प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ

एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांनी राजीनामा द्यायचा विचार करत असल्याच्या घोषणेचे पडसाद नव्या आणि पारंपारिक माध्यमात उमटले. एखाद्या वलयांकित निधी अलविदा करणेही भारतात  एक सामान्य घटना बनली आहे.  अलीकडच्या काळात आयडीएफसीच्या केनेथ अँड्रेडपासून ते निप्पॉनच्या सुनील सिंघानियापर्यंत अनेक वलयांकित फंड व्यवस्थापकांनी स्वता:ची पीएमएस किंवा एआयएफ व्यवस्थापित करण्यासाठी मालमत्ता  व्यवस्थापन कंपन्यांतून बाहेर पडले. परंतु प्रशांत जैन हे प्रदीर्घकाळ मोठी मालमत्ता असलेले फंड व्यवस्थापित करीत असल्याने त्याची दाखल घेणे भाग आहे.

जर तुम्ही अभ्यासू म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, तर तुमची ज्या फंडात गुंतवणूक आहे त्या फंडाच्या निधी व्यवस्थापकाची मागील दहा वर्षातील कामगिरी तुम्ही तपासू शकता. परंतु असे दिसते कि गेल्या पाच वर्षांमध्ये बहुसंख्य फंडांच्या निधी व्यवस्थापकांत बदल झाले, यामुळे फंडाचा वर्तमान व्यवस्थापकाच्या किंवा त्याच्या पूर्वसुरींच्या कारकिर्दीतील कामगिरी तपासणे कठीण होते. एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज (आधीचा एचडीएफसी प्रुडन्स, जो नंतर एचडीएफसी ग्रोथमध्ये विलीन झाला), एचडीएफसी फ्लेक्सिकॅप (एचडीएफसी इक्विटी) आणि एचडीएफसी टॉप १०० (एचडीएफसी टॉप २००) सारखे फंड प्रशांत जैन व्यवस्थापित करीत असत. प्रशांत जैन हे भारतीय मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील असे दुर्मिळ निधी व्यवस्थापक होते, ज्यांचा प्रायोजकांपेक्षा आपल्या गुंतवणूकदारांवर अधिक प्रभाव होता. २००४ ते २०२२ या १८ वर्षांच्या कालावधीत १३ वर्षे त्यांचे फंड अप्पर लोअर किंवा लोअर क्वारटाइल मध्ये होते. तरीही भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचा चेहरा ( ‘पोस्टर बॉय’) होते.एचडीएफसी इक्विटी आणि एचडीएफसी प्रुडन्स यांची सुरुवात मागील शतकातील नव्वदच्या दशकात झाली. एचडीएफसी एएमसीने झुरिचवर २००३ मध्ये ताबा घेतला तेव्हापासून प्रशांत जैन हे एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणुकीचे प्रमुख झाले. जागतिक स्तरावर, वॉरेन बफेट, पीटर लिंच किंवा स्टॅनले ड्रकनमिलर यांसारखे फंड व्यवस्थापक केवळ ५ किंवा १० वर्षे नव्हे तर अनेक बाजार आवर्तनांचा अनुभव होता. डॉटकॉम तेजीत चमकणारे अनेक भारतीय स्टार व्यवस्थापकांचे पोर्टफोलिओचा लयाला जातांना पहिले. हे निधी व्यवस्थापक २००३ ते २००७ या कालावधीत तेजीत पुनरागमन शकले नाहीत. त्यांच्या गुंतवणुक शैली साधी, सरळ आणि अंदाज लावता येणारी होती, ते कधीही ‘ग्रोथ फंड मॅनेजर’ नव्हते. वाजवी मुल्यांकन असलेल्या आणि वाजवी वृद्धीदर असलेल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर होता. ते मुख्यत्वे दीर्घकालासाठी खरेदी आणि ती गुंतवणुक राखून ठेवणारे ते निधी व्यवस्थापक होते. त्यांच्या रणनितीवर त्यांच्या दांडगा विश्वास होता. कामगिरी खराब असताच्या काळात त्यांच्या गुंतवणुका बाबत ते ठाम असत. रणनीती अनुकूल नसताना आणि फंडाची कामगिरी खराब होत असतांना असतानाही, ते गुंतवणुकीच्या दृष्टिकोबाबत ते विचलित होत नसत. त्यांच्या फंड घराण्याचा ते चेहरा असल्याने त्याच्या २०१३ ,२०१५, २०२० मधील चुकलेल्या खेळींच्या वेळी फंड घराण्याचे व्यवस्थापन त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्याने ते एचडीएफसी फंड घराण्यात प्रदीर्घ कारकीर्द व्यतीत करू शकले. कामगिरी खराब होत असतांना प्रशांत जैन त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने या कठीण काळानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही मोठे मंथन दिसून आले नाही. परिणामी कठीण काळ सरल्यावर २०१४, २०१६ २०२१ मध्ये त्यांच्या फंडांनी यशस्वी पुनरागमन केले. त्याच्या फंडातील गुंतवणूकदारांसाठी, संयम हा परतावा मिळविण्यात महत्त्वाचा घटक ठरला. प्रशांत जैन यांच्या फंडात बराच काळ गुंतवणूक केल्याने त्यांच्या गुंतवणुकीच्या शैलीशी परिचय असलेल्या गुंतवणूकदारांसाठी फंडाच्या परताव्याची ही अस्थिरता आश्चर्यकारक नव्हती. परंतु नवख्या गुंतवणूकदारांसाठी, ही संयमाची परीक्षा होती.

Prashant Jain HDFC Mutual fund Large Cap Review

२०१७ आणि २०२० दरम्यान विरोधाभास दिसला. या कालावधीत प्रशांत जैन यांनी किरकोळ बँका आणि एनबीएफसी ग्राहक आणि आयटी सारख्या क्षेत्रातील ‘गुणवत्तेचे’ मुल्यांकन असलेल्या कंपन्या बाजारात कॉर्पोरेट बँका, आर्थिक आवर्तानाशी निगडीत उद्योग सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि इतर कंपन्यांत गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला. या कालावाधित प्रशांत जैन हे गुणवत्तेच्या (मूल्यांकनाच्या) वेडापासून हटले नाहीत. गेल्या एका वर्षात, जागतिक बाजारपेठेत रोकड सुलभता कमी झाल्याने संस्थात्मकगुंतवणूकदार मूल्यमापनाच्या बाबतीत अधिक जागरूक झाले. या काळात एचडीएफसी फ्केझीकॅप, एचडीएफसी टॉप १०० आणि एचडीएफसी बॅलंस अॅडव्हांटेज मानदंड सापेक्ष अव्वल कामगिरी करीत पुनरागमन केले. परंतु दीर्घकालीन कामगिरीचा विचार केल्यास प्रशांत जैन यांच्या फंडांनी मानदंड सापेक्ष अव्वल कामगिरी केल्याचे दिसत नाही.

प्रशांत जैन यांना त्यांची ही कमतरता चांगलीच ठाऊक होती. प्रस्तुत लेखकाला लोकसत्ता साठी २०१३ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे: “लवकर असणं आणि चुकीचं असणं यात खूप अंधुक रेषा आहे. आणि मी या अंधुक रेषेचा अनेकदा अनुभव घेतला आहे. मी] खूप वेळा कठोर पद्धतीने शिकलो आहे”.भारतीय गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा सरासरी कालावधी ४ ते ५ वर्षांपेक्षा जास्त नसतो हे लक्षात घेता, अलिकडच्या वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी मागील परतावा पाहून फंडांमध्ये गुंतवणूक केली त्यांच्या वाटेल निराशाच आली. एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि कार्यकारी संचालक म्हणून तयंचे स्थान निश्चितपणे आढळ होते. एचडीएफसीच्या सर्वच इक्विटी फंडांच्या मालमत्तेत वाढ झाली विशेषत: २०१७ ते २०२१ पर्यंत खराब कामगिरी असतांना सुद्धा मालमत्तेत सातत्याने वाढ होत गेली याचे श्रेय प्रशांत जैन यांना जाते.

फंड घराण्याला प्रशांत जैन यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या नियोजनाची माहिती एक वर्षांहून अधिक काळापासून होती आणि त्यांनी अन्य फंड घराण्यातील अनुभवी निधी व्यवस्थापकांना एचडीएफसीत आणले. चिराग सेटलवाड ज्यांनी २० वर्षांहून अधिक काळ एचडीएफसी मिडकॅप एचडीएफसी स्मॉलकॅपचे चे निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना प्रशांत जैन यांच्या जागी मुख्य गुंतवणूक अधिकारी समभाग म्हणून नेमणूक केली रोशी जैन, यांना फ्रँकलिन टेम्पलटनमधून एचडीएफसीत आणून त्यांना प्रशांत जैन निधी व्यवस्थापक असलेल्या एचडीएफसी फ्लेक्सिकॅपच्या निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. या फंडाची मालमत्ता २६ हजार कोटी असून त्यांची गुंतवणूक शैली लार्ज-कॅपला अनुकूल असेल (त्या फ्रँकलिन टेम्पलटन ब्लू चीप या लार्जकॅप फंडाच्या निधी व्यवस्थापक होत्या) त्यामुळे पोर्टफ़ोलिओ मंथन वाढणार नाही परंतु प्रशान जैन यांच्या पीएफसी आरएफसी आणि बीपीसीएल सारख्या खराब कामगिरी करणाऱ्या समभागांना वगळता की राखून ठेवतात यावर या फंडाची भविष्यातील कामगिरी असेल. गोपाल अग्रवाल, यांची एचडीएफसी म्युच्युअल फंडाने डीएसपी मधून भारती केले. भारतीयभांडवली बाजारांचा त्यांना २० वर्षाचा अनुभव असून ते प्रशांत जैन व्यवस्थापित करी असलेल्या एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाच्या समभाग गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतील. त्यांचे गुंतवणूक कौशल्य पाहता हा ४३००० कोटी मालमत्ता असलेला फंडाचे मालमत्ता व्यवस्थापन अधिक गतिमान होण्याची आशा आहे. राहुल बैजल, जे पूर्वी सुंदरम म्युच्युअल फंडात कार्यरत होते त्यांना एचडीएफसी टॉप १०० या प्रशांत जैन व्यवस्थापित जार्जकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना समभाग व्यवस्थापनाचा १७ वर्षांचा अनुभव आहे. प्रशांत जैन यांच्या फंडाची सूत्रे ज्या व्यवस्थापकांकडे सोपवली आहेत ते सक्षम आणि अनुभवी असले तरी, त्यांची शैली प्रशांत जैन यांच्या शैली पेक्षा भिन्न शैली आहे. या संक्रमण कालात परतावा नक्कीच बाधित होईल. नवीन व्यवस्थापक त्यांची गुंतवणुकीची शैली भविष्यातील संभाव्यतेशी तडजोड न करता फंडामध्ये कोणते बदल घडवून आणतात यावर फंडांचा परतावा ठरेल. ज्या व्यवस्थापकांकडे प्रशांत जैन यांचा फंडांची जबाबदारी दिली आहे त्यांची भूतकाळातील कामगिरी प्रशांत जैन यांच्या कामगिरीशी तुलना करता अधिक आशादायक आहे. प्रशांत जैन हे मुल्यांकनाबाबत आग्रही होते. त्यांच्या या टोकाच्या दुराग्रहामुळे प्रसंगी फंडांची कामगिरी घसरलेली दिसली. भविष्यात मूल्यांकनाचा आग्रह कमी झाल्याने गुंतवणूकदारांना पराताव्यातील सातत्य अनुभवता येईल. गुंतवणूकदारांनी नवीन व्यवस्थापक स्थिर होण्याची वाट पाहायला हवी. त्यांचे व्यवस्थापकिय कौशल्य दाखवण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्यामुळे, व्यवस्थापक बदलल्यामुळे फंडतून बाहेर पडण्याचा निर्णय आततायी ठरेल. एक म्युच्युअल फंड विश्लेषक म्हणून मी स्वत: या नवीन निधी व्यवस्थापकांच्या भविष्यातील कामगिरीबाबत अधिक आशावादी आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top