आयटी कंपन्यांचे व्यवस्थापन आणि समभाग विश्लेषक यांचा माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वृद्धीबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालाचे विश्लेषण केले असता मागील तिमाहीत नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्याची संख्या (अॅट्रीशन रेट) ३० टक्क्यांदरम्यान आहे. याचा अर्थ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना नाविक कंत्राटे मिळत असल्याने कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करीत आहेत. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीत एक आयटी उद्योगाशी समंधीत फंड असावा या दृशिकोनातून आम्ही या फंडाची शिफारस करीत आहोत.

योग्य वेळी गुंतवणूक केल्यास सेक्टर फंडांची नफा कमाविण्याची क्षमता उच्च दर्जाची असते. जे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा फंड योग्य फंड आहे.

वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आहेत.  गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी आम्ही आमच्या संशोधनानुसार भविष्यात समाधानकारक परतावा देणाऱ्या फंडांची आम्ही शिफारस करीत आहोत.

हा फंड आपल्या गुंतवणुकीत कितपत योग्य आहे हे आम्हाला जाणून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या

Scroll to Top