डिजिटली युवर्स  ......

सेक्टर रोटेशन हा गुंतवणुकीचा अविभाज्य घटक आहे. अर्थव्यवस्था सर्धारण १२ ते १५ उद्योगक्षेत्रात विभागली असून कोणत्याही काळात ४ ते ५ उद्योगक्षेत्रे शिखरावर असतात तर तितकीच क्षेत्रे गाळात असतात सद्य स्थितीत ऑटो, मॅन्युफॅक्चरिंग आणि कर्ज वितरण ही उद्योगक्षेत्रे  त्यांच्या गेल्या पाच ते सात वर्षांच्या सर्वोच्च स्थानी आहेत तर आरोग्य निगा आणि उपभोग (कंझ्मशन) क्षेत्रांना चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत. आयटी हे एक क्षेत्र असे आहे की या क्षेत्राच्या पुनरागमनाचे स्पष्ट संकेत दिसत नसले तरी बाजारात नोंदणी झालेल्या आयटी कंपन्यांचे अर्थवार्षिक निकाल काही संकेत देत आहेत. बाजारात जोखीम परतावा यांचा समतोल साधायचा असतो. जोखीम घेऊन गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळती. तुमची जोखीम सहिष्णुता जास्त असेल तर तुम्ही नक्कीच टेक्नोलॉजी फंडात गुंतवणूक करायला हवी. या क्षेत्राचे मुल्यांकन सध्या कोरोन पूर्व पातळीवर आले आहे. कोरोन पूर्व निफ्टी आयटी इंडेक्स पीई २० पट  होता कोरोन पश्चात ३६ पट होऊन पुन्हा आता २५पट  झाल्याने एक ते दोन वर्षे गुंतवणूक राखून ठेवण्याच्या उद्देशाने नव्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. या क्षेत्रातील कंपन्यांचे अर्धवार्षिक निकाल संमिश्र असून नजीकच्या काळात निफ्टी आयटी इंडेक्स मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. म्हणूनच या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ असू शकते.

आयटी सेक्टर किंवा टेक्नॉलॉजी सेक्टर फंडांकडून पुढील वर्षभरात चांगल्या कामगिरीची अपेक्ष आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण विक्रीच्या ७०-८० टक्के विक्री अमेरिका आणि युरोप मधून येते. अमेरिकका आणि युरोप मधील वाढत्या महागाई आणि उच्चांकी व्याजदरामुळे अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.  निफ्टी आयटी इंडेक्स जानेवारी -जुलै २०२२ दरम्यान ३३टक्यांनी घसरला. तेव्हापासून त्याचे निर्देशांक एका ठराविक टप्प्यात रेंगाळत होता. हा लेख लिहीत असतांना हा निर्देशांक २०२२ नंतरच्या घसरणीतील तळापासून २२ टक्के वर आला आहे. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांनी जागतिक वित्तीय संकटांनंतर २००९ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत, आयटी खर्चात मोठी कपात झाली होती. त्या नंतरची सर्वाधिक कपात २०२१ मध्ये झाली. बर्नस्टीनच्या अहवालानुसार कॅलेंडर वर्ष २००९ मध्ये कपात ९.५८ टक्के होती तर २०२१ मध्ये ४.६ तपात झाली होती. आयटी कंपन्या या हाय ग्रोथ कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. भारतीय आय टी कंपन्यांनी  २०१५ पासून सरासरी १३.२ टक्के वार्षिक वाढ नोंदली आहे. वर्ष २०१८ मध्ये सर्वात कमी १०.२ टक्के वाढ नोंदली आहे. आयटी खर्चात कपात करणे सेवा आणि उत्पादन कंपन्यांना परवडणारे नाही. कारण आयटी खर्चात कपात म्हणजे कंपन्या देत असलेल्या सेवेचा दर्जा ढासळणे. एखाद्या बँकेचे अॅप समाधान कारक नसेल तर तुम्ही त्या बँकेतील खाते बंद कराल. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आयटी खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. आयटी कंपन्यांची वार्षिक ‘ऑर्डर बुक’च्या वाढ संथ झाली असली तरी, त्याचा परिमाण नफ्यातील वाढ कमी होण्यात झालेला नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण ग्राहकांकडून एखादा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर तो प्रोजेक्टपूर्ण करून त्याचे पैसे घेणे यात आयटी कंपन्या माहीर आहेत.

व्यवसायाचे एक तत्व आहे एखादा व्यवसाय विकसित होतो तेव्हा आणि नफ्याचे प्रमाण अधिक असते तेव्हा अनेक नवशे गवशे त्या व्यवसायात येतात त्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होते. ‘निफ्टी आयटी इंडेक्स’चा सरासरी EBITDA जवळपास १० वर्षात नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. विशेषत: कोरोन पश्चात मनुष्यबळाच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे ही घसरण झाली. जेव्हा मजबूत मागणी होती म्हणजे प्रोजेक्ट येत होते तेव्हा ही झळ जाणवली नाही परंतु अमेरिका आणि युरोप मधील मंदीचा फटका आयटी उद्योगाला बसल्यानंतर ही झळ जाणवायला लागली आहे. आता अमेरिकेतील व्याजदर वाढ थांबली असल्याने अमेरिकेतील कंपन्यांकडून आयटी कंपन्यांच्या सेवा आणि उत्पादनांच्या मागणीत सुधारणा अपेक्षित असून जानेवारी २०२४ पासून पुन्हा अमेरिका युरोपातील ग्राहकांकडून आयटी कंपन्यांना प्रोजेक्ट्स मिळू लागतील. आयटी कंपन्यांच्या ‘ऑफ शोअर’ आणि सब कॉट्रँक्टिंग खर्चात कपात होऊन वर्षभरात नफ्याच्या प्रमाणांत (मार्जिनमध्ये)  वाढ दिसू लागेल. मोठ्या आयकंपन्यांचा ‘पीई’ त्यांच्या १० वर्षांच्या सरासरी मुल्यांकनापेक्षा जास्त असला, तरी २०२१च्या ऐतिहासिक मुल्यांकनापेक्षा सरासरी ३० टक्यांनी कमी आहे.  ऐतिहासिक उच्च मुल्यांकनापासून टीसीएस आणि इंफोसिस सारख्या लार्जकॅप कंपन्यांचा ‘पीई’त ३० टक्के तर एलअँण्डटी माइंडट्री सारख्या मिडकॅप कंपनीच्या ‘पीई’त ४५  टक्के घसरण झाली आहे. भविष्यात या कंपन्यांचा व्यवसाय विस्कळीत होण्याच्या भीतीमुळे ही घसरण झाली आहे. मोठ्या आयटी कंपन्यांनी त्यांच्या लाभांश वाटपात कपात केलेली नसून मागील वर्षी टीसीएसने जवळपास १०० टक्के लाभांश जाहीर केला असून या वर्षी बायबॅकच्या रूपाने भागधारकांना खुश केले आहे.

‘जनरेटिव्ह एआय’च्या वाढत्या वापरामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होण्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. भारतीय कंपन्यांनी अशा व्यावसायिक व्यत्ययावर तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी मात करतील. उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कंपन्यांद्वारे ‘जनरेटिव्ह एआय’चा सक्रिय वापर केला जात आहे. मोठ्या भारतीय आयटी कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर कोडिंग, ग्राहक सेवा आणि मार्केटिंग आणि फसवणूक शोधणे, कायदेशीर बाबी आणि एचआर इत्यादीसारख्या कामांसाठी पायलट प्रोजेक्ट्स राबवत आहेत. तरीही, काही अहवालांनुसार, वर उल्लेख केलेल्या प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त सध्याच्या वेगवेगळ्या मंचांवरून (प्लॅटफॉर्म) क्लाउडवर शिफ्ट करून (जनरल एआय स्वीकारण्यापूर्वी आवश्यक असलेली एक पायरी) चालविली जाऊ शकते.  या पार्श्वभूमीवर टाटा

डिजिटल इंडिया फंडात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गुंतवणूकदारांना पाच सक्रिय व्यवस्थापित आयटी/टेक फंडांचा पर्याय उपलब्ध आहे.  फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल फंड, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटल इंडिया फंड असे हे सक्रीय व्यवस्थापित टेक/ आयटी फंड आहेत. तरी, सर्व ५ सक्रियपणे-व्यवस्थापित फंडांचा पोर्टफ़ोलिओ ओव्हरलॅपचे  ९० ते ९४ टक्के दरम्यान आहे. ऑक्टोबर २०२२ आणि ऑक्टोबर २०२३ दरम्यान पोर्टफोलिओ संक्रमण अभ्यासले असता असे दिसून येते की निधी व्यवस्थापकांनी लार्जकॅप गुंतवणुका कमी करून मिड आणि स्मॉल-कॅप आयटी सेवा कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश केला आहे. भारत हा इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला देश आहे.ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशभरात रोज ८४९ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत.इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत रोज नवे उच्चांक प्रस्थापित करीत असून हा आकडा २०४० पर्यंत १.५ अब्ज वापरकर्त्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन बाजारपेठ आहे. देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी बहुसंख्य लोक त्यांच्या मोबाईल फोनद्वारे इंटरनेट वापरतात.देशभरात इंटरनेट वापरकर्त्यांइतकेच स्मार्टफोन वापरणारे होते.मोबाइल डेटाची स्वस्त उपलब्धता, डेस्कटॉप आणि टॅब्लेटच्या तुलनेत स्मार्टफोन वापरस्नेही असल्याने इंटरनेट साक्षरता आणि तांत्रिक ज्ञानामुळे देशातील प्रौढांमध्ये इंटरनेटचा वापर कमी तर तरुणांचा डेटा वापर उपलब्ध डेटा मर्यादेपेक्षा अधिक होत आहे.

टाटा डिजिटल इंडिया फंड हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकसंधींचा लाभ घेणारा फंड आहे. गुंतवणुकीचा परीघ मर्यादित असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३५ कंपन्यांचा समावेश असतो. हा एक सेक्टरल फंड असल्याने जोखीम सहिष्णुता जास्त असलेल्या गुंतवणूकदरांसाठी हे शिफारस आहे. ज्यांची जोखीम सहिष्णुता कमी आहे त्यांनी या फंडात गुंतवणूक करणे टाळावे. या फंडाने मागील पाच वर्षात फंडाच्या मानदंड सापेक्ष अव्वल परतावा दिला आहे. हा परतावा मिळण्या मागे

पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कंपन्यांच्या उत्सर्जनाच्या वृद्धीत बँकिंग आणि वित्तीय सेवा-उद्योगाचा मोठा वाटा असतो.मागील दोन वर्षांपासून या क्षेत्रातून कामाची मागणी अतिशय कमी प्रमाणात नोंदविली जात होती.कोरोना पश्चात सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना तंत्रज्ञान बदल अपरिहार्य झाला आहे.सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना जे बदल अंगीकारावे लागत आहेत.  माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे ग्राहक ‘वर्क फ्रोम होम’ कार्यसंस्कृतीशी सुसंगत तंत्रज्ञान मंचावर संक्रमण करीत आहेत.उपलब्ध मर्यादित परिघातील कंपन्यांची निवड करण्यासाठी निधी व्यवस्थापक अतिशय कठोर निकष लावतात.मूलभूतदृष्ट्या सुदृढ व्यवसाय उत्सर्जनात वृद्धी दृष्टीपथात आहे आणि ज्या कंपन्या वाजवी मूल्यांकनावर उपलब्ध आहेत अशा कंपन्यांची निवड निधी व्यवस्थापिका करीत असतात.

निधी व्यवस्थापक कंपन्यांची गुणात्मक तसेच व्यवस्थापन दर्जा, धोरणात्मक आणि व्यवसायिक संधी, स्पर्धात्मक फायदा, आपल्या सेवा किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करण्याची क्षमता आणि ताळेबंद विश्लेषण करून गुंतवणुकीत समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय घेतात.मागील सहा महिन्यांत फंडाच्या गुंतवणुकीतून लार्जकॅप जसे की टीसीएस इंफोसीस सारख्या अमेरिका युरोपमधून जास्त महसूल असलेल्या कंपन्यांची मात्रा कमी करून  परसिस्टंट झोमॅटो एल अँण्ड टी माइंडट्री या व इतर कंपन्यांचा गुंतवणुकीत वाढ करण्यात आली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ३.८६ टक्के परदेशातील गुंतवणुका आहेत. कंपन्यांचे व्यवस्थापन आणि समभाग विश्लेषक यांचा माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वृद्धीबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.कंपन्यांच्या तिमाही निकालाचे विश्लेषण केले असता मागील तिमाहीत नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्याची संख्या(अॅट्रीशन रेट) ३० टक्क्यांदरम्यान आहे. याचाच अर्थ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना नविन कंत्राटे मिळत असल्याने कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करीत आहेत. डिजिटायझेशनच्या लाटेने सगळ्यांच्या व्यवसायाला चालना दिली आहे. मिड-कॅप कंपन्यांना मोठ्या डिजिटायझेशन संधीचा अधिक फायदा झाला आहे. तसेच, भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन युगातील टेक कंपन्यांच्या शेअर बाजारातील नोंदणीमुळे निधी व्यावस्थापकांना नवीन गुंतवणूक संधी उपलब्ध झाल्या. या नव्या युगातील गुंतवणूकिंचा अर्थपूर्ण प्रभाव फंडांच्या कामगिरीवर पाडण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पहावी लागेल. आत्तापर्यंत अशा कंपन्यांची संख्या कमी आहे आणि काही नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्या मार्केट कॅपच्या दृष्टीने मायक्रो किंवा स्मॉलकॅप  गटात मोडतात. अशा परिस्थितीत नवीन युगातील भारतीय कंपन्यांसाठी त्यांचे मार्केटकॅप उंचावल्यानंतर टेक डिजिटल फंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतील.

तसेच, अमेरिकेच्या  फेडरल रिझर्व्हने कोरोना पश्चात व्याजदर वाढ न केल्याची धोरणात्मक चूक केल्याने अमेरिकेत महागाई वाढली आणि महागाईला काबूत ठेवण्यासाठी व्याजदर वाढवावे लागले. परिणामी तंत्रज्ञान निर्देशांक नॅस्डॅक कंपोझिट आणि नॅस्डॅक १०० यांच्यात प्रत्येकी  १८ टक्यांपर्यंत घसरण झाली. सर्व वाईट दिवस मागे पडल्याने तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली असून, या संधीचा फायदा घेण्यासाठी टाटा डिजिटल इंडिया फंड हे आदर्श साधन आहे असे वाटते.

गुंतवणूक संधिंबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा

+91 97024 90900

खालील लिंकवर क्लिक करून आजच आपली भेट निश्चिंत करा

https://bit.ly/vkEnquiryform

Scroll to Top