‘कर्त्यां’ म्युच्युअल फंडांच्या त्रैमासिक आढाव्यात शिफारसप्राप्त फंडाच्या यादीत निप्पॉन इंडिया लार्जकॅप, निप्पॉन इंडिया मल्टीकॅप, निप्पॉन इंडिया फ्लेक्झीकॅप, निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप या फंडांचा समावेश केला. या आढावा दरम्यान निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शैलेश राजभान यांच्याशी चर्चा केली. या संभाषणाचा हा संपादित अंश. 

भारतीय आणि जागतिक बाजारांच्या वाटचाली बद्दल तुम्ही काय सांगाल?

अन्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय बाजाराने घसरणी नंतर लवकर उसळी मारल्याचे दिसून आले आहे,  जागतिक पातळीवरील अस्थिता शिगेला पोहचली असतांना  भारतीय बाजारातील अस्थिरता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत व्याज दर वाढविल्याने उदयोन्मुख बाजारातून परकीय अर्थ संस्थांनी भांडवल काढून घेतल्याचे दिसून आले आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की जगभरात आगामी काळात महागाई आणि अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर दोन्ही मंदावण्याची शक्यता आहे.  लवकरच परदेशी  गुंतवणूकदार भारतात परत येतील.

मॉर्निगस्टार असो किंवा क्रिसिल असो, म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे मुलीमापन करणाऱ्या संस्थांनी निप्पॉन इंडियाच्या वेगवेगळ्या फंडांना चांगली पत बहाल केली आहे. आपले फंड चांगली कामगिरी करीत आहेत आणि गुंतवणूकदार तुमच्या फंडाची निवड करीत आहेत हे पासून तुमच्या नेमक्या भावना काय आहेत?

आमच्या प्रवार्ताकांमध्ये पाच वर्षांपूर्वी बदल झाला. तेव्हापासून आमच्या गुंतवणूक पद्धतीत मोठे बदल झाले. आमचे जोखीम व्यवस्थापन (रिस्क फ्रेमवर्क) अधिक कठोर करण्यात आले त्याचे फळ फंड घराण्याला मिळत आहे. मागील आर्थिक वर्ष सुरु झाले तेव्हा आम्ही मालमत्ता क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर होतो. वर्ष संपतांना आम्ही चवथ्या क्रमांकावर आलो आहोत.  मागील आर्थिक वर्षात आमच्या फंड घराण्याची सरासरी मालमत्ता (एयूएम) २९४५०० कोटी होती. या मालमत्तेत वैयक्तिक गुंतवणूकदारांचा जवळ जवळ ५० टक्के वाटा आहे. मागील वर्षात आमच्यासक्रीय फोलीओंचीसंख्या ११ कोटी ६४ लाख असून फ़ोलिओच्या संख्येने १३ टक्के वाढ नोंदविली आहे. इतक्या मोठ्या संख्येने गुंतवणूकदार आमच्यावर विश्वास ठेवत आहेत ही आनंदाची गोष्ठ असली तरी आमच्यावर गुंतवणूकदारांनी टाकलेल्या जबाबदारीची आम्हाला जाणीव असून आम्ही आमच्या प्रयत्नांची शिकस्त करू. ३१ मार्च २०२३ रोजी एकूण माल्मातीच्या ५० टक्के मालमत्ता किरकोळ गुंतवणूकदरांची होती. हे लक्षात घेता आम्ही समाधानी असलो तरी आमच्या गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापनाचे हे फळ आहे असे मानतो.

तुमच्या पोर्टफोलिओत असलेल्या कंपन्यांच्या उत्सर्जना बाबत तुम्ही काय अपेक्षा करीत आहात?

दोन तिमाहींपासून अपवाद वगळता कंपन्यांच्या उत्सर्जनात कमकुवतपणा आलेला दिसत आहे.  त्याहूनही त्रासदायक बाब म्हणजे ती सर्वच क्षेत्रात विशेष लक्षवेधी संधी उपलब्ध असल्याचे अभावाने दिसते. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील वृद्धी तफावत वाढल्याचे दिसत आहे. जसे की जीन्नस आणि निर्यात-केंद्रित क्षेत्रातील महसूल जसे की कापड, रत्ने आणि दागिने आणि आयटी -सक्षम सेवांमध्ये वार्षिक घट झाल्याचे दिसत आहे. पोलाद  उत्पादनाचा महसूल, वाढला तरी मे २०२२ मधील निर्यात शुल्क लादल्यामुळे आणि उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्याने तसेच कमकुवत जागतिक मागणीमुळे पोलाद कंपन्यांच्या नफ्यात घट होईल. जागतिक मागणीच्या अभावी अॅल्युमिनियम उद्योगाच्या महसुलात १८ ते २० टक्के घट होण्याची आम्हाला अपेक्ष आहे.

जागतिक मागणी स्थिरावण्याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे?

जागतिक मागणी स्थिरावण्यास आणखी २ ते ३ तिमाही वाट पहावी लागेल. परंतु देशांतर्गत मागणीत  अनुकूल पर्जन्यमान झाल्यास त्याआधी सुधारणा होऊ शकते.

तुम्ही तुमचे पैसे कोठे गुंतवण्यास प्राधान्य द्याल, उपभोगाच्या वस्तू किंवा भांडवली वस्तूंमध्ये?

मार्च एप्रिल महिन्यांत ज्याप्रकारे कंपन्यांचे मूल्यमापन बदलले ते पहाता उत्पादक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उच्च विकास दर असूनही त्यांना उच्च मूल्यांकन वाजवी आहे असे वाटते. दुसरीकडे, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्याच्या चांगल्या संधी नव्याने दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांकडे तुम्ही कसे पाहता?

ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांना महागाईची झळ लागलेली दिसत आहे त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांची नफा क्षमता कमी झाली आहे.  विवेकी ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांना महागाईची कमी झळ लागली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढ पाहता, मिडकॅप ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत गुंतवणुकीची संधी दिसत आहे.

तुम्ही आरोग्य सेवा क्षेत्राबद्दल काय सांगू शकाल ?

मागणीच्या दृष्टीकोनातून मला वाटते की आरोग्य सेवा क्षेत्रात मागणी सामान्य होत असल्याचे दिसत आहे. तुम्ही जेव्हा व्यवसायांच्या दीर्घायुष्याचा आणि उत्पादन क्षमतावाढीचा विचार करता तेव्हा हा सर्वात स्वस्त व्यवसायांपैकी आणि क्षमता वाढीची संधी उपलब्ध असणारा एक व्यवसाय आहे. त्यामुळे तआरोग्य सेवा क्षेत्र  निश्चितपणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी मानली जाऊ शकते.

आयटी क्षेत्राबद्दल तुमचे मत काय आहे?

आयटी क्षेत्रात महसुलात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे, जी आजपर्यंत प्रत्यक्षात आलेली नाही. अमेरिकेतील व्याजदर वाढीचा या क्षेत्रावर कसा परिणाम होतो यावर आम्ही  लक्ष ठेऊन आहोत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे वित्तीय सेवा क्षेत्राचे सर्वात मोठे आव्हान आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईसमधील संकटामुळे भारतीय आयटी क्षेत्रासाठीही बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्र हे भारतीय आयटी उद्योगासाठी सर्वात मोठे महसूल देणारे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावरील कोणत्याही नकारात्मक बातम्यांचे आयटी क्षेत्रावर निश्चितच परिणाम होत आहेत.

तुमची प्रतिक्रिया किवा गुंतवणुकीसाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top