आयडीएफसी मिडकॅप 'एनएफओ'मध्ये गुंतवणूक का करावी? Why Should we invest in IDFC Midcap NFO?

IDFC Mutual Fund Sachin Relekar
आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सर्वात मोठी मालमत्ता असलेल्या आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे भूतपूर्व मुख्य गुंतवणूक अधिकारी अशी सचिन रेळेकर त्यांची ओळख आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाने त्यांची २०१४ मध्ये चार फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. सचिन रेळेकर यांची ओळख म्युच्युअल फंड विश्लेषकांना उत्तम जोखीम परतावा समतोल राखणारे निधी व्यवस्थापक अशी आहे. जे निधी व्यवस्थापक फंड गटाच्या दीर्घकालीन परताव्याच्या सरासरीपेक्षा सरस कामगिरी सातत्याने करतात असे निधी व्यवस्थापक नेहमीच क्रिसिलच्या पत मानांकन यादीवर वर्चस्व राखून असतात. एखादी तिमाही वगळता त्यांचे फंड सातत्याने क्रिसिलचे ‘सीपीआर वन’ किंवा ‘सीपीआर टू’ पत मिळवीत आलेले आहेत.

एकदा निधी व्यवस्थापक जेव्हा फंड गटातील सरासरी जोखमीपेक्षा कमी जोखीम घेऊन  फंड गटाच्या परताव्याच्या सरासारी परताव्यापेक्षा अधिक परतावा सातत्त्याने मिळवितो तेव्हा त्यची गणना गुंतवणूक परिभाषेत सर्वात वरील चतुर्थांश (टॉप क्वारटाईल आणि अपर मिडल क्वारटाईल) मधील निधी व्यवस्थापकांमध्ये होते. सचिन रेळेकर हे ३० जून २०२२ रोजी ९६९२ कोटींचे निधी व्यवस्थापन करीत होते. ते निधी व्यवस्थापक असलेल्या आयडीएफसी मिडकॅप फंडाचा ‘एनएफओ’ला २८ जुलै पासून सुरवात झाली असून ‘एनएफओ’ ११ ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ते व्यवस्थापित करीत असलेल्या असलेल्या चार पैकी तीन फंड (इन्फ्रास्ट्रक्चर फंड वगळून) क्रिसिल मानांकनात टॉप क्वारटाईल आणि अपर मिडल क्वारटाईल मध्ये आहेत. एखाद्या एनएफओ मध्ये गुंतवणुकीची शिफारस करण्यापूर्वी निधी व्यवस्थापकांचे प्रगती पुस्तक तपासून घ्यावे लागते. सचिन रेळेकर यांचे प्रगतीपुस्तक तपासले असता, २०१४ ते २०२२ या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांनी मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळवून दिला आहे. त्यांच्या आठ वर्षाच्या  कामगिरीचा आढावा  सोबतच्या आलेखात दिला आहे. फंड गटातील सरासरी जोखीमीपेक्षा कानी जोखीम स्वीकारून फंड गटाच्या सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळविला आहे.

Sachin Relekar Performance

जेव्हा तुम्ही दोनफंडापैकी एका फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करता तेव्हा केवळ परतावा नव्हे तर हा परतावा मिळवण्यासाठी घेतलेल्या जोखमीचाही विचार केला पाहिजे. जोखीम-समायोजित परतावा दोन्ही पोर्टफ़ोलिओंची एका समान पातळीवर तुलना करतो. ही एक संकल्पना आहे जी परतावा मिळविण्यासाठी किती जोखीम घेतली जाते हे तपासून गुंतवणुकीचा परतावा मोजण्यासाठी वापरली जाते. जोखममुक्त (रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न) परताव्याहून अधिक परतावा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापक समभागांची निवड आणि त्यांचे गुंतवणुकीचे प्रमाण निश्चित करीत असतात. गुंतवणुकीसाठी शिफारस करतांना मोठी मालमत्ता असलेले परंतु संपत्तीचा विध्वंस करणाऱ्या वलयांकित निधी व्यवस्थापकांना स्थान देऊ नये. मागील आठ सहा वर्षांतील सचिन रेळेकर यांची कामगिरी सांख्यिकीय निकषांवर अव्वल ठरते. गुंतवणूक हे उपयोजित संख्याशास्त्र आहे (अप्लाइड स्टॅटीसस्टिकस) आहे. एक पोर्टफ़ोलिओची कार्यक्षमता मोजतांना संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्या दृष्टीने गुंतवणूक एक शास्त्र आहे आणि कला सुद्धा आहे कारण संख्याशास्त्राप्रमाणेच पोर्टफोलिओ बांधणी ही प्रक्रिया रचनात्मक आहे.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप यांच्या परताव्यात फार फरक नसला तरी स्मॉलकॅप हे टोकाचे अस्थिर असतात. मिडकॅपची पाच वर्षांची कामगिरी तपासाली असता, किमान ५० कंपन्यांनी ४० टक्के किंवा अधिक परतावा दिला आहे हीच संख्या लार्जकॅप मध्ये केवळ ५ आहे. तुम्ही लार्जकॅप गुंतवणूकदार असाल आणि या ५ कंपन्या तुमच्या गुंतवणुकीत नसतील तर मानदंडसापेक्ष परतावा कमी असेल. परंतु मिडकॅपमध्ये ही संख्या अधिक असल्याने निधी व्यवस्थापकाकडून अशी चूक होण्याची शक्यात कमी असते. ज्यावेळेला कंपन्यांचे प्रमाणिकारण झाले तेव्हा ८००० कोटी ते २८००० कोटी दरम्यान बाजार भांडवलअसलेल्या कंपन्या मिडकॅपमध्ये होत्या. मिडकॅप मधील सर्वात जास्त भांडवली मूल्य ५२००० कोटी टाटा एलॅक्सीचे आहे. निधी व्यवस्थापकाला गुंतवणूक करण्याला लार्जकॅप पेक्षा मिडकॅपमध्ये अधिक विकल्प आहेत. व्यवस्थापनाचा दर्जा, व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध संधी, वाजवी आणि अनुपालन हे कंपनी निवडीचे निकष असतील. या आधी२०१४ मध्ये सचिन रेळेकर हे निधी व्यवस्थापक असलेल्या एलआयसी मिडकॅप फंडाची (सध्याचा एलआयसी एमएफ लार्ज अॅण्ड मिडकॅप) ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली होती. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर २०१७ मध्ये या फंडाला ‘मॉर्निंगस्टार’ने ‘फोर स्टार’ तर क्रिसिलने ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये स्थान दिले होते. अशा निधी व्यवस्थापकाच्या ‘एनएफओ’मध्ये गुंतवणुकीची ही शिफारस.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top