निरंतर तेजी नंतर स्थिरावणारे वर्ष

Interview with Shridatta Bhandwaldar (Canara Robeco Mutual Fund)
म्युच्युअल फंड रेटिंग हे सामान्यतः एकाच फंड गटातील फंडांच्या तुलनेत विशिष्ट फंडांच्या कामगिरीचे मोजमाप असते. परतावा आणि जोखीम या दोन्हींचा समतोल साधणाऱ्या फंडांना फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार रेटिंग मिळते. कॅनरा रोबेको फंड घराण्यांचे निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार हे सर्वाधिक फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार फंड रेटिंग असलेले निधी व्यवस्थापक आहेत. कॅनरा रोबेको ब्लूचीप (फाईव्ह स्टार) आणि कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्वीटीज (फोर स्टार) कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅप (फोर स्टार) हे फंड सुरवातीपासून (२०१३ पासून) लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीचा भाग आहेत. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीचे भाग अससेल्या फंडांच्या निधी व्यवस्थापकांना भेटून या फंडाबद्दल अधिक जाणून घेणे हा नित्यनेमात कोरोन अडथळ्यामुळे खंड पडलेला नाही. प्रत्यक्ष भेटी ऐवजी संभाषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असते. परताव्यात सातत्य राखलेल्या या फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख असलेल्या श्रीदत्त भांडवलदार यांच्याशी झालेल्या संभाषणाचा हा गोषवारा

नव्या आर्थिक वर्षाबाबत दृष्टीकोन

बाजाराची वाटचाल मुख्यत्वे दोन किंवा तीन बाबींवर ठरेल. पहिली गोष्ट येत्या वर्षात जगभरात रोकड सुलभता कमी होईल. दुसरी गोष्ट इंधनाच्या किंमती मागील दशकातील किंमतींच्या तुलनेत वरच्या पातळीवर असल्याची धग सगळ्यांना जाणवेल भारत हा जिन्नसांचा वापरकर्ता असल्याने आणि जिन्नसांच्या किमतीत वाढ झाली असल्याने कंपन्यांची नफा क्षमता कमी होईल. मला उत्सार्जनातील वृद्धीदर कमी होईल किंवा अपेक्षित वृद्धीदर राखण्यास विलंब होईल. कंपन्यांच्या उत्सर्जनात अपेक्षित असलेली वाढ होण्यास एखाद दुसऱ्या तिमाहीचा विलंब लागू शकेल. पहिल्या तिमाहीच्या उत्सर्जनात वाढ किंवा घट अपेक्षित नाही. या तिमाहीचे निकाल समान्य असतील पुढील दोन तिमाहीत दोन तिमाहीत कंपन्यांच्या उत्सार्जंत फारशी वाढ अपेक्षित नसून काही उद्योग क्षेत्रांच्या उत्सर्जनात प्रसंगी घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. इंधनांच्या किंमती कशा स्थिरावतात त्यावर या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्सर्जनात वाढ दिसू शकेल. समष्टी अर्थशास्त्राच्यादृष्टीने विचार केल्यास, वाढलेल्या इंधनाच्या आणि अन्य जिन्नसांच्या किंमतींमुळे वित्तीय तुट वाढण्यासोबर आयात निर्यातीतील तफावत (बॅलंस ऑफ पेमेंट) रूंदावण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कंपन्यांची पत सुधारण्यात किंवा खालवण्यात होईल. पत सुधारलेल्या कंपन्यांची संख्या पत खालावलेल्या कंपन्यापेक्षा अधिक असेल. दोन वर्षांच्या निरंतर तेजीनंतर सुरु झालेले नवीन आर्थिक वर्ष हे म्हणूनच स्थिरावण्याचे वर्ष असेल. त्यामुळे भांडवली खर्च करून उद्योगांच्या क्षमता वाढीवर मर्यादा येण्याची मोठी शक्यता वाटते. जगभरात ‘चायना प्लस वन’ ही संकल्पना रुजत आहे. या संकल्पनेत भारताला नक्कीच स्थान असून मोठी परकीय गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता वाटते.

फंडांच्या गुंतवणुकीतील कंपन्यांची निवड

मागील दिड दोन वर्षे निर्यात प्रधान उद्योगांच्या उत्सर्जनात वाढ होत होती. देशांतर्गत व्यवसाय करणाऱ्या उद्योगांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आम्हाला असे वाटते की इथून पुढे स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या उत्सर्जनात वेगाने सुधारणा होईल. कॅनरा रोबेको फंड घराण्याच्या लार्जकॅप, फ्लेक्झीकॅप आणि लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाच्या गुंतवणूकीत निर्यात प्रधान उद्योगांपेक्षा आत्मनिर्भर कंपन्यांना स्थान दिले आहे. साहजिकच आम्ही व्यापार चक्राशी निगडीत कंपन्या, आर्थिक सेवा, गृह बांधणी, वैयक्तिक वापराच्या वस्तू, सिमेंट वाहन उद्योग यांच्यावर भर होता. रशिया उक्रेन युद्धाला तोंड फुटल्या नंतर इंधनाच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता सिमेंट आणि वाहन उद्योगाची मात्र थोडी कमी केली. हा बदल सोडला तर आमची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांत आम्ही फारसा बदल केलेला नाही. फंडांच्या मानदंड सापेक्षाने विचार केल्यास आम्ही निर्यात प्रधान व्यवसायांपैकी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, आर्थिक सेवा यांच्यातील गुंतवणुकीची मात्रा अधिक आहे.

गुंतवणूकदारांना सल्ला

नवीन आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांनी मोठ्या परताव्याची अपेक्षा ठेऊ नये. हे वर्ष स्थिरावणारे वर्ष असल्याने परतावा कमी आहे म्हणून गुंतवणुकीत खंड पडू नये. तीन वर्षे थांबण्याच्या तयारीने गुंतवणूक करावी. तीन वर्षात दोन आकड्यात परतावा पुन्हा मिळेल. समभाग गुंतवणूक हा मालमत्ता वर्ग अन्य मालमत्ता वर्गाच्या तुलनेत सरस परतावा देईल या बद्दल खात्री बाळगा या वर्षात बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचलेली दिसेल. एसआयपी हे या अस्थिरतेशी सामना करण्याचे प्रभावी साधन आहे. म्हणून तुमच्या गुंतवणुकीत समभाग गुंतवणुकीला पुरेसे स्थान द्या.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top