आज या सदरासाठी स्वप्नील कुळकर्णी  यांचे आर्थिक नियोजनाची निवड केली आहे.  स्वप्नील (२८ ) हे सनदी लेखापाल असून लोकसत्ताचे वाचक आहेत. ते आणि त्यांचे वडील अंबरनाथ येथे राहतात. वडील बँक ऑफ इंडिया मधून सेवा निवृत्त झाले असून त्यांना पेंशन मिळते. स्वप्नील यांच्या आईचे जानेवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्या शिक्षिका होत्या. स्वप्नील यांच्या आईच्या आजारपणात मोठी रक्कम खर्च झाली.  प्रवासाच्या दृष्टीने अंबरनाथ लांब पडत असल्याने पहिल्यांदा कल्याण येथे आणि पाच वर्षांनी ठाणे येथे या घर घ्यायची आणि सेवानिवृत्ती नियोजन अशी तीन आर्थिक उद्दिष्ठे निश्चित करण्यात आली आहेत. येत्या वर्षभरात त्यांचा विवाह करण्याचा विचार आहे. म्हणून त्यांच्या उत्पन्नात वर्षभरा नंतर ५० हजार रुपयांची वाढ होईल असे गृहीत धरून हे नियोजन केले आहे.

आर्थिक नियोजनात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता दिलेली असते. आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटनांचे आर्थीइक परिणाम होत असतात. हे परिणाम टाळायचे तर टर्म इंषुरन्स त्या वर सगळ्यात चांगला उपाय आहे. दुदैवाने टर्म इन्शुरन्स हे ‘पुश प्रोडक्ट’ आहे. आर्थिक अल्प साक्षरतेमुळे कोणी आपणहून टर्म इंषु रन्स खरेदी करीत नाही .अपुऱ्या विमा छत्राची खरेदी हा दोष नेहमीच दिसून येतो. टर्मप्लान खरेदी केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. टर्मप्लानचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक संरक्षण आहे. जर तुम्ही उद्या या जगात नसाल तर टर्मप्लान तुमचे भविष्यातील खर्च आणि दायित्वे तुमच्या बचतीतून पूर्ण कव्हर करते. आज तुम्ही तिशीच्या आत आहात. लहान वयात आणि जास्त कालावधीसाठी टर्मप्लान विकत घेतल्यास ते किफायतशीर आहे. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही खूप निरोगीही असता. सहाजिक तुम्ही अकाली मरण्याची शक्यता कमी असते परिणामी विमा हप्ता कमी असतो. पुरेश्या कालावधीसाठी विमा खरेदी न केल्यास वयाच्या ५५ व्या वर्षे टर्म प्लान पुन्हा खरेदी करणे महाग आहे, या वयात  तुम्हाला आरोग्याच्या समस्यांशी सामना करवा लागत असतो. वाढत्या वयातील इतर गरज म्हणजे आरोग्याशी संबंधित खर्चापासून संरक्षण आणि गंभीर आजारांसाठी संरक्षण ज्यात व्यक्तींची आयुष्यभराची बचत संपुष्टात येण्याची शक्यता असते. तुमच्या वित्तीय नियोजनानुसार तुम्ही वयाच्या ५८ पर्यंत कर्जाचे हप्ते भारत राहणार अहात. त्यामुळे ३ कोटींची वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण देणारी पॉलिसी असावी. भावी पत्नीचे उत्पन्न किती असेल हे आज सांगता येत नसल्याने त्यांनी नेमका कितीचा टर्म इंषुरन्स घ्यावा हे आजच सागता येणार नाही परंतु विवाह झाल्या झाल्या त्यांचा सुद्धा टर्म इंषुरन्स खरेदी करावा.

सेवा निवृत्ती नियोजनासाठी ७ कोटी रुपयांचा निधी ३० वर्षात जमविणे गरजेचे आहे या पैकी २ कोटी भविष्य निर्वाह निधी व तत्सम लाभातून मिळेल ३० वर्षात ५ कोटी जमविण्यासाठी ३५ हजाराची एसआयपी करणे आवश्यक आहे.                

वित्तीय ध्येय    उपलब्ध कालावधी  वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी किती रक्कमेची आवश्यकता आहे?  आज पर्यंत किती रक्कमेची तरतूद केली आहे उपाय        
सेवा निवृत्ती         ३० वर्षे      ५.०० कोटी       १.४५  लाख दरमहा ३५ हजाराची बचत करणे गरजेचे आहे या पैकी एनपीएसमध्ये १० हजाराची बचत
पहिल्या सदनिकेची खरेदी         १ वर्षे           १६ लाख         काहीही नाही       २५००० एसआयपी 
दुसऱ्या सदनिकेची खरेदी    ७ वर्षे    ५० लाख    काहीही नाही                   २५००० एसआयपी 

 

 

 

 

Scroll to Top