे. जरी२०२० च्या पहिल्या तिमाहीत या फंडाने ३५ टक्के घसरण अनुभवली असली तरी हा फंड बाजाराच्या जोरदार कामगिरी मुळे तो झपाट्याने वर आला आणि त्यानंतरच्या दीड वर्षांहून अधिक काळ चाललेल्या तेजीचे प्रतिबिंब फंडाच्या कामगिरीत उमटले आहे. लार्ग कॅप केंद्रित हा फंड सक्रीय व्यवस्थापित होणारा फंड असून फंड विलीनीकरणाची प्रक्रिया सेबीच्या मान्यतेनंतर सुरु झाल्याचे दिसून येते. मागील दोन महिन्यांत एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅपची आणि एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडांचे मंथन वाढलेले दिसते. पोर्टफ़ोलिओची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने मागील महिन्या भरात एल अॅण्ड टी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाच्या गुंतवणुकीतून चोलामंडलम इंवेस्टमेंट, हिंदुस्थान युनीलिव्हर, युनो मिंडा ,बजाज फायनांस, पेज इंडस्ट्रीज, सफायर इंडिया, एबीबी इंडिया, कंसाइ नेरोलॅक, मारुती सुझुकी, पृडंट कॉर्पोरेट यांचे प्रमाण कमी केले तर आयसीआयसीआय बँक, इंडियन हॉटेल्स, स्टेट बँक, एसआरएफ, इंफोसीस, लार्सन अॅण्ड टुब्रो, शॉपर्स स्टॉप, एचडीएफसी बँक यांचे प्रमाण वाढविले. एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक इंफोसीस, एक्सीस बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, स्टेट बँक, आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, दालमिया भारत यांचे प्रमाण वाढविले. एसबीआय कार्ड्स बजाज फायनांस महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टीव्हीएस मोटर्स पेज इंडस्ट्रीज चोलामंडलम इंवेस्टमेंट डिक्सन टेक्नोलॉजीज टाटा मोटर्स यांची प्रमाण कमी केले. दोन्ही फंडांनी कोणत्याही नवीन कंपनीत गुंतवणूक केलेली नाही. फंडाच्या पोर्टफोलिओमधील काही शीर्ष समभाग वगळता कंपन्यांची विस्तृत विभागणी असून पोर्टफोलिओमध्ये समभागांचा वाटा सरसरी ५ टक्क्यांदरम्यान राखलेला आहे. फंडालास्थैर्य देण्याचे काम निफ्टी फिफ्टी मधील कंपन्यांनी केलेअसून वृद्धी बीएसइ टॉप हंड्रेड बाहेरील कंपन्यांनी देलेली दिसते. फंडाच्या पोर्टफोलिओत रोख रक्कम आणि रोखे ३ ते ५ टक्क्यांपेक्षा वाढलेली नाही. एकूणच, गुंतवणूकदार दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त परतावामिळविण्याच्या उद्देशाने या फंडाचा नक्कीच विचार करू शकतात. बाजार नवीन उच्चांकावर आहेत हे लक्षात घेता बाजार अस्थिरतेमुळे दरम्यानच्या काळात तोटा झाला तरी चिकाटीने दीर्घकाळ एसआयपीची वाट चोखळल्यास १० ते १२ टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top