काय हरवले सांग शोधिसी

 

अपेक्षेप्रमाणे आगामी लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सत्तारूढ पक्षाने पहिले पाउल उचलले. कृषी उत्पन्नाच्या हमीदरात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी (की आपली पतपेढी भक्कम करण्यासाठी) निवडक कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ केली. महागाई वाढण्यास जी करणे विश्लेषकांना अपेक्षित होती त्यापैकी हे महत्वाचे कारण होते. सरकारच्या या धोरणाची दुसरी बाजू अशी की कृषी उत्पादनाची आधारभूत किंमत वाढविल्यामुळे कृषी उत्पादकांचेच्या उत्पन्न वाढल्याने हे पैसे खर्च होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते. रुपयाचा घटलेला विनिमय दर आणि महागाईच्या दरांत अपेक्षित असलेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेला कमीत कमी हानी पोहोचावी म्हणून रिझर्व्ह बँकेने जूनच्या पतधोरण आढाव्याच्या वेळी व्याज दरांत पाव टक्क्यांची वाढ केली आहे. या पत धोरण आढाव्याच्या वेळी रिझर्व्ह बँकेच्या समष्टी अर्थशास्त्राच्या विश्लेषणानुसार आगामी वर्षभरात किरकोळ किंमतीवरील आधारित महागाईचा दर ५ ते ५.२५ टक्के  रहाणे अपेक्षित आहे. महागाईचा दर या पतळीपर्यंत पोहचला तर अजून प्रत्येकी पाव टक्यांच्या एक किंवा दोन दरवाढीची विश्लेषकांना अपेक्षा आहे. रेपोदर ६.५० ते ६.७५ दरम्यान राहिल्यास ३ ते ५ वर्षे मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड करणे फायद्याचे ठरेल.

अॅक्सीस स्ट्रॅटेजिक बॉंड फंड हा मिडीयम टर्म बॉंड फंड असून गुंतवणुकीचे सक्रीय व्यवस्थापन असलेला हा फंड आहे. देवांग शहा या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड गुंतवणुकीचा मोठा हिस्सा ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’ पत असलेल्या आणि ५ वर्षांपेक्षा कमी मुदत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. सध्या गुंतवणूक केलेल्या रोख्यांची सरसरी मुदत २.४ वर्षे तर मॉडीफाइड ड्युरेशन १.९ वर्षे आहे. पोर्टफ़ोलिओचे ‘यिल्ड टू मॅच्युरीटी’ ९.२६ टक्के आहे. फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांच्या परताव्याचा दर संदर्भ दरा (रेपो दर) पेक्षा २.०० ते २.२५ टक्के अधिक असतो. कमी पत असलेले परंतु किमान रेपो दराहून २ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा असणाऱ्या रोख्यांत गुंतवणूक करतो.

सेबीच्या रिस्क प्रोफाईल नुसार या फंडाची रिस्क प्रोफाईल ‘मोडरेट’ या प्रकारात मोडणारी आहे. जोखीम आणि परतावा यांच्यात नेहमीच सम समंध असतो. गुंतवणुकीतील जितकी जोखीम अधिक तितका परतावा अधिक. हा फंड ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’ पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड असल्याने या फंडातील गुंतवणुकीवर पुढील ३ वर्षात ७.५ ते ८.२५ टक्के अपेक्षा करणे रास्त ठरेल. समष्टी अर्थशास्त्रीय कारणांनी रिझर्व्ह बँकेने रेपो दरांत वाढ केली तरी सुद्धा हा फंड अल्प मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारा असल्याने व्याज दर वाढीमुळे रोख्यांच्या किंमतीत कमी घट होईल. बँक मुदत ठेवींवर व्याज दर वाढत असले तरी ही वाढ कमी मुदतींच्या ठेवीत होत आहे. बँक मुदत ठेवींपेक्षा या फंडातील गुंतवणूक कर कार्यक्षम आहे. सध्या बँकांच्या कमी मुदतीच्या ठेवींचे व्याज दर वाढत असल्याने नव्याने केलेल्या या मुदत ठेवींची पुनर्गुंतवणूक कमी व्याज दरांत होण्याचा धोका अधिक आहे. नव्याने मुदत ठेवे करावी अशा व्याज दाराच्या शोधात निघालेल्या गुंतवणूकदारांना हरवलेल्या व्याज दराची खंत कमी करेल असा हा फंड आहे. बँक ठेवींचे व्याजदर आणि त्यावर भरावा लागणारा आयकर लक्षात घेता करपश्चात परतावा म्युच्युअल फंडातील तीन वर्षे किंवा अधिक मुदतीच्या गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा कमीच असतो. स्थिर उत्पन्न गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांना या ३ वर्षांहून अधिक काळासाठी गुंतवणूक करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. वाचकांनी आपल्या जोखीमांकाचा विचार करून या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top