
‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड ही समभाग रोखे आणि हायब्रीड शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडांची यादी आहे. गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांच्या आधारे ही यादी बनविली जाते. या यादीवर ९० टक्के संख्यात्मक आणि १० टक्के गुणात्मक निकषांचा प्रभाव आहे. फंड वगळण्याच्या पहिल्या टप्यात फंडांनी १,५,आणि ७ वर्षे कालावधीत दिलेल्या परताव्याच्या आधारे फंड निश्चित केले जातात. या निवडलेल्या फंडांनी परतावा मिळविण्यासाठी उचललेली जोखीम (अस्थिरता) तपासून कमी जोखीम जास्त परतावा देणारे फंड निवडले जातात. तिसऱ्या टप्प्यात गुणात्मक विश्लेषणाच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाते. ऑक्टोबर डिसेंबर कालावधीतील कामगिरीच्या आधारे या त्रैमासिक आढाव्यात कोणतेही बदल झालेले नाहीत.
मागील १० वर्षातील ४० तिमाहींचा अभ्यास केला असता गत कॅलेंडर वर्षातील शेवटची तिमाही सर्वाधिक वृद्धी नोंदविणारी दुसऱ्या क्रमांकाची तिमाही ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि इस्रायल-हमास संघर्षाकडे दुर्लक्ष करून, चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता राखता येण्याचे लागलेले वेध या वाढीस कारण ठरले. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची अनुक्रमे १२ आणि १४ टक्के घसरण झाली. बाजारातील व्यापक तेजीमुळे लार्ज-कॅप आणि लार्जकॅप केंद्रित फंड (फोकस्ड इक्विटी आणि लार्ज अॅण्ड मिडकॅप) यांच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली. दुसरीकडे, सरलेल्या तिमाहीत मिडकॅप आणि स्मॉलकॅप गटातील फंडांच्या परताव्यात घसरण झाली. ही घसरण जानेवारी मार्च तिमाहीत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लार्जकॅप आणि मिडआणि स्मॉलकॅप फंडातील परताव्याची दरी वाढत जाईल (लार्जकॅप अधिक सरस कामगिरी करतील). गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडातुन नफा काढून घ्यायला हवा. बाजारातील सध्याचा उन्माद फंडांच्या कामगिरीचे मूल्यमापन अधिक कठोरपणे करण्याचा करण्याचे संकेत डेट आहे. विशेषतः निवडणुकीची घोषणा आणि प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंतच्या काळात बाजाराच्या अस्थिरतेत वाढ संभवते.
फंड गट | मालमत्ता | १ वर्षे | ३ वर्षे | ५ वर्षे | १० वर्षे |
लार्जकॅप | (कोटी ) | ||||
निप्पॉन इंडिया लार्जकॅप | २०२१७.६४ | ३२.७८ | २३.१२ | १७.३४ | १७.४३ |
एचडीएफसी टॉप१०० | ३०२६१.७२ | ३०.०८ | २०.७३ | १६.२१ | १५.७१ |
लार्ज अॅण्ड मिडकॅप | |||||
बंधन कोअर इक्विटी | ३४८३.९१ | ४०.२१ | २४.४८ | १९.२२ | १६.३५ |
एचडीएफसी लार्ज अॅण्ड मिडकॅप | १५०२१.९४ | ४०.२१ | २७.०८ | २०.८४ | १५.१५ |
मल्टीकॅप | |||||
निप्पॉन इंडिया मल्टीकॅप | २४५९०.१७ | ४०.०८ | ३१.५६ | १९.७१ | १७.०८ |
आयसीआयसीआय पृ. मल्टीकॅप | १०३४१.५४ | ३८.२८ | २३.०८ | १८.१७ | १७.६४ |
फ्लेक्झीकॅप | |||||
पराग पारीख फ्लेक्झीकॅप | ५२००७.०२ | ३६.७४ | २२.२१ | २२.९६ | १९.७५ |
फ्रँकलीन इंडिया फ्लेझीकॅप | १३७९१.५२ | ३३.३४ | २२.१४ | १८.७१ | १७.७२ |
मिडकॅप | |||||
निप्पॉन इंडिया ग्रोथ | २३४९३.६५ | ४९.४३ | २९.९८ | २४.८३ | २०.९४ |
फ्रँकलीन इंडिया प्रायमा | ९८६७.५५ | ३९.७४ | २१.५३ | १८.१३ | १९.९१ |
स्मॉलकॅप | |||||
निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप | ४३८१५.६१ | ५१.३५ | ३९.६८ | २९.०१ | — |
फ्रँकलीन इंडिया स्मॉलर कंपनीज | ११३९७.८३ | ५६.८७ | ३४.५१ | २३.०२ | २२.९६ |
इएलएसएस | |||||
बँक ऑफ इंडिया इएलएसएस | १०४०.०१ | ३७.९५ | २२.९७ | २३.९७ | १८.६० |
एसबीआय लॉंगटर्म इक्वीटी | १८७१४.५८ | ४३.२८ | २४.४० | १९.९० | १६.९८ |
व्हॅल्यु | |||||
निप्पॉन इंडिया व्हॅल्यु | ६७८५.७४ | ४३.०५ | २६.२७ | १६.५६ | १९.२७ |
बंधन स्टर्लिंग व्हॅल्यु | ७७७३.७७ | ३४.९६ | ३०.१५ | २०.७९ | १९.४६ |
फोकस्ड इक्विटी | |||||
बंधन फोकस्ड इक्विटी | १४८७.९२ | ३४.५३ | १४.३२ | १५.६५ | १५.२२ |
निप्पॉन इंडिया फोकस्ड | ७८१८.४२ | २७.२२ | २०.६२ | १८.३४ | १९.२७ |