दिव्याखाली अंधार

या सदरातील पहिल्या पोर्टफोलीओ रिव्ह्यूसाठी माझ्या पत्नीचा (ईशा) पोर्टफोलीओ निवडला आहे. या पोर्टफोलिओतील बहुसंख्य फंडाची निवड ईशा यांची असून त्या बँक कर्मचारी आहेत. त्या मागील चार वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत असून एकूण गुंतवणुकीच्या ८८ टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून तर १२ टक्के गुंतवणूक एक रक्कमी केली आहे. त्यांच्याकडे २.८७ लाखांचा दीर्घकालीन भांडवली लाभ उपलब्ध आहे. दर वर्षी एक लाख रुपयांचा दीर्घ कालीन भांडवली लाभ करमुक्त असल्याने त्यांनी या सवलीतीचा लाभ घेणे गरजेचे आहे. सोबतच्या ‘रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉंट नुसार, एबीएसएल फ्रंट लाईन इक्विटी, एचडीएफसी टॉप १००, सुंदरम मिडकॅप आणि एसबीआय मॅग्नम मिडकॅप या फंडाची कामगिरी समाधानकारक नसल्याने रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉटनुसार हे फंड अतिरिक्त जोखीम स्वीकारणारे आणि कमी परतावा देणारे (द्वितीय चतुष्कोनात) फंड आहेत. या फंडातून बाहेर पडून उपलब्ध भांडवली लाभातून करमुक्त १ लाखाचा नफा होण्यासाठी ३.४६ लाखांच्या युनीट्स् विक्री करावी लागेल. उपलब्ध होणारी रोकड तुमची गुंतवणूक असलेल्या कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप आणि निप्पॉन इंडिया फ्लेक्झी कॅप या फंडात सम प्रमाणात गुंतवावी.

फंड निवड करतांना आपल्या वित्तीय ध्येयाशी सुसंगत फंड निवडणे गरजेचे असते. बहुसंख्य फंडांची निवड त्यांची असून, बँकेने एसआयपी विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्याकरिता केलेली आहे. त्यानी लोकसत्ता शिफारस प्राप्त फंडाची निवड केली असती तर सध्याच्या २० टक्के नफ्या वरून २३.४८ टक्के नफा मिळविणे शक्य झाले असते. (संदर्भ: ‘मोर्निंगस्टार हायपोथिसीस’) दुसरी मोठी चूक म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत रोखे फंडांना स्थान न देणे. जी चूक बहुसंख्य बँक कर्मचारी करतात. मुदत ठेव (एडडी) आणि आवर्ती ठेव (आरडी) यांच्यापेक्षा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातील गुंतवणूक कर कार्यक्षम असते. सेवानिवृत्तीस पाच वर्षे शिल्लक असल्याने किमान ५० टक्के गुंतवणूक रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात करावी.

पोर्टफ़ोलिओ गुंतवणूक (लाख): ८.०६
पोर्टफोलिओ बाजार मूल्य (लाख): ११.२५
गुंतवणूक असलेल्या फंडांची संख्या: १५
पोर्टफ़ोलिओ वरील वार्षिक परतावा (%): २०.२२
जोखीमांक: समतोल

गुंतवणूक असलेले फंड

  1. एबीएसएल फ्रंट लाईन इक्विटी
  2. कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप
  3. कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी
  4. एचडीएफसी टॉप १००
  5. आयडीएफसी मल्टीकॅप
  6. आयडीएफसी युएस इक्विटी
  7. एल अँड टी फोकस्ड इक्विटी
  8. निप्पॉन इंडिया मल्टीकॅप
  9. एसबीआय मॅग्नम मिडकॅप
  10. सुंदरम मिडकॅप
  11. टाटा रिटायरमेंट सेविंग्ज
  12. युटीआय फ्लेक्झीकॅप

एसआयपीचा तपशील

  1. कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप -२०००
  2. कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी १००००
  3. युटीआय फ्लेक्सीकॅप २०००
  4. टाटा रिटायरमेंट प्रोग्रेसिव्ह प्लान २५०००
  5. एचडीएफसी एचडीएफसी टॉप १०० २०००

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top