Loksatta Article

सिद्ध निकष की आतला आवाज

बेंजामिन ग्रॅहम लखित ‘सम इंवेस्टमेंट आस्पेक्टस ऑफ एक्यूम्यूलेशन थ्रू इक्विटीज’ हा लेख गुंतवणूकशास्त्रात एक मानदंड समाजाला जातो हा लेख ‘अमेरिकन फायनांस असोसीएशन’च्या ‘द जर्नल ऑफ अप्लाइड फायनांस’ फेब्रुवारी १९२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला. गुंतवणुकीची कार्यक्षमता (एफीशीअंसी ऑफ पोर्टफ़ोलिओ) कशी निश्चित करावी हे पहिल्यांदा या लेखातून हे विषद केले गेले. या लेखाला १०० वर्षे झाली असून आजही हा लेख तितकाच ताजा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा गुंतवणूकदार पोर्टफोलिओचा आढावा घेतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. जसे की ..

माझी गुंतवणूक असलेला फंड अपेक्षेनुसार कामगिरी करीत नाही. मी त्या फंडाच्या गुंतवणुकीतून बाहेर पडावे की आणखी काही काळ वाट पहावी? एखादा समाधान कारक कामगिरी नसलेल्या फंडाला सुधारणेसाठी आणखी किती वाट पहावी?

फंडाच्या कामगिरीत घसरण होत असल्याचे कसे ओळखावे?

प्रथम, तुमचा फंड जर ३ ते ५ वर्षात ७ टक्के किंवा त्यापेक्षा कमी भांडवली वृद्धी देत असेल, किंवा फंड सातत्याने ३ किंवा अधिक तिमाहींपासून त्या फंडाच्या मानदंडापेक्षा कमी नफा देत असेल तर किंवा सातत्याने ३ तिमाहीत ५ टक्के किंवा त्या त्यापेक्षा कमी नफा देत असेल तर फंडाची कामगिरी खराब होत असल्याचे मानावे. सुधारणेची पहिली पायरी एसआयपी बंद करून एक चांगला निवडावा किंवा बंद केलेल्या रक्कमेइतक्या रक्कमेची एसआयपी विद्यमान गुंतवणूक असलेल्या फंडात सुरु करणे.

“एक्झिट लोड” आणि कर विषयक तरतुदी

एखाद्या फंडातून बाहेर पडायचे ठरवितांना तुमची गुंतवणूक केल्याला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल किंवा तुम्ही गेल्या १२ महिन्यांपेक्षा कानी कालावधीतील गुंतवणुकीवर ‘एक्झिट लोड’ आणि अल्प मुदतीचा भांडवली लाभावार (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन) कर द्यावा लागण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये, तुम्ही एक वर्षापर्यंत सर्व युनिट्स एक वर्षपूर्ण होण्याची वाट पहाणे किंवा एक वर्ष ओलांडलेल्या युनिट्सची विक्री करून लोड आणि कर देणे असे दोन पर्याय असतात. तुमचे रोखे गुंतवणूककेलेले फंड ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असतील तर तुम्ही इंडेक्सेशन लाभाला मुकाल. परंतु तुम्ही उच्च-गुणवत्तेचा कर्जरोखे फंड (कोणतीही पत विषयक जोखीम नसलेल्या) फंडातून केवळ कमी परतावा असल्याने बाहेर पडण्याचा विचार करणार असाल तर तसे करणे कर विषयक तरतुदीनुसार हिताचे ठरणार नाही. वाचकांनी लक्षात घायला हवे की कमी परतावा देणारा फंडात गुंतवणूक तशीच ठेवणे म्हणजे अनावश्यक खर्च करण्यासारखे आहे.

भौगोलिक वैविध्य

म्युच्युअल फंडडाद्वारे, तुम्ही भारतीय बाजारात रुपयांमध्ये गुंतवणूक करत असताना, परदेशातील बाजारपेठांमध्ये जेव्हा तुमच्या पैशाची गुंतवणूक होते तेव्हा तुमची गुंतवणूक अमेरिकी डॉलरमध्ये होते. तुम्ही पैसे काढून घेता तेव्हा, रुपयाचे अवमूल्यन होईल असे गृहीत धरून, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून अधिक मूल्य मिळेल. हे अमेरिकेतील बाजारातील पराताव्यापेक्षा रुपयाच्या अवमुल्यानामुळे तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असेल. जागतिक समभाग भारतीय बाजारांपेक्षा वेगळ्या मापदंडांच्या अधीन आहेत आणि या दोन मानदंडात परस्परसंबंध नकारात्मक असल्याने जोखीम कमी करण्याचा हा एक चागला पर्याय आहे. देशाच्या भांडवली बाजारातून अविश्रांत सुरू असलेल्या परदेशी गुंतवणुकीच्या निर्गमनामुळे रुपयाच्या मूल्यावर प्रचंड ताण आला आहे. परिणामी वर्ष सांगतेला डॉलरच्या तुलनेत आशियातील सर्वात वाईट कामगिरी रुपयाची झाली आहे. सरलेल्या तिमाहीत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २.२ टक्क्यांनी घसरले आहे. चालू खात्यावरील वाढत्या तुटीमुळे नजीकच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, रुपयाच्या अवमुल्यनामुळे महागाईतही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची खनिज तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे नोव्हेंबरमध्ये भारताची व्यापार तूट सुमारे २३ अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने रुपया अधिक कमकुवत झाला आहे. रुपयाच्या संभाव्य घसरणीचा विचार पोर्टफोलिओचा आढावा घेतांना करणे आवश्यक आहे.

गुंतवणूक सल्लागाराचे (एमएफडी / आरआयए) महत्व

अनेक गुंतवणूकदारांचा असा गैर समज आहे की माझ्या पैशांचे व्यवस्थापन समंधीत फंडाचा निधी व्यवस्थापक करीत असतो. मी थेट (डायरेक्ट) किंवा कोणत्याही वितरकाच्या मार्फत पैसे गुंतविले तरी माझ्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होत नाही. सामान्यतः,पूर्व निश्चित मानदंड सापेक्ष अतिरिक्त परताव्याला ‘अल्फा’ असे संबोधले जाते. एखाद्या पोर्त्फोलीओचा मानदंड सापेक्ष अतिरिक्त परताव्याला ‘अॅडव्हायजरज अल्फा’ म्हणतात. एकूण परताव्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्या नुसार गुंतवणूक केल्यामुळे अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठेत वार्षिक दिड ते दोन टक्के अतिरिक्त परतावा परतावा मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. भारतातील गुंतवणूकदरांची आर्थिक साक्षरता लक्षात घेता हे अतिरिक्त परताव्याचा दर चार ते पाच टक्के असतो असे मानण्यात येते. गुंतवणूक सल्लागार हा तुमचा आर्थिक नियोजनात भागीदार असतो. तुम्हाला २० वर्षांत निवृत्त व्हायचे आहे किंवा तुमच्या मुलाला १० वर्षांनी परदेशात शिक्षणासाठी पाठवायचे आहे, तर तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला कुशल व्यावसायिक गुंतवणूक मार्गदर्शकाची (एमएफडी / आरआयए) आवश्कता असते. अमेरिकेतील जवळपास ६० टक्के लोकसंख्येच्या तुलनेत भारतात लोकसंख्येच्या केवळ ४ टक्के हिस्सा भांडवली बाजारात सक्रीय आहे. आधुनिक काळात मुलभूत गुंतवणूक संशोधन (फंड निवड) ही मानवी भावनांपेक्षा तंत्रज्ञानाच्या आधारे सिद्ध निकषांनुसार केल्यास अधिक परतावा (‘अॅडव्हायजरज अल्फा’) मिळविता येतो. जागतिक मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात मान्यता पावलेल्या शिकागोस्थित ‘मोर्निंगस्टार’ या १९८४ पासून कार्यरत असलेल्या आणि फंड निवडीकरिता तंत्रज्ञान विकसित केले आहे. या पाक्षिक सदरातून वाचकांच्या पोर्टफ़ोलिओचे मूल्यमापन याच सिद्ध निकषांनुसार करण्यात येईल. वाचकांनी त्यांच्या पोर्टफोलीओचा एक्स-रे काढूनघेण्यासाठी कॅम्स ऑनलाईनवर उपलब्ध होणारा तपशील इमेल करायचा आहे. या ई कॅस स्टेटमेंटनुसार उपलब्ध होणाऱ्या तपशिलानुसार झालेल्या चुका वाचकांच्या निदर्शनास आणून त्यावर सुधारणा सुचविणार आहे. या सदराला वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभेल अशी आशा बाळगतो.

Scroll to Top